Skip to content

लग्न न जुळणाऱ्या मुलामुलींचे मानसिक खच्चीकरण करू नका..

लग्न न जुळणाऱ्या मुलामुलींचे मानसिक खच्चीकरण करू नका……


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


लग्न आयुष्यातला एक “संस्कार” आहे. काही अपवाद वगळता लग्नाच्या प्रेमळ बंधनात कित्येकांना प्रवेश करायचा असतो.पण सगळ्यांचीच लग्न जुळतातच असं नाही.आयुष्याची वयं सरतात पण लग्न काय लवकर जुळत नाही.आणि यामुळे कित्येकजण मनाने हळुहळू तुटतात.

वेगवेगळ्या कारणामुळे हल्ली लग्न जुळणं कठीण झालय.पण लग्न जुळत नाही म्हणून घरातले नाही तर बाहेरचेच जास्त बोलत असतात. आणि बोलताना असं बोलतात की समोरचा मनाने पूर्णपणे खचायला लागतो.एखाद्याला लग्न जुळत नाही म्हणून असं सारख सारख बोलणं गरजेच आहे का…??

आणि इतरांच्या घरात, इतरांच्या आयुष्यात काय चाललय,कुणाच लग्न जुळतय,तुटतय या सगळ्याशी मुळात अशा लोकांचा काय संबंध..??त्यांना त्यांच्या आयुष्यात डोकावता येत नाही का…??

अहो नाही जुळत सगळ्यांचीच लग्न वेळेवर….पण म्हणून असं येता-जाता टोमणे मारायचे का…??टोमणे मारल्याशिवाय त्यांचा दिवस बहुधा चांगला जात नसावा…!!पण या सगळ्यामध्ये त्या मुला-मुलींचे मात्र खरच खूप हाल होतात. कधी कधी सगळं व्यवस्थित असूनही कित्येक लग्न जुळत नाही…मग त्यात लग्न नाही जुळाल तर उगाच नको ते टोमणे कशाला…???

समाजात, आजुबाजुला असे बरेचजण आहेत जे खूप विचीत्र विचीत्र बोलत असतात. आपण म्हणतोच की लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर का आणि किती परिणाम होऊ द्यायचा…??पण नकळतपणे त्यांच्या त्या निरर्थक बोलण्याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होतो.आयुष्यातील सगळे विचार सोडून “लग्न” आणि “लोकं काय काय बोलतायेत” या गोष्टीभोवतीच त्यांच मन गुंतलेलं असतं. कशामुळे ते पहा——————-

अहो ,वेळेवर लग्न करा नाहीतर पुढे खूप कठीण आहे ओ….
कसं जमायच ..???

इतकं बेढब शरीर..कोण मुलगी/ मुलगा देणार ओ…??
का जमत नाही ओ लग्न..??

काही प्रॉब्लेम आहे का…??
ईतक्यात जमायला हवं होतं ओ…

पत्रिका नाही जुळत का…??
काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच असणार म्हणूनच जुळत नाहीये…

आमच्या गुरूजींना एकदा दाखवून बघा पत्रिका..
तेवढच जुळाल तर जुळाल….
नाहीतर मी काय म्हणते आमच्या पाहण्यात आहे मुलं/मुली….विचारून बघते…तेवढीच तुम्हाला मदत….

बापरे…….!! हे तर काहीच नाही. पण “इतनी………. लंबी लिस्ट” सारखच हे असं बरच काही आपण ऐकतो.असं वाटतं की या बाहेरच्या लोकांनाच जास्त घाई झालेली असते लग्नाची.आपण तर ऐकतोच पण ज्यांच लग्न जुळत नाही तेही ऐकतच असतात…त्यांच काय होत असेल असं काही ऐकून…?? आणि हे असे टोमणे आपल्यामुळे घरच्यांनाच जास्त झेलावे लागतात यामुळे तर त्या मुलामुलींच मानसिक संतुलनच बिघडायला लागतं. मन थाऱ्यावर राहतच नाही. सतत मनात नकोनको ते विचार येत रहातात.

छत्री नसताना अचानक पाऊस येतो तेव्हा त्रेधातिरपीट उडतात….अगद तसच…या मुलामुलींची झोप कायमची उडते.आपलं लग्न जुळेल की नाही? कधी जुळणार.??आपल्यामुळे घरच्यांना किती त्रास सहन करावा लागतोय…??आणि आता मलाही सहन नाही होतं…एकदाच लग्न जुळायला हवं वगैरे वगैरे. असा मुलांच्या मनात अक्षरशः विचारांचा गोंधळ माजतो……!!

मुलामुलींच असं मानसिक संतुलन बिघडवण्यापेक्षा त्यांना मानसिक आधार देण जास्त गरजेचं असतं.लग्न जुळत नाही म्हणून डिवचण्यापेक्षा “होईल लग्न” असं म्हणून चार चांगले शब्द बोलले तर काय बिघडत का यांच…??पण नाही…”आम्हाला चांगल बोलताच येत नाही….” असं नेहमी ती लोकं निदर्शनास आणून देतात.लग्न जुळण्याआधीच त्यांच मन इतक तकलादू करायच का..???का आणि कशासाठी हे मानसिक खच्चीकरण….??त्या मुलामुलींना काय वाटत असेल अशा बोलण्याने याचा जरासुद्धा विचार ही लोकं का करत नाही तेच कळत नाही.

लग्न आहे ते…आज ना उद्या जुळणारच….!! आणि नाहीच लवकर जुळाल लग्न तर— एखाद्याला “तुझ्यावर आभाळ कोसळय” अशी जाणीव का करून द्यायची..??काय लग्न न जुळण म्हणजे आभाळ कोसळण,सगळ संपून जाणं असतं का…??आणि आजकालची लग्नाबद्दलची बदलेली मानसिकता यामुळे जर लग्न जुळत नसेल तर…त्यांच्या त्या बदललेल्या मानसिकतेला सारख दोष देऊन तुमची मानसिकता बदलली की आपोआप जुळेल लग्न……. असं बोलून त्यांच्या मनाची घालमेल अजून वाढवू नका.आमच्या वेळेला असं नव्हतं….तुमच काय जरा अतिच होतय….हे असलं काहीही बोलून त्या तारूण्याला ,नुकत्याच फुललेल्या कळ्यांना नी फुलांना असं सुकवू नका….!!

लग्न न जुळण्यामागे बरीच कारणं असतात…ती कारणं कधी स्पष्ट तर कधी अगदी अस्पष्ट असतात.आणि लग्न जुळण/ जुळवण म्हणजे परिक्षेतल्या “Match the pair” अर्थातच जोड्या लावा या प्रश्नासारख मुळीच नसतं.(कधीकधी हा प्रश्न सुद्धा खूप अवघड जायचा) सगळच मनासारखं होत नाही.

आणि मनासारखं व्हायलाही वेळ लागतोच.अगदी तसच लग्न जुळायला वेळ लागणं स्वाभाविक आहे.आणि…..”इतके दिवस योग नव्हता लग्नाचा ,त्याला जेव्हा यायचय तेव्हाच तो येणार……….आणि आज आला तो योग” असं लग्न जुळल्यावर बोलणारे आधीच सगळी “negativity” मुलामुलींच्या मनात पेरत असतात. जाऊदे,असही आता माझं लग्नाच वय गेलय,मला कोण मुलगा/मुलगी देणार….???….,

माझी इच्छाच नाही आता लग्न करण्याची , मला वाटत नाही आता माझं लग्न जुळेल…,काही न काही कमीच पडतय नेहमी…माझ्यामुळे घरचेही मनाने थकले असतील….आता माझ्या सगळ्या आशा संपल्या आहेत….जुळाल तर जुळाल नाहीतर आता बस्…..!!! हा असा ईतका विचार करू लागतात मुलं.इतके ते मनाने खचलेले असतात. वाटत किती निर्लज्जपणाचा कळस गाठतात ही लोकं…एका क्षणात कसं मानसिक खच्चीकरण करतात ही लोकं…लग्न न जुळलेल्या मुलामुलींच…..!!

अरे ,लवकर लग्न नाही जुळल तर हे होईल ते होईल…असं मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा—तुम्हाला हवा तसा “compatable” अगदी मनासारखा जोडीदार लवकरात लवकर नक्कीच मिळेल.कधीतरी बांधल्या जाणारच तुमच्या रेशीमगाठी…. असं बोलून थोडे आशेचे पंख लावाना त्यांच्या मरगळलेल्या मनाला…..!!

आणि आशेचे पंख लावता येत नसतील न…तर कमीत कमी त्यांच मानसिक खच्चीकरण तरी करू नका………आणि आपल्या स्वतःच्या घरातही अस होऊ शकतं…आणि आपण जे दुसऱ्यांना बोलतो तेच चुंबकासारख आपल्याकडे पुन्हा attract होत असतं.त्यामुळे कुणाच चांगल करता येत नसेल तर नका करु..,पण कुणाच वाईटही करू नका.

खरचं अशा लग्न न जुळणाऱ्या मुलामुलींच मानसिक खच्चीकरण (अगदी कुणीही) करू नका.कधीकधी आपल्याला छोटे वाटणारे आघात हे खूप मोठे असु शकतात.त्यामुळे इतरांची “Mental Health” बिघडणार नाही याची आवर्जून काळजी घ्या.लग्न लवकर जुळल नाही तर काय काय होतं याबद्दल चुकीचे गैरसमज पसरून मुलांच्या आयुष्याची उगाचच हेळसांड करू नका.उरल्या-सुरल्या आयुष्यात त्यांना मोकळेपणाने बहरूद्या…..!!

आणि लग्न जुळलं की तुम्हाला लग्नाला नक्की बोलवणार…..मात्र तुर्तास तरी या मानसिक खच्चीकरणाला पूर्णविराम द्यावा ही कळकळीची विनंती…!!

कळावे,

(लग्न न जुळलेली मुलं/मुली)


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “लग्न न जुळणाऱ्या मुलामुलींचे मानसिक खच्चीकरण करू नका..”

  1. माझं पण लग्न झालेलं नाही मला पण असेच लोक मित्र नातेवाईक टोमणे मारत असतात कधी जमणार तुझं लग्न कसं होणार तुझ्या तुझ्या बरोबरच्या मुलांची लग्न झाले वगैरे वगैरे असे टोमणे मारत असतात मला पण मी या गोष्टी मनावर घेतो

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!