आजचं प्रेम खूप फास्ट होतंय, कारण त्याला बंद खोलीत शिरायचं असतं.
सोनाली जे.
आज ची पिढी , टेक्नॉलॉजी , सगळेच सुपरफास्ट आहे. म्हणूनच तर अंतराळात , चंद्रावर , अंतरीक्ष मोहीम ही झाली ना.. आज प्रत्येकाला फास्ट results पाहिजेत..ऑनलाईन परीक्षा दिल्या की इकडे लगेच results आलेच..सगळ्याच गोष्टी मध्ये अशीच घाई घाई..तूप खाल्ले की रूप लगेच आलेच पाहिजे अशी आशा..पी हळद हो गोरी …हे शक्य आहे का लगेच..कोणत्याही गोष्टीला योग्य तेवढा वेळ द्यावाच लागतो.
शेताची आधी नांगरतात ,मशागत करावी लागते. बीज पेरणी होते.. काही बीया उगविण्यापूर्वी काही दिवस पाण्यात भिजत घालावं लागतात. आणि मग ते बीज पेरून पहिला कोंब फुटतो..मग हळूहळू फांद्या आणि झाडं वाढू लागतात.मग त्याला कळ्या येतात, कळीचे रूपांतर फुलात आणि फुलाचे रूपांतर मग फळात..जसे आंबा फक्त उन्हाळा सीझन मध्येच फळ खाता येते..
म्हणजे आंबा परिपक्व होतो .त्या आधी डिसेंबर पासून बारीक मोहोर येतो , त्यातला काही गळून जातो आणि काहीच्या कैऱ्या होतात..आधी छोटी असणारी कैरी हळूहळू मोठी होवू लागते ..एप्रिल मे मध्ये त्या व्यवस्थित मोठ्या होतात आणि मग काढण्या योग्य झाल्या की त्या झाडावरून उतरवून मग त्याची अढी लावतात अगदीच तयार होण्या पूर्वी दोन चार दिवस आधीच पेट्या भरून ठेवतात..आणि पाठवितात..
थोडक्यात मोहोर आल्यापासून कैरी मध्ये रुपांतर आणि मग परिपक्व, गोड मधुर आंबा खाण्यासाठी पाठविला जातो..म्हणजे डिसेंबर ते मे जवळपास पाच महिने आंबा फळ येण्याकरीता…आणि त्या आधी झाडे लागवड अनेक वर्षे..
असेच नात्यांचे ही आहे ..नाती ओळखण्याकरिता , ती वृध्दींगत होण्याकरिता आणि परिपक्व आणि त्यात आपुलकी , ओढ निर्माण होण्याकरिता किंवा नात्यामध्ये एक रेशमी न तुटणारा घट्ट असा बांध तयार होतो.
आजकाल मुलांना प्रेम म्हणजे काय हेच समजत नाही…एखादी मुलगी , मुलगा दिसले ..बाह्य रुपी आवडले की काय सुंदर आहे तो किंवा ती, गोरी पान , नाक चाफेकळी , गाला वर गोड खळी पडते.. काळे भोर टपोरे डोळे, नाजूक ओठ, उंच , बारीक ,केसांचा मस्त हेअर कट …किंवा तो असेल तर देखणा , उंचापुरा, जिम मध्ये जात असावा, नाक सरळ एकदम तरतरीत, डोळ्यात मधले भाव ..ती तीक्ष्ण नजर ..अहाहा हँडसम च जणू..
झाले एकमेकांच्या प्रेमात पडतात..मग भेटणे , फिरायला जाणे, फोन कॉल्स ..सतत एकमेकाच्या सोबत असणे .त्यातून हलकासा स्पर्श ..रोमांचित करणारा हा अनुभव , मग तो सारखा हवाहवासा स्पर्श त्यातून कधी कोणी बघत नाही ना किंवा जरी बघितले तरी घट्ट मिठीत घुसणे आणि त्या पुढे जावून ओठांचे मिलन असेल त्यातून पुढे हे गृहितच धरले जाते की आपण आता कायम एकत्र च असणार ..
आपल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात च होणार आहे तर मग लग्नाआधी भेटलो , एकत्र आलो मिलन झाले तरी काय आपण आज ना उद्या एकत्र येणारच की असे विचार किंवा अशी मानसिकता होत चालली आहे मुला मुलींची मग भेटीची ओढ आणि मग त्याकरिता कुठे तरी बंदिस्त खोलीत प्रेम हे नाव देवून शरीराची ओढ आणि भूक भागवत जायची असे म्हणले तरी गैर होणार नाही .
प्रेमाचे रूपांतर लग्नापूर्वी च बंदिस्त खोलीत एकत्र येण्यात होत आहे याला कारणे ही तशीच आहेत, मुलामुलींचे एकत्र शिक्षण, घरातून मुला मुलींना मिळालेले स्वातंत्र्य मग ते अभ्यास किंवा मित्र मैत्रिणी , नाही तर हॉटेलिंग , पिकनिक , पार्टीज या कोणत्याही नावा खाली असेल..
शिवाय खर्चाला हातात मिळणारा पैसा…आवश्यक वस्तू झाल्या आहेत मोबाईल , गाडी, लॅपटॉप, इंटरनेट ..आणि या सोशल मीडिया माध्यमातून , movies मधून खूप गोष्टी एक्सपोज होतात, त्यातून अश्लील छायाचित्रे , पिक्चर ..you tube , विविध पोर्न व्हिडिओज , यासारख्या गोष्टी बघून आणि स्वतः ला जसे वागायचे त्यावर उगीचच पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव हे लेबल लावून मुक्तपणे वागणे , यात गैर असे काहीच वाटत नाही..
नंतर एकत्र येणार आहोतच तर मग आता का नको ..म्हणून एकदा एकत्र आले कधी कधी चुकून खूप भावनिक होवून शरीराने ही एकत्र व्हावे ही ओढ इच्छा निर्माण होते…हे दोन शरीरामध्ये वाढते आकर्षण असते.आणि यातून एकदा एकत्र आल्यावर , किंवा पुरुषांना , मुलांना जास्त ओढ असते याची स्त्रिया मुली जरा बुजर्या असतात..
पण मुले कधी प्रेमाने , लाडाने , कधी लटके रागावून तर कधी चिडून तर कधी मुली ना तू मागास च आहेस विचारांनी …पुढे कसे पटणार मग चिडून दूर जातील या भीतीने ही मुली त्यांच्या या विचार किंवा मागणी ला हो म्हणतात .कधी कधी मुली सुधा खूप पुढारलेल्या असतात किंवा काही वेळेस मुलींना हे हळुवार चे स्पर्श जास्त आवडू लागतात आणि ते हवेहवेसे वाटू लागतात दोघांना ही त्या ची हुरहूर वाटू लागते आणि त्या पुढचे एकत्र आल्यावर आपोआपच होत असते..कधी सुरुवातीला एकदा झाले की काही वेळेस ती आवड किंवा परत परत ती ओढ त्यांना बंदिस्त खोलीत घेवुन जाते.
यात बरेचदा एकमेकांचे स्वभाव कसे आहेत, आवडी निवडी , छंद , प्रोब्लेम solving , reasoning capacity कशी आहे , कठीण प्रश्न ,प्रसंग आले तर दोघेही कसे face करतील या गोष्टींचा अभ्यास करत नाहीत .किंवा आपले ध्येय पूर्ण करून मग बाकी गोष्टी मध्ये शिरत नाहीत.. आर्थिक स्वावलंबन , आणि लाईफ लाँग प्लॅन्स करतातच असे नाही…
दोघांच्या relations मध्ये फक्त बाह्य गोष्टींचे, शरीराचे आकर्षण न ठेवता विचारपूर्वक पुढच्या गोष्टी कराव्यात. स्वभाव , तडजोड करण्याची तयारी , एकमेकांची सहनशीलता , कोणत्याही प्रसंगी एकमेकांना समजून घेण्याची क्षमता या गोष्टी बहुदा या कोणाला महत्वाच्या वाटत नाहीत.
आणि बरेचदा प्रेम म्हणजे त्याच रूपांतर शारीरिक जवळीक एवढेच समजले जाते …
सगळ्या आनंदी , सुखाच्या गोष्टीचं असतात असे वाटत असते..याउलट काही परीक्षेची वेळ ही आयुष्यात येवू शकते याचा दूरदर्शी विचार , तार्किक बुध्दी याचा वापर च करत नाहीत तर केवळ क्षणिक आणि क्षणिक सुखाच्या, आनंदाच्या ,प्रेमाच्या मागे लागतात .लाँग टर्म relations चे विचार किंवा प्लॅन्स ही करत नाहीत…
समाज , घरचे , मित्र मैत्रिणी , शिक्षक, ऑफिस मधील सहकारी यांच्या पासून लपून , घाबरून पण प्रेमात वाहवत जावून बंदिस्त खोलीत शिरायची याखुप फास्ट प्रेमाला फास्ट घाई झालेली असते.. त्यांची गाडी रेल्वे सारखी हळूहळू स्पीड पकडुन तो स्पीड मेन्टेन करण्यासारखी नसते तर सुरुवाती पासून फास्ट स्पीड पाहिजे मग पुढे जावून धडपडले तरी चाल अशी त्यांची अवस्था असते ..
आणि जे सगळे विचार करून , पुढची आपली सगळी तयारी , लाँग टर्म प्लॅन करून , relations healthy maintain करून पुढे प्रेमाची पुढची पायरी किंवा एकदा तरी चव घ्यावी म्हणून जसे लग्नापूर्वी एखादी मिठी ही रोमांचित करते तसे रोमांचित होवून पुढची स्टेप ही घेतात.
पण सभोवतालचे वातावरण , मोकळेपणाने सगळ्या विषयावर होणाऱ्या चर्चा, व्हिडिओज , आकर्षण यातून शरीरातील हार्मोन्स मध्ये खूप बदल होतात…
आणि त्यातून संभोग करिता उत्तेजीत करणारे स्त्री पुरुष या दोघांच्या हार्मोन्स creation मुळे आपोआपच बंदिस्त खोलीचा सहारा प्रेमात घेतला जात आहे..शाळा ,कॉलेज , ऑफिस मधील टूर मूळे सतत एकत्र येणारी ही पिढी त्यांना समोरासमोर आले की फार काही वेगळे सांगायची करायची गरज पडत नाही..ते flow सोबत आपोआप पुढे जात असतात.
आपली संस्कृती , घरचे , नातेवाईक , आणि लाँग term परिणाम यांचा विचार केला तर बरेचदा आपले प्रेम ही खूप छान रीतीने आणि ग्रेस फुली आपण शारीरिक जवळ साधण्यात लग्नानंतर ही करू शकतो.. पण आजची सुपरफास्ट पिढी सगळ्या गोष्टी सुपरफास्ट करते..क्षणात प्रेम होते, क्षणात आकर्षण , रोमांचित, क्षणात रोमान्स आणि त्यापुढे क्षणात शरीर मिलन ..आणि काही वेळेस क्षणात दुरावा ही..
सगळ्यांवर नियंत्रण ठेवता येते..स्वतचं विचार , भावना , आकर्षण यावर स्वतः चा कंट्रोल ठेवला , व्यवस्थित नियोजन केले तर आणि कधी कधी मोठ्यांना विश्वासात घेतले तर आपण आयुष्यात योग्य मार्गानेच जावू..प्रेमाची परिपूर्णता ही शारीरिक संबंध आणि मिळणारी शांतता यात च नसते तर काही वेळेस ती तुमचे मनोनिग्रह , भावनांचा आदर , नियंत्रण कधी कधी त्याग , किती ही वाटले भावनांनी किंवा शरीराने हावी होण्याचा प्रयत्न केला तरी त्या क्षणी तटस्थ राहून पुढच्या चांगल्या क्षणांकरिता आताच्या क्षणिक सुखाचा त्याग..ही प्रेमाची परीक्षा किंवा परिपूर्णता च म्हणता येईल ना!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


