Skip to content

या ५ गोष्टी सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही??

या ५ गोष्टी सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही??


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“पार्टनर” म्हणजे अर्थातच “जोडीदार”…….आपल्या आयुष्याचा जोडीदार…!! आपल्या मनासारखाच पार्टनर आपल्याला मिळावा असं सगळ्यांना वाटतं. तो असा असावा…तसा असावा..तो असा मुळीच नको.माझा जोडीदार अगदी आयुष्याला पैलू पाडेल असाच असावा..!!असं खूप काही असतं. त्याच्यात कोणते गुण असावेत कोणते नाही हेही आपण ठरवलेल असतं.आणि त्यातलाच एक गुण म्हणजे….. “प्रामाणिकपणा”.

“प्रामाणिकपणा” हा कोणत्याही नात्यातील खूप महत्त्वाचा “Factor” आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. “Honesty is the best policy” हे म्हणतात ते उगाच नाही. तर खरच नात्यातच काय तर आयुष्यातही हा प्रामाणिकपणा गरजेचाच आहे. पण प्रत्येकाकडे हा प्रामाणिकपणा असणं फार अवघड आहे. कारण खूप कमी लोकं आहेत अशी जी खरचं स्वतःशी आणि इतरांशीही आपल्या आयुष्यात “प्रामाणिक” आहेत.

पण हल्ली समोरची व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही याचा अंदाज सहजासहजी लावता येत नाही. थोडं तरी अनुभवातून जावचं लागतं. असो…….तर मुद्दा हा आहे की…आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही….??आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपला जोडीदार प्रामाणिक आहे की नाही हे सांगतात किंवा सांगू शकतात….??तर वाचकहो… , अशा काही गोष्टी आहेत ज्या की नात्यांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच नात्यातील असणारा/नसणारा प्रामाणिकपणा स्पष्ट होतो.

तर मग जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या प्रामाणिकपणाला स्पष्ट करु शकतात…..
तर क्रमांक —-

१) मोकळा संवाद-

कुठल्याही नात्यात संवाद हा महत्त्वाचा असतो.नात्यात केवळ संवाद नसावा तर मोकळा संवाद असावा.आणि हा मोकळा संवादच नसेल तर काहीतरी गडबड आहे असं वाटणं साहजिक आहे.बऱ्याचदा संवाद टाळणच खूप घातक ठरतं.बोलका स्वभाव नसला तरीही आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद साधणं गरजेचं आहे. कारण आपला जोडीदार संवाद साधायला तयारच नसेल किंवा सतत टाळाटाळ करत असेल तर संशयाची भूतं मनात घर करु लागतात.त्याला आपल्यात काही एक रस नाही हे हळुहळू मनाशी पक्क होतं.आणि जर हाच मनमोकळा संवाद होत असेल तर नात्याची वीण अधिकाधिक घट्ट वाटू लागते.

२) पारदर्शकता-

पारदर्शकता यालाच आपण “transparency” असही म्हणतो.नात्यात पारदर्शकता असेल तर नाती सहजपणे हाताळली जाऊ शकतात.”मी हे असं असं करतोय /करतेय किंवा करणार आहे.तुला विचारात घेऊन सांगावसं वाटलं. यातल काही पटत नसेल तर जरूर सांग…मी मला जमेल तशी “adjustment” करेल.हे जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला सांगतो तेव्हा नाती खरच किती स्वच्छ,सुटसुटीत आणि नीटनेटकी आहेत याची जाणीव होते.पण याऊलट जर नात्यात अशी पारदर्शकता जाणवलीच नाही तर हळुहळू सगळच अवघड होऊन जातं.

३)आदर//Respect-

Respect..”Give respect, take respect” हे जमायला हवं.कारण “Respect” म्हणजे आयुष्यातील एक “strong pillar “…एकमेकांप्रती आदर असेल तर नाती निरोगी राहतात. नाहीतर एकमेकांना कायम कुणासमोरही अपमानास्पद वागवलं तर नात्याला वाळवी लागणार हे गृहीत धरायला हवं.

४) विश्वास (Strong Belief)-

प्रेम /नातं टिकतं ते विश्वासावर…पण विश्वासच नसेल तर नातं टिकणं फार अवघड असतं.मुळात एकदा विश्वास तुटला की नातही क्षणात तुटतं.ते पुन्हा जोडल जाईल की नाही याची शाश्वतीही देता येत नाही. एकमेकांवर निखळ विश्वास ठेवून अनेक शिखरं सर करता येतात.पण त्या विश्वासात सच्चेपणा हवा. लपवून छपवून एखादी गोष्ट करण्यापेक्षा विश्वासात घेऊन त्या गोष्टी केल्या तर नात्यातील विश्वासाची कक्षा हळुहळू रूंदावत जाते.

“I love you” पेक्षा ” I trust you” बोलल तर पंखात नव बळ येत. कारण कुणीतरी खूप छान सांगितलय की—-“You may not always trust the person you love…But you can always love the person you trust” (खरचं किती छान आहेत या ओळी….) पण त्यासाठी विश्वास जपणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वासात सच्चेपणा नसेल,त्याला तडा गेला तर मनात शंकेची वादळं तर येणारच…!!

५) Busy Schedule मधून वेळ काढणे-

माणूस कामात व्यस्त असतोच…पण या व्यस्त कामातून थोडातरी वेळ आपल्याला द्यावा असं जोडीदाराला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कामातून वेळच न देणं म्हणजे काय…??मला एकटीला/एकट्यालाच भेटावसं वाटतय,थोडीसुद्धा ओढ समोरच्याला नाही का..??कामातून मिळालेल्या वीस मिनीटापैकी मी फक्त पाच मिनिटं मागतेय/मागतोय… आणि ती हक्काची पाच मिनिटं मला मिळतील अशी गोंडस अपेक्षा नक्कीच कुणीही ठेवूच शकतं…

पण मग वेळच द्यावासा वाटत नसेल तर असं का…?? असा प्रश्न मनात गूढ निर्माण करतो.आणि जोडीदाराच्या प्रामाणिकतेवर शंका घ्यायला भाग पाडतो…..त्यामुळे अगदी किंचीतसा तरी वेळ देणं गरजेचं आहे. कारण कित्येक नाती ही वेळ न दिल्यामुळेच तुटली जातात.

नेहमीप्रमाणे, यासारख्या अनेक गोष्टी आहेत..जसे की—समजुतदारपणा , स्वातंत्र्य किंवा मोकळीक,मर्यादा , शारीरिक जिव्हाळा , (शारीरिक जिव्हाळा यासाठी की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपल्या जोडीदाराला डोळे मिटून घट्ट मिठी मारावीशी वाटते..आपल्या हक्काच्या कुशीत मन मोकळं करावस वाटतं)भावनिक जिव्हाळा ज्या जोडीदाराचा प्रामाणिकपणा स्पष्ट करू शकतात.

जोडीदार खरच प्रामाणिक आहे की नाही हे सांगायला निश्चितच मदत करू शकतात. ह्या गोष्टी इथे स्पष्ट केल्या नाहीत. पण संवाद, पारदर्शकता ,आदर ,विश्वास आणि वेळ….या पाच गोष्टी इथे स्पष्ट केल्या आहेत. आणि या पाच गोष्टीसुद्धा आपला जोडीदार प्रामाणिक आहे की नाही हे नक्कीच सांगू शकतात.आपल्यासोबत आपल्या जोडीदाराला आयुष्य जगायचय की नाही जगायचंय..?त्याला/तिला आपल्यात रस आहे…की कुठे दुसरीकडे मन Divert झालयं…

खरच आपल्याशी प्रत्येक गोष्टीत आपला जोडीदार loyal आहे नं…??आपण इतक्या विश्वासाने त्याला आपला जोडीदार म्हणून निवडलय..पण हा विश्वास प्रामाणिक असेल नं…त्यात खरेपणा असेल न…???अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला यातून कळू शकतात.हे या पाच गोष्टी अशा प्रामाणिक असणाऱ्या आणि नसणाऱ्या जोडीदाराच चित्र उत्तम रेखाटतील यात शंकाच नाही.

जोडीदार प्रामाणिक आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर या पाच गोष्टी आवर्जून लक्षात घ्या. या पाच गोष्टी सकारात्मकतेने आणि प्रकर्षाने जाणवत असतील तर तो जोडीदार प्रामाणिक असण्याचीच शक्यता जास्त आहे.त्यामुळे ह्या पाच गोष्टी जाणून घ्या.कदाचित मिळालेला जोडीदार हा प्रामाणिक असेल….आणि असा प्रामाणिक जोडीदार मिळाला याचं समाधान त्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय राहणार नाही…….. हे निश्चित…!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “या ५ गोष्टी सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!