It’s My pleasure.
बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर pleasure गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी OLX वर pleasure sell ची add टाकली, ‘want to sell for Rs. 30,000….’
कुणी 15 हजारांत मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजारात मागितली. पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने कुणालाच ‘हो’ म्हटले नव्हते…
थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला… “साहेब, 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबाल का, माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात, ते बघतो. पण pleasure मलाच द्या… माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे, असे मला वाटते. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती नाही घेऊ शकत…”
मी फक्त ‘ok बघू’, असे म्हणालो आणि फोन ठेवला…
नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून म्हणालो, “जरा थांबा, मोबाइल विकू नका. उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजारामधे……”
माझ्यासमोर 28 हजाराची आॅफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला 24 हजारामधे pleasure देणार होतो….
आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल..? उद्या त्यांच्या घरी pleasure येणार ……
आणि यामधे माझे काहीच loss होत नव्हता… कारण मला परमेश्वराने खूप काही दिले आहे. आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर …….
दुसरे दिवशी 50, 100, 500 च्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली. सकाळपासून त्याचे पाच वेळा फोन… ‘साहेब मी पैसे घेवून येतोय, पण गाडी कुणाला देवू नका..’
माझ्या हातात पैसे दिल्यावर, त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली, की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करून आणलेत….
ऑफरपेक्षा चार हजार कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही, उलट त्याच पैशातील 500 रूपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी बहिण म्हणाली, ‘घरी जाताना मिठाई घेवून जा….’
डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस pleasure घेऊन गेला…
आपण सहज reply करतो, ‘It’s my pleasure’….
पण आज pleasure scooter विकताना कळलं…
Pleasure म्हणजे शेवटी काय असतं ते..?
*जीवनात काही व्यवहार करतांना फायदाच बघायचा नसतो,,,,,,,,???…..
आपल्यामुळे एखाद्याला भेटलेला आनंद बघायचा असतो !!!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
खूप छान?✊?
खूप सुंदर लेख.
माझी विचारधारा अशी, की जर आपण एखादी वस्तू आपल्याला परवडत नाही पण मुलांच्या किव्हा कोणी जिवलागाच्या कुशी खातिर आपला सर्वस्व विकून घेतो, तेव्हा आपण त्यांना एक वाईट सवय लावून देतो ती म्हणजे आपल्याकडून कुठल्याही परिस्थितीत काहीही प्राप्तीची अपेक्षा. याउलट आपण त्यांना समजवायला हव की ही वास्तू आपल्या ऐपती बाहेरची आहे पण योग्य परिस्थिती आल्यावर आपण योग्य वास्तू नक्की घेऊ. याने आपण त्यांना कुठल्या जागी काय योग्य आहे, ते शिकवतो आणि ही शिकवण खूप गरजेचं आहे.
खूप छान लेख.
सदर लेखात खरे मानसिक समाधान काय आहे नि ते कशामुळे प्राप्त होऊ शकते याची अनुभूती देणारा उत्तम लेख
एकदा छान..,