Skip to content

काही गोष्टींच्या खोलात न गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्य  उत्तम राहते.

काही गोष्टींच्या खोलात न गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्य  उत्तम राहते.


सोनाली जे


मानसिक स्वास्थ्य छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या कोणत्याही गोष्टीतून बिघडू शकते.. बहुदा आनुवंशिक किंवा अपघाताने आलेले मानसिक आजार सोडल्यास हे मानसिक स्वास्थ्य कोणत्या कारणाने  बिघडत असते ?? तुम्हा सगळ्यांना पटकन दिसते ती बिघडलेले मानसिक स्वास्थ्य..बरोबर ना !! आणि आपण किती सहज प्रतिक्रिया देत असतो की काय वेडा किंवा काय वेडी एवढ्याशा गोष्टीने डिस्टर्ब झाला किंवा झाली..

मानसिक स्वास्थ्य बिघडते म्हणजे माणसाच्या कोण कोणत्या गोष्टीत किंवा स्वभावाच्या कोणत्या बाबतीत बिघडते..आणि काय होते नक्की

१. Anger.. राग : – राग ही प्रतिक्रिया आहे..समोरच्या व्यक्तीच्या वागण्याची प्रतिक्रिया आहे ही..जेव्हा व्यक्ती मनाने  आजारी पडतो तेव्हा तो इतरांना दोष देतो, त्यांच्यावर चिडचिड करतो.कारण त्याला असे वाटते की ही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही .आपण हे करू शकत नाही..किंवा क्षमता असून ही त्या गोष्टी दुसऱ्यांनी च केल्या पाहिजेत अशी मानसिकता त्यामुळे दुसऱ्यांवर चिडचिड., रागावणे सुरू होते. उगाच  कोणी कोणावर रागावत  नसते..

आणि पहिल्या वेळेस ही पटकन ही प्रतिक्रिया दिली जात नाही..प्रत्येक व्यक्ती कडे सहन करण्याची काही मर्यादा असते .सहनशीलता किंवा पेशंस म्हणतो आपण या मर्यादा क्रॉस झाल्या म्हणजे काय की ती एकच एक गोष्ट किंवा त्यासारख्या अनेक गोष्टी समोरच्या व्यक्ती किंवा व्यक्तीं कडून  घडत गेली की ती आतून येणारी प्रतिक्रिया..

तसेच आपल्या मनाचे ही आहे एखाद्याने आपल्या मनाला त्रास होईल अशी गोष्ट केली ..राग येईल असे काही केले की आपल्याला त्रास होतो.जसे मुलांना सतत सांगूनही ते अभ्यास करत नाहीत..एकदा सांगितले दुसऱ्यांदा सांगितले तरी time pass करत असतात..t.v. बघायला वेळ असतो , खेळायला वेळ असतो परंतु अभ्यासाला वेळ नसतो  म्हणून आईची चिडचिड होते आणि त्यामुळे राग येतो ..

२. इगो किंवा आत्मसन्मान  ..प्रत्येक व्यक्तीला इगो हा कमी जास्त प्रमाणात  असतो च असतो.तो दुखावला गेला की मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते.

३. क्षमता आणि उणिवा…जर क्षमता जास्त असतील तर इतरांच्या पेक्षा आपण श्रेष्ठ असेच मानले जाते..आणि कोणी आपल्यातल्या उणिवा किंवा कमतरता यांची जाणीव करून दिली तरी आपल्यात न्यूनगंड निर्माण होतो..

४. इतरांशी तुलना ..इतरांकडे आहे ते आपल्याकडे नाही यातून सतत तुलना केली जाते आणि आपल्या तेवढ्या क्षमता नसतील तर त्यातून नैराश्य , उदासीनता म्हणजेच depression येते.

५. अपयश ..शैक्षणिक अपयश असेल, नोकरी व्यवसायात ले अपयश असेल , नाते सबंध यातले अपयश असेल त्याचा परिणाम होवून frustration म्हणजे निराशा येते.

६. Health issues.. आपले मन तेव्हा साथ देते जेव्हा आपले शरीर ही स्वस्थ असेल ..एखादे जन्मजात व्यंग असेल तर ते लहानपणापासून च त्या बरोबर जुळवून घेण्यास शिकतात.पण अचानक , अपघाती असेल किंवा इतर काही दुर्धर रोग असतील त्यातून शरीर अस्वास्थ्य , शरीराच्या तक्रारी सुरू झाल्या की मना मध्ये ही बिघाड होवू लागतात..

७. अती विचार …अती विचार केल्याने ही आपले मानसिक स्वास्थ्य बिघडून जाते .

मानसिक स्वास्थ्य अनेक कारणांमुळे बिघडते..जोपर्यंत आपण फार खोलात जात नाही तोपर्यंत सगळे व्यवस्थित असते.. जसे की एक मुलगा खूप जाड होता त्याला सगळी शाळेतली मुलं hippopotamus म्हणून चिडवत असतं. तो तेव्हा खूप हसण्यावारी ते मुलांचे बोलणे नेत असे..

कारण त्याला hippopotamus याचा अर्थ माहिती नव्हता..पण एक दिवस त्याने ठरविले की याचा अर्थ माहिती करून घ्यायचा म्हणून आणि त्याला जेव्हा समजले तेव्हा मुलांनी चिडविले की त्यांच्यावर रागवू लागला, त्यांना मारू लागला ,आरडा ओरडा करू लागला म्हणजेच काय जोपर्यंत तो अर्थ शोधण्याच्या खोलात शिरला नव्हता तोपर्यंत त्याचे मानसिक स्वास्थ्य चांगले टिकवून होता.

तसेच आहे नोकरी मध्ये जो पर्यंत आपण आपले काम भले आपण भले असे असते तोपर्यंत सुखी असतो .परंतु जेव्हा आपल्या बरोबरच्या दुसऱ्या कोणाबरोबर तुलना करतो .तेव्हा मानसिकता बिघडत जाते .

महेश आणि रुपाली एकाच ऑफिस मध्ये काम करत,  position पण सारखीच..दोघेही हसून खेळून छान .एकदा महेश रुपाली ला salary किती आहे हे विचारतो आणि एकाच पोझिशन वर असून रुपाली ला जास्त पगार आणि त्याला कमी  पगार म्हणाल्यावर त्याची तुलना सुरू होते, त्याची चिडचिड सुरू होते..

एव्हढे दिवस व्यवस्थित काम करणारा हा महेश आता कामाकडे दुर्लक्ष करू लागतो..मनात सतत हेच विचार की तिला जास्त पगार का ? त्यामुळे जोपर्यंत त्याला माहिती नव्हते दोघांचे पगार तोपर्यंत सगळी गाडी व्यवस्थित सुरू होती पण जेव्हा खोलात जावून विचारले तेव्हा मात्र मानसिक स्वास्थ्याची गाडी बिघडली.

आपण आजारी पडलो आणि एखादा दुर्धर रोग जडला तर आपण जेव्हा डॉक्टर वर आणि औषधांवर पूर्ण विश्वास ठेवून असतो तेव्हा आपण stable असतो..बरे होणार हा आपला डॉक्टरां वरचा विश्वास आपल्याला बरे होण्याकरिता , त्रास कमी होण्याकरिता  मदत करत असतो किंवा त्यामुळे आशावादी असतो म्हणून डॉक्टर बघून घेतील असे डॉक्टरांवर सोपवून देतो ..

पण जेव्हा आपण आपल्या रोगा विषयी अजून माहिती मिळवीत असतो .कोणाला विचारून किंवा इंटरनेट वरून तेव्हा ती माहिती सुधा मर्यादित मिळते..आणि मग त्यात जे लिहिले असेल तर की रोग कधीच बरा होणारा नाही , त्याच्या दीर्घकालीन औषधांचे परिणाम किंवा नक्की रोगाचे स्वरूप ही माहिती खोलात जावून मिळविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अर्धवट ज्ञान मिळविण्याचा खोलात जाण्याचा त्रास होतो ..डॉक्टर आपल्यापासून काही लपवीत आहेत किंवा त्यांचा फायदा करून घ्यायचा म्हणून काही सांगत नाहीत असे अविश्वास निर्माण होतात .आपण बरे होणार नाही ही मानसिकता तयार होते..

आपल्यापेक्षा डॉक्टरनी सांगणे महत्वाचे ना की रोग खरेच फार गंभीर आहे..आपण काय करतो की काही तरी अर्धवट माहिती मिळवून त्यातले ज्ञान संपादन केले नसले तरी ही माहिती खरी म्हणून डॉक्टर वर अविश्वास दाखवित असतो आणि आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अजून बिघडते..खोलात जावून काही तरी चुकीचे ज्ञान मिळवून काही तरी भलतेच विचार करत बसण्यापेक्षा डॉक्टर कडे गेलो आहोत ते योग्य ते बघून घेतील आणि औषधे ही योग्य असतील आणि आपण बरे होणार याची खात्री आणि विश्वास ठेवा.

आनंद movie मध्ये जसे राजेश खन्ना..आनंद दुर्धर आजाराने ग्रस्त असतो तरी तो किती आनंदाने स्वीकार करतो.. जेव्हा समजते की लिंफोसरकोमा ऑफ इंन्टेस्टाइन  यावर  कसला कुल प्रतिक्रिया देतो की , बिमारी हो तो ऐसी हो , वा  वा क्या नाम है ,ऐसें लगता है किसीं 5 स्टार  रेस्टॉरंट का नाम है ,

ये बिमारी अगर किसीं औरत को होती तो ऐसा लगता की उसने किसीं अंग्रेज को गोद  ले लिया !

अरे स्वतःच्या एवढ्या मोठ्या दुखण्यावर हा माणूस किती शांतपणे , आणि सहजगतरित्या की त्यात काय एवढे , पण आजार व्हावा तर त्याचे नाव ही तसेच साजेसे , त्या नावाला त्या  रोगाला भीतीयुक्त नाही तर किती आदरयुक्त बघण्याचा दृष्टीकोन.

आनंद सगळ्या गोष्टी हसत खेळत नेत असतो तेव्हा त्याचा डॉक्टर
डॉक्टर भास्कर : यावर एक डाक्टर असून   हेल्प लेस  असह्य असणारा चिडणारा , आपला कंट्रोल घालवणारा भास्कर , की तो ओरडून म्हणतो ये मजाक और मस्करी पन की बात  नही , आपको पता है ये किस बिमारी का नाम है,?

आनंद  : – तेवढ्या च  शांतपणे , संयमाने , म्हणतो, मेरे पेट मे ट्युमर है और उसकी वजह से मै 6 महिने से ज्यादा नही जिंदा रह सकता शायद  ये इसी बिमारी का नाम है! आनंद त्याच्या आजारपणाच्या फार खोलात जात नाही पण जे आहे त्याचा स्वीकार करून आयुष्य आनंदाने जगतो..

” बाबूमोषाय जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही “

असे म्हणून डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवून आनंदाने प्रत्येक दिवस घालवत असतो. फार खोलात जावून विचार कराल तर आहे तो आनंद ही गमावण्याची शक्यता आहे त्यामुळे हेच लक्षात घ्या की  काही गोष्टींच्या खोलात न गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्य  उत्तम राहते. आयुष्य आनंदी आहे आनंदाने जगा..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काही गोष्टींच्या खोलात न गेल्यामुळे मानसिक स्वास्थ्य  उत्तम राहते.”

  1. Gokul anil jaybhaye Jaybhaye

    बाईक चालवायला भिती वाटते. उत्साह अजिबात नाही यावर उपाय सांगा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!