Skip to content

बेडवर असताना एका पत्नीची पतीविषयी ही कम्प्लेंट कायम असतेच!!

बेडवर असताना एका पत्नीची पतीविषयी ही कम्प्लेंट कायम असतेच!!


टीम आपलं मानसशास्त्र


विजयाचे तसे लव कम अरेंज मॅरेज. लग्नाआधी विपुल आणि तिची ओळख होती, नात्यात असल्याने एकमेकांबद्दल माहिती होती. विजया आधी जॉबला होती, स्वतंत्र विचारांची विजया लग्नानंतर पूर्ण बदलली. सुरुवातीला हे बदल हवे हवेसे वाटले.

घरकाम करणं, टिपिकल साडी मध्ये वावरणं, पाहुणचार करणं, नवरा सांगेल तसं वागणं हे सारं नवीन असल्यामुळे ती आवडीनें करत होती. घरात सासू सासरे वयस्कर तसेच जुनाट विचारांचे, तरीहि त्यांच्या स्वभावाशी तीने जुळवून घेतले.

माहेरी येणे जाणे ह्यावर तिचे स्वतःचे असे काहीच मत नव्हते, नवरा ठरवेल त्या दिवशी जायचे आणि सांगेल त्या दिवशी यायचे. तिने ह्या सर्वाचा कधी आक्षेप घेतलाच नाही कारण प्रत्येक बाईच्या जीवनात हे असेच असते असे तिला वाटे. दिवसभर घरात स्वतःला कशाततरी व्यस्त करून ठेवायचे, संध्याकाळ झाली की नवरा यायची वाट पहायची. त्याचा स्वतःचा बिझिनेस असल्याने वेळेचा ताल तंत्र नसे, कधी कामामुळे उशीर तर कधी मित्रांसोबत पार्टी मुळे उशीर, अशी ठरलेली कारणं असायची.

स्वमर्जीने ओढवून घेतलेले बदल आता पिंजऱ्यात अडकल्यासारखे वाटू लागले. विपुल रात्री उशिरा आला की बेडवर डायरेक्ट जवळीक साधत असे, ना बोलणे ना प्रेमाने कुरवाळणे, काम करून झाले पाठ फिरवून झोपत असे. विजया मात्र छताकडे सताड डोळे उघडे ठेवून तशीच पडून राही.

सुरुवातीला नवं नवीन छान वाटायचे. तो स्पर्श, ते श्वास, ती मिठी ह्या सर्वांचा कधी कंटाळा येईल असे वाटलेच नव्हते. पण बेडवर विपूल फक्त त्याच गोष्टीसाठी जवळ येत असल्याने विजया बऱ्याचदा मन मारून प्रतिसाद देत असे. कुठे येणं जाणं नाही, कोणाशी बोलणं नाही घरात आपलं एकल कोंड्यासारखं राहणं तिला सहन होत नव्हतं.

तिच्याही काही अपेक्षा असतील, रात्र फक्त एकच गोष्टी साठी असते का ? हा प्रश्न तिला आतून सतत टोचत असे. सहन करण्याची पण एक सीमा असते, विजयाने ती सीमा कधीच पार केली होती. आता ती फक्त एक शरीर म्हणून बेडवर होती, मन तर कधीच कोमेजून गेलं होत.

तिच्या अशा तुटक वागण्याचा विपुल वर काहीच परिणाम होत नसे, बिझिनेस आणि मित्र ह्याशिवाय त्याला दुसरे काही दिसतच नसे. बायको फक्त घरकाम आणि आपल्याला entertain करण्यासाठी असते असे त्याला वाटे. उदास विजया कोणाकडे मन मोकळे करायला पण भित असे. उगीच बाहेर कोणाला समजले तर नावाची बदनामी नको म्हणून आहे ते दिवस ढकलायचे एवढेच तिने मनाशी ठरवले होते.

वर वर दिसणारा हसरा चेहरा आतून किती सुकला आहे ह्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. स्वतःच्या हक्काची मालमत्ता असल्यासारखे तो तिला वागवी. खरं म्हणजे ती हक्काचीच होती पण तो हक्क अगदी चुकीच्या पध्दतीने गाजवत होता.

प्रत्यके स्त्रीच्या शरीरात एक मन असते. बायको म्हणून ती तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करत असते, मग तुम्ही तिच्या मनाच्या भावना का नाही समजून घेऊ शकत. बेड फक्त झोपण्यासाठी नसतो, तिथे भावना पण शेअर केल्या जातात. विजया आतून खुप खचत चालली होती, हळू हळू तिचा संसारातला रस सुध्दा कमी होऊ लागला.

विपुलकडे काही बोलायचे म्हटलें तर तेवढ्यापुरता तिला दिलासा देत असे पण काही दिवसांत आहे तसाच वागत असे. तिला आता ह्या सर्वाची सवय होऊ लागली. रात्र झाली कामं आवराली की काही संवाद न करता डायरेक्ट बेड वर आणि लाईट्स ऑफ…. एवढं मात्र खरं, जे आहे ते बदलणारं नाही निदान एक स्त्री म्हणून ती सर्व सहन करू शकते.

विजयाला फार तर फार काय हवं होतं ? रात्री नवऱ्याने बेडवर थोडं मिठीत घेऊन दिवसभराची विचारपूस करावी. संबंध ठेवण्याआधी तिचा मूड आहे की नाही ह्याचा आढावा घेऊन पुढाकार घ्यावा. वाचायला थोडं जड जाईल पण बायको ही रात्रीची फक्त झोपायला किंवा हात पाय दाबून द्यायला नसते, तिलाही मन असते, दोन शब्द प्रेमाने बोलून बघा, सारं काही हसून उधळून लावेल.

ती घरीच असते म्हणजे तिच्याकडे बोलण्यासाठी काय असेल ? हा विचार करून तुम्ही बोलणं टाळता पण एकदा विचारून तर बघा, कसा होता आजचा दिवस ? मग समजेल तिला किती बोलायचं असतं तुमच्याशी… तुम्ही शेअर करा तुमचा आजचा दिवस, न कंटाळता ती किती आवडीने ऐकते ते बघा.

लाईट बंद झाली की संवाद संपत नाहीत तर सुरू होतात , आपुलकीचे. थोडं तिचही कधी डोकं दाबून द्या, उगीच काही गरज नसतात, बघा किती समाधान दिसेल तिच्या चेहऱ्यावर. कधीतरी तिला सहजच मायेने जवळ घ्या. पाठीवर हात फिरवत तिलाही थोपटा, बघा किती शांत झोप येईल तिला. तिच्या मनात खुप कालवा कालव असते दिवसभराची एक चुंबन फक्त माथ्यावर द्या, बघा किती स्मित हास्य उमटेल…

हे सर्व नक्की अनुभवा कारण, बायको आहे ती, तिच्याही काही अपेक्षा आहेत. बेडवर तिला नुसते नीजायचे नसते तर तिला ते सुख अनुभवायचे असते. खेळणं बनवू नका तिला, हवे तेव्हा तुमच्या तालावर नाचेल. थोडं तुम्ही समजून घ्या बाकी ती तुम्हाला समजून घेईलच….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “बेडवर असताना एका पत्नीची पतीविषयी ही कम्प्लेंट कायम असतेच!!”

  1. आरती राऊत

    हे सर्व जरी काल्पनिक लिहिला गेला असेल तरी अशे उदाहरण पाहायला मिळतीलच! हाताचे पाचही बोटे सारखे नसतात म्हणून सर्व पुरुषांना आपण समान समजणे चुकीचे आहे. पुरुष जरी स्वतः हुन विचारणारा नसेल तर स्त्रीने पुढाकार घेऊन स्वत मनातलं बोलून समजून सांगून दोघांनी मिळून एक निर्णय घ्यायला हरकत नाही. प्रत्येक वेळेस पुरुष चुकीचा असेलच अस काही नाही, कारण नाण्याला दोन बाजू असतात, एका वेळेस एकच बाजू सर्वांना दिसेल! योग्य प्रकारे बघण्याचा दृष्टिकोन जर असेल तर कुठलीच गोष्ट वाईट नाही वाटणार. 🤗

  2. सर्व कल्पनाविलास आहे…. बाई मध्ये जेव्हा मी पणा येतो तेव्हा हळू हळू सर्व जे सुरूवातीला हवे असते ते नकोसे वाटायला लागते….याचा शेवट काय असू शकतो तर नवऱ्याचा विश्वासघात आणि अनेकांसोबत शारीरिक संबंध, कारण ती लोक बाईच्या मनासारखे वागण्याचा खेळ खेळतात, आणि बाई त्याला उत्तम प्रतिसाद देते, मग जेव्हा बिंग फुटते आणि लपवालपवी साठी जागा उरत नाही तेव्हा पश्र्चाताप करून काहीच अर्थ नसतो. काहीवेळा वैवाहिक जीवनाच्या नवीन सुरुवातीसाठी प्रयत्न होतात पण सकारात्मकता टिकणे कठीण होत जाते….पुन्हा मग एकत्र येण्याचा प्रयत्न संपला की शेवटी विरह प्रेम शिल्लक राहते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!