Skip to content

देण्याची मानसिकता हवी, मागण्याच्या मानसिकतेत अपेक्षाभंग होतो.

देण्याची मानसिकता हवी, मागण्याच्या मानसिकतेत अपेक्षाभंग होतो.


सोनाली जे


देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे..अशी विं.दा.करंदीकर यांची कविता आहे. आयुष्यात आपण इतरांना देण्याची मानसिकता हवी , जसे आई वडील मुलांना नुसताच जन्म देत नाहीत तर त्या सोबत शिकवण , प्रेम , शिक्षण , आर्थिक मदत , लग्न करून दिल्यावर ही छोट्या मोठ्या भेटी, नातवंडांना खावू , कपडे , खेळणी असतील किंवा पैसे प्रेमाने ते हे सगळे करत असतात..हे करत असताना त्यांना आत्मिक समाधान मिळत असते..तृप्तता, समाधान मिळत असतें पुढे जावून मुले आणि नातवंडे त्यांच्या करिता काही ना काही देत असतात..

असेच आपण आपल्या नातेवाईकांना करत असतो ..कधी मदत रूपाने असेल कष्टाने, श्रमाने , भेटी गाठी नी, तर कधी आर्थिक ही..मदत.
समाजा मध्ये राहता तिथे ही तुम्ही काही ना काही देत असता..समाजाचे नियम , रीती रीवाज पाळून आपण , इतरांना , शेजाऱ्यांना , जिथे काम करत असतो तिथे सहकाऱ्यांना सहकार्य करून , गरीब लोकांना कपडे, खाणे पिणे ,कधी काम देवून आपण समाजाचे काही तरी देणे देत असतो..

एखाद्याला गरजेच्या प्रसंगी वेळ देणे , सल्ला देणे , मदतीचा हात देणे हे सुधा खूप मोठे काम असते…आणि ती मानसिकता आपल्याला सुख , समाधान , आनंद देत असते.

ऑफिस ला निघाले होते.शेजारचे आजोबा अस्वस्थ वाटते म्हणले , संजीवन हॉस्पिटल मध्ये admit करावे लागले..घरी फक्त आजी आजोबा..ambulance बोलावली घेवून हॉस्पिटल मध्ये पोहचले..त्यांची मुलगी अमेरिका तर मुलगा बंगलोर ला होते.

ताबडतोब येण्याची शक्यता नव्हती..आजी ना म्हणले काही काळजी करू नका आहे मी सोबत..आजोबांना mild attack आला होता..डॉक्टरनी prescription दिले त्यांना औषधे आणून दिली आजी ना खाऊ पिवु घालून आराम करायला सांगितले..पाच दिवस हॉस्पिटल मध्ये होते…दुसरे दिवशी मुलगा आला..तरी पाच ही दिवस त्यांना काही हवे नको बघत होते..

त्या आजी आजोबांनी म्हणले ही मुलगी इथे नसून तिची उणीव भासू दिली नाहीस त्यातच सगळे आले..मदतीचा हात वेळेत देणे हे सुधा गरजेचे असते…सगळे सोडून माणुसकी ही असते…आणि त्यात खरेच मनाचे समाधान असते..कोणताही परतफेड कोणी करावी हा उद्देश नसतो ..
आज तुम्ही ही घरच्यांनी पुढच्या पिढीला देत आलात तर पुढची पिढी ही तुम्हाला देत असते .मग प्रेम असेल, वेळ असेल किंवा आधार ही असेल किंवा गरजेच्या वस्तू.जसे थंडी करिता गरम उबदार कपडे..

असेच एक आजोबा रोज जड पिशवी घेवून बाहेरून भाजी सामान घेवून येत..त्यांना गाडीवर बसवून घरी सोडत असे..फ्रेंडशिप डे ला लक्षात ठेवून त्यांनी मला Cadbury दिली.. छोटी मदत तर होती पण त्यांनी लक्षात ठेवून खावू दिला त्यात एक वेगळा च आनंद होता.

नवऱ्याने बायकोला सुख , सुविधा , आणि सुरक्षितता आर्थिक असेल मानसिक किंवा शारीरिक , सामाजिक सर्व प्रकारची सुरक्षितता देणे हे अपेक्षित असते. तर बायको ही नवऱ्याकरिता कायम समर्पित असावी..उपलब्ध असावी .. मुले आज्ञाधारक ,सेवा करणारी. काही लोक दिले तरी कधी जाणीव ही करून देत नाहीत.

काही लोकांना मात्र सतत दुसऱ्याकडून काही ना काही अपेक्षा असते..दुसऱ्याकडून काही ना काही मागण्याची अपेक्षा . अपेक्षा ही कुठे निर्माण होते ?? अपेक्षा ही मनात निर्माण होते..मन म्हणजे काय ? दिसते का? नाही ना!! मग मन म्हणजेच काय मेंदू..आपला मेंदू विचार करतो म्हणजेच अपेक्षा मेंदू मध्ये निर्माण होते.

इतर कोणतीही व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या मेंदूतील अपेक्षा ओळखू च शकत नाही. भले समोरच्या व्यक्तीच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची इच्छा दर्शविली तरी त्याच्या अपेक्षा नक्की काय आहेत हे कोणीच ओळखू शकत नाही.

काही लोकांना प्रत्येक गोष्ट मागून घेण्याची सवय असते..तर काही लोक न मागता ही अपेक्षा करीत असतात.. बायको नवऱ्याला कधी वेळ मागते, कधी पैसे कधी दागिने , कपडे, कधी बाहेर फिरायला , तर घरातल्या रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा मुलांकरिता काही ..

पण बरेचवेळा असे होते बायकांचे शेजारच्या मैत्रिणीने सोन्याच्या बांगड्या केल्या की लगेच हीची नवऱ्याकड मागणी , घरात नवीन वस्तू घेतली कोणी तरी अरे आपल्याकडे पण हे नाही आपण हे घेवू या म्हणून त्या मागणीचा तगादा..

खूप पूर्वी पासून एक कहावत आहे की बायको का रुसली ? भाकरी का फुगली नाही आणि घोडा का अडला? तर तिन्ही चे उत्तर एकच फिरविली नाही म्हणून…

थोडक्यात आपल्या मागण्या म्हणजे काय असते तर अपेक्षाच आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षा भंग होतात. त्यातूनच संघर्ष , वाद सुरू होतात.

मागण्याच्या मानसिकतेत मागणी पूर्ण झाली नाही की वाद , संघर्ष आणि मग संबंध किंवा relations .. नाती यात बिघाड होतात..जर मागणी किंवा अपेक्षा आणि त्याचे relation किंवा संबंध लावले नाहीत तर सगळेच आयुष्यात सुखी होतील..

रामायणात राम वनवासाला का गेला??तर कैकयी ने आपला पुत्र भरत याला राज्याभिषेक करण्याची मागणी दशरथ राजा कडे केली ..आणि चौदा वर्षाचा वनवास रामाला..श्रीराम साक्षात विष्णू चे अवतार असूनही त्यांना कैकयीच्या मागणी करिता वनवासात जावे लागले.
त्यामध्ये श्रीराम हसत हसत वनवासात जाण्यास निघाले पण बाकी सगळेच नाराज झाले.साक्षात दशरथ राजा ही विषाद अवस्थेत गेला तर स्वत : चा पुत्र भरत राजगादी वर बसणार नाही म्हणाला त्याने श्रीरामांच्या पादुका राजगादी वर ठेवल्या..सगळी प्रजा या तिच्या निर्णयाने तिला दोष देवू लागली ..सगळ्या प्रजेचा पाठिंबा श्रीरामांना होता..म्हणजे केवळ मागणी पूर्ण झाली तरी बाकी सर्वत्र कैकयी चा अपेक्षाभंग च होत गेला..

या पेक्षा एखादी गोष्ट आपण स्वतः हुन मागून घेण्यापेक्षा इतरांनी देण्यात त्यांनाही सुख ,समाधान आणि आपल्याला ही आनंद मिळतो.
आपल्या इच्छा इतरांवर थोपविण्याचा प्रयत्न करू नका त्या करिता स्वतच्या विचारांवर नियंत्रण ठेवा. विचारांमध्ये परिवर्तन आणा..जे आहे त्याचा स्वीकार करा…नको त्या गोष्टी मागत बसून , हट्ट करून स्वतची आणि दुसऱ्यांची मानसिकता बिघडवू नका.

लग्न झालेल्या मुलाच्या प्रेमात पडून लग्नाची मागणी करणे म्हणजे कायद्याने ही अपेक्षाभंग च होणार…परवाच पेपर ला ही बातमी वाचली ..लग्न झालेल्या मुलगा प्रेमात पडला आणि प्रेयसी मागे लागली म्हणून दुसरे लग्न केले आणि मुलगा पहिले लग्न झाले असून दुसरे केले म्हणून जेल मध्ये गेला..

थोडक्यात काय तर कोणालाच समाधान नाही मिळाले..आणि हिच्या मागणी करिता , हट्ट पूर्विण्याकरिता तो मात्र जेल मध्ये. शिक्षा भोगतो आहे..काय झाले यातून ना तिला ना हिला तो मात्र जेल मध्ये ..जवळ येण्या ऐवजी अजूनच लांब झाला ना..मग केवढा मोठा अपेक्षाभंग हा.
म्हणूनच स्वतच्या विचारांवर नियंत्रण ठेवा.विचारांमध्ये परिवर्तन आणा. जे आहे ते accept करा..स्वीकार करा.

श्रीरामाने हसतहसत राज्य हवाली केले आणि वनवासाचा स्वीकार केला.. मागण्यापेक्षा देण्यातला मोठेपणा दाखविला .. बघा प्रयत्न करून आपल्याही मेंदूची मागणी त्यातले जे विचार येत असतील तरी त्याचे परिवर्तन करण्याची क्षमता वाढवा आणि अपेक्षाभंग आणि त्यातून निर्माण होणारे दुःख आपसूकच दूर होईल .


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!