मला इतकी का भिती वाटतेय ??? यावर उपाय काय ??
नयन शेलार
भितीच्या फक्त कल्पनेनेच भयभीत होणाऱ्या लोकवर्गात आपण मोडत तर नाही ना? तुम्ही स्विकार करा, नाहीतर करू नका पण आपली भिती उघडपणे भर माणसांत कबूल करणारा मनुष्य सापडणे थोडे अवघडच आहे. ‘मला भिती वाटते’ हेच स्वतःला सांगायच म्हटलं तरी खूप त्रास होतो. भिती हा एक असा भाव आहे जो हरेक पशु-पक्ष्यांमध्ये आढळतो. आत्मरक्षणासाठी या ब्रह्माण्डातून आपल्याला मिळालेली हि देणगीच म्हणा.
भिती ही आपली कमजोरी असते का? तर नाही. पण त्या भितीला लपवून ठेवणं, तिला नाकारणं ही आपली कमजोरी होऊ शकते. कधी कधी अविर्भावात काहीजण मला कशाचीच भिती वाटत नाही असं सांगतात. भलताच विनोद. हे म्हणजे शरीरात व्हिटॅमिन नसल्यासारखेच आहे. मग तर हा व्यक्ती रस्त्याने चालताना अचानक वाजलेल्या सायरनच्या आवाजालाही कानाडोळा करेल? कसं शक्य आहे? हृदयात धडधड करणार नाही का? पुढे साप आहे याची भिती वाटल्यामुळेच तर आपण स्वतःला सावरतो.. हो ना?
खरं तर भिती ही आपल्या बुद्धीचा अंशच आहे. यामध्ये काहीही चुकीचं वाटण्याची गरज नाही. भितीच आपल्याला आठवण करून देते की, मृत्यूही असतो आणि आपण मनुष्यप्राणी पृथ्वीवर काही दिवसांचेच पाहुणे आहोत.
एक दिवशी ओशोला कुणीतरी प्रश्न विचारला.
”जेव्हा भिती वाटते तेव्हा काय करावं?
”कशाला काय करायचंय. जेव्हा भिती वाटते तेव्हा भयभीत हो ! अगदी सोप्प आहे. भितीला येऊ दे. तू जीवनाला तुझ्यावर वर्चस्व करू का देत नाहीस? मालक तू आहेस कि जीवन?”
आपण भितीला मनात कोंडून ठेवतो आणि त्यामुळे मनावर काळजीचं ओझं तयार होतं, दडपण येतं. आपल्या भितीला प्रगट करणं हाच एक पर्याय आहे. आपल्या निकटच्या जिवलगांजवळ बोलून दाखवल्यास हेच ओझं कमी झाल्याचं जाणवतं. याचा अनुभव कधी तरी आला असेलच. भितीला कोंडून ठेवल्यास ती जास्तच जाणवते. त्यातून मानसिक त्रास होतो. तिला जर प्रगट केली तर मानसिक त्रासातून होणाऱ्या आत्महत्या नक्कीच थांबतील. त्या ऐवजी तिला बाहेर काढलं तर वादळानंतरची जशी शांतता असते तशीच शांतता जीवनात अनुभवायला मिळेल.
भितीला बाहेर काढा.
मनाला करा एकदाचं मोकळं.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
माझा मनात सुद्धा खूप भीती असते, मी नेहमी मनात भीती बडगायचो पण मी माझी भीती मला समजून घेणाऱ्या व्यक्ती कडे सांगायला लागलो थोडं काय होईना त्या वेडीला भीती नाहीशी होते पण पुन्हा ती कधी तरी समोर येतेच अशा वेडी परत त्या व्यक्ती समोर जाऊन ती भीती प्रकट नाही करू शकत.
Nice