मुलीनेही लग्न करून नवऱ्यास आपल्या घरी आणावे का??
सोनाली जे.
आपल्या भारतात दोन प्रकारच्या कुटुंब पद्धती आहेत.
१. पितृ सत्ताक पद्धती ..
२. मातृ सत्ताक पद्धती..ही बहुदा आदिवासी भागात दिसते.
बहुतेक वेळी स्त्री लग्न करून सासरी येते.तिथं आल्यावर सगळ्यांचे स्वभाव वेगवगळे..सर्वांशी पटवून घेणे.आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे..यात प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात.कोणाला काय आवडते कोणाला काय नाही याचा अभ्यास च जणू. त्यानुसार पदार्थ असतील , किंवा बोलणे असेल वागणे , कोणी तापट असेल तर त्याच्या किंवा तिच्या बरोबर कसे वागायचे , शांत कसे राहायचे स्वतः किंवा त्यांना कसं शांत करायचे या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.
इतके वर्ष मुलगी सासरीच येत असे म्हणून पुढेही तसेच चालू ठेवायचे का? का बरे मुलगी लग्न करून नवऱ्यास आपल्या घरी घेवून आली तर?..काय होईल बरे ?
१. अशी बदलती परिस्थिती घडविणे थोडक्यात क्रांतीच की भले आदिवासी अजून ही कुटुंब पद्धती वापरत आले आहेत.. पण आपल्या इथे ही क्रांती घडविताना मुलाची , मुलाच्या घरच्यांची आणि समाजाची ही मानसिकता , विचार सरणी बदलावी लागेल.समाज किंवा आपलेच नातेवाईक सहज प्रतिक्रिया देत असतात.किंवा अगदी स्वच्छ सांगायचे तर टोमणे मारतात की मुलगा काही करत नाही..घरजावई करून घेतला..
मुली कडचे गडगंज आहेत त्यामुळे त्याला काही करायची गरज नाही.म्हणून मुलीला सवय नाही , एकुलती एक आहे..ती म्हणेल ती पूर्व दिशा त्यामुळे जावई च घरी आणला ..मुली मध्ये किंवा मुला मध्ये खोट असेल. काही करत नाही मग मुलीची जबाबदारी कसे घेणार म्हणून घर जावई..
असे एक ना अनेक उलट सुलट विचार करतील.थोडक्यात घरच्यांची आणि समाजाची मानसिकता , विचार सरणी बदलणे गरजेचे ..तर मुलगा लग्न होवून मुलीच्या घरी राहण्यास येईल हे मान्य होईल समाजाला..आपल्या लोकांना.
२. मुलीच्या घरी काही अडचणी असतील जसे तिचे आई वडील आजारी, वयस्क कोणी बघणारे नसेल ..परावलंबी असतील , मानसिक आजार असतील , तरी सुधा एकमेकांच्या सहमतीने मुलगा मुलीच्या घरी राहण्यास येवू शकतो.कारण प्रत्येक वेळी मुलगी अडचणीच्या वेळी माहेरी येणे शक्य नसते किंवा रोजच त्यांना आई वडील यांना सोबत पाहिजे असेल मग वेळीच धावपळ करण्याकरिता असेल किंवा मानसिक दृष्ट्या जसे की हालचाल करता येत नसेल तर नकारात्मक भावना मनात येत राहतात.
एकटे पणाची भावना तेव्हा कोणी तरी आपले सोबत असावे ही जाणीव किंवा गरज..किंवा छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत स्वतः इच्छा असून करू शकत नसतील तर helpless आहोत ही भावना त्यातून होणारी चिडचिड असेल, mood swing असतील, किंवा विक्षिप्तपणा असेल किंवा डिप्रेशन यात आपली व्यक्ती सोबत असेल आणि काळजी घेणारे तर मानसिक आधार आणि शारीरिक दृष्ट्या ही करणारे कोणी आहेत सोबत हे त्यांना जगण्यास उभारी देते.
३. अजून एक समज की मुलगा सासरी गेला राहायला म्हणजे त्याला घरगडी म्हणून राबविणार ..असे विचार ही चुकीचे असतात… मुलगा मुलगी उच्च शिक्षित असू शकतात..चांगल्या ठिकाणी जॉब करणारr, स्वतः चा व्यवसाय करणारे ही असू शकतात. किंवा याउलट ही असू शकते की खरेच मुलगा काही करत नाही , जॉब गेला आहे ..पण तो पुढे जावून काही करेल ही आणि जरी नाही केले तरी आता आपल्या आई वडील यांच्याकडे पूर्ण लक्ष देवून , त्यांची काळजी घेणारा आहे.
जसे मुन्नाभाई मध्ये रुस्तम चे पप्पा खाणे पिणे सोडून देतात ज्यूस पिणे ही सोडून देतात .जगण्याची उमेद संपते तेव्हा मुन्नाभाई त्यांच्या आवडत्या गोष्टी जसे कॅरम आणून त्यांच्या समोर खेळायला सुरुवात करतो ..त्यांची आवडती गोष्ट बघितल्यावर पप्पा ही उठून queen आणि cover घेतात आणि सोबत ज्यूस ही आणि आपणहून जेवणाची इच्छा ही..म्हणजे काय तर त्यांच्यातली निराशा दूर करून जगण्याची उमेद वाढविणारे कोणी असेल तर ते आनंदी आणि उत्साही राहतील .
केवळ काही adjustment किंवा विचार करून , गरज ओळखून सगळ्यांच्या मताने निर्णय घेतला जातो. आणि त्यात मुलाच्या आई वडील यांनी ही कॉन्सेप्ट मान्य करून , गरजा ओळखून , हे बदल स्वीकारणे ही गरजेचे असते.
४. काही वेळेस मुलीच्या माहेरचे खरेच खूप श्रीमंत असतील , परंपरागत मोठा व्यवसाय असेल तो सांभाळणारे कोणी नसेल आणि जावई त्याकरिता योग्य असेल तरी सुधा आर्थिक नुकसान होवू नये, व्यवसाय पुढे नीट सांभाळला जावा हा दूर दृष्टिकोन ठेवून रोजचे निर्णय एकत्र घेण्यासाठी , सल्लामसलत करण्या करिता एकत्र असणे गरजेचे असते..त्यामुळे ही नवऱ्याला लग्न करून आपल्या घरी घेवून येवून प्रगती साधली जाते.
५. लग्न झाल्यानंतर काही वेळेस नवऱ्याची नोकरी गेली, व्यवसायात नुकसान झाले ..अपघात ..किंवा दुर्धर आजार असे असेल , नैसर्गिक आपत्तीत जसे भूकंप , पूर यात घराचे नुकसान झाले असेल, किंवा जुन्या building मुळे ही घर कोसळणे यासारखे अपघात ही असतील तसे आणखी ही काही कारणे , यातून मानसिक संतुलन ढळले असेल, त्याला एकटे सांभाळणे मुलीला अवघड वाटत असेल आणि सासरी काळजी घेणारे कोणी नसेल मुलीच्या माहेरी तिचे आई वडील , भाऊ काळजी घेणारे असतील, आर्थिक किंवा मानसिक आधार दोन्ही ही..तर मुलगी नवऱ्याला आपल्या घरी घेवून येवू शकते.
किंवा नवरा बायको दोघेही नोकरी , व्यवसाय यात बिझी असतील तरी चांगला विचार म्हणून बाळ झाल्यावर ही बाळाची काळजी घेणारे असतील..तर तिच्या माहेरी म्हणजे मुलीच्या घरी राहण्यास मुलाची तयारी असते कारण रोजची धावपळ आणि सततचे टेन्शन , स्ट्रेस यात मुलांची संगोपनाची गरज पूर्ण करू शकत नसतील वेळ देवू शकत नसतील काही गोष्टी शिकवू शकत नाहीत. अशावेळी बाळाच्या संगोपन किंवा त्याची काळजी या हेतूने ही निर्णय घेवू शकतात.
मुख्य म्हणजे आता बदलती परिस्थिती, बाहेरील जगात येणारे चांगले वाईट अनुभव , uncertain life, insecure Life, किंवा एकमेकांना समजून घेवून आनंदी जीवन जगण्याकरता काही बदल स्वीकारावे लागतात . त्याप्रमाणे लग्नानंतर मुलीने नवऱ्याला आपल्या घरी कायमचे असेल किंवा तात्पुरते आणले ..राहिले तरी ते accept करावे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Mast
लेख खूप छान आहे