त्या प्रसंगाने मला खूप त्रास दिला, यापेक्षा तो प्रसंग खूप शिकवून गेला…
सोनाली जे.
आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला खूप त्रास होतो आहे..जसे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, नाती , relationships, किंवा break up, accident , जवळची व्यक्ती कायमची गमावणे.मैत्रीत वाद..अबोला.असे अनेक प्रसंग त्रासदायक असतात.
आपल्यावर कधी कधी खूप अचानक प्रसंग येतात आणि आपली कसलीच तयारी नसते..काय घडते काही समजत नसते.
मी बारावी मध्ये असताना कॉलेज सुटल्यावर घरी येत होते तेव्हा सायकल च होती..घराजवळ आले दादा पळत निघाला होता कुठे निघालास विचारले तर म्हणाला रिक्षा घेवून येतो बाबांना त्रास होतो आहे..त्याला म्हणले तू जा वरती मी घेवून येते रिक्षा.. बाबांनीच सांगितले की मिशन हॉस्पिटल मिरज ला च जायचे तसेच रिक्षा वाल्याला आधी सांग म्हणाला..
रिक्षा घेवून आले बाबांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता .blood vomiting ..cycle खाली लावली तसेच ताबडतोब घेवून गेलो हॉस्पिटल.. dr कुलकर्णी मॅडम सिनियर डॉक्टर होत्या…severe heart attack आहे म्हणाल्या प्रयत्न करतो..
दहा मिनिटांनी दादा ला आत बोलावले अर्थात मी सोबत होतेच ..severe attack आहे ..heart बंद पडले होते तीन डीसी दिले ४०० ..तेव्हा heart सुरू झाले आहे..पुढचे ४८ तास critical आहेत…
दादा दोन वर्षांनी मोठा माझ्यापेक्षा १७ आणि १९ वर्ष ..काही सुचेना … काय होते काहीच समजेना..पण डॉक्टर मॅडमनी एवढा दिलासा दिला की वेळेत आलात.. Ventilator वर ठेवावे लागेल ..सगळ्या सह्या निर्णय दादा घेत होता पण सगळे सांगून मी , आई आणि दादा तिघेच होतो हॉस्पिटल, जे होईल ते प्रत्येक गोष्ट बोलून निर्णय घेत होता..तेव्हा पहिल्यांदा जाणविले की बिकट परिस्थिती असेल तरी शांत राहून , संयम ठेवून पटापट निर्णय घेत होता .
तो स्वतः किती ही त्या क्षणी भावनिक झाला असला तरी या लहान वयात ही खंबीर पणे स्वतः उभा राहिला आणि आई आणि मला ही खंबीर आधार दिला आणि काही होणार नाही सगळे होईल व्यवस्थित हा विश्वास ही दिला..पुढचे ४८ तास आम्ही तिघेही हॉस्पिटल मध्ये icu बाहेर ..४८ तासानंतर डॉक्टरनी सांगितले की आता व्हेंटिलेटर काढला आहे..ठीक आहेत पण आता बाकी सगळ्या टेस्ट करायला पाहिजेत ताबडतोब.. angiography आणि इतर सगळ्या खर्च करणार कसे ?
दादा तर इंजिनिअरिंग करत होता..त्याचे इन्कम काहीच नाही..तेव्हा आई बाबांचे एकत्र खाते नव्हते..आईच्या खात्यात २५००० रुपये होते ते काढले होते. बरं हॉस्पिटल icu चे रोजचे खर्च. बाबाच सगळ्या नातेवाईक आणि जवळच्या लोकात जास्त शिकलेले एमएससी आणि मोठ्या पदावरून निवृत्त झालेले.पेन्शन खात्यात जमा होत असे…savings गुंतविले होते.आईची fd होती ती मोडायची तर दादा नको म्हनला त्या पेक्षा fd वर लोन काढले..
मार्ग काढत होता सगळ्यात मानसिकता स्थिर ठेवून , कोणाची ही मदत नाही पण पाण्यात तर पडलो आहोत..आणि आता हात पाय मारले च पाहिजेत ते ही वेगाने आर्थिक भार ही पेलायचा , मानसिक ताण , आणि इतरांना आधार , कोणाचा आधार नाही, आणि परत हॉस्पिटल ची धावपळ, शारीरिक विसावा घ्यायला उसंत च नव्हती..पण आम्ही तिघे ही जी परिस्थिती येईल त्याला तोंड देत होतो..मनाची हळूहळू तयारी करत होतो की आता पुढच्या टेस्ट ची तयारी झाली की रिपोर्ट्स ?
Angiography झाली ..दादा तसा घाबरट रात्री icu मध्ये बाबांचा पाय हलवू न देता पकडुन ठेवायचा होता..माझी duty रात्री icu त पाय घट्ट धरून बसले .बाबांना गुंगीच होती काहीच समजत नव्हते..अर्धी रात्र झाली .तीन वाजता शेजारचा पेशंट एकदम serious झाला ..डॉक्टरांची धावपळ सगळे बघत होते मी .
पण डॉक्टर त्या पेशंट ला वाचवू शकले नाहीत.तरी माझ्यावर मी कसलाच परिणाम होवू दिला नाही.शांतपणे पाय धरुन बसले होते . डॉक्टरांनीच मधला curtain ओढून घेतला .थोडा वेळ जातो ना जातो तोच समोरचा पेशंट serious त्याला ही वाचविण्यात अपयश आले डॉक्टरांना.तरी ही मी शांत राहिले…दिल्या देखत लहान वयात हा दुसरा मृत्यू बघितला.
डोक्यात बाकी काही येवूच शकत नव्हते..दादाने आणि डॉक्टरनी बाबांचा पाय हलवून द्यायचा नाही एव्हढे च डोक्यात केवळ त्यावरच फोकस..बाकी आजू बाजूला काही घडले आहे असे मेंदू पर्यंत संवेदना ही पोहचू दिली नाही..थोडे सगळे शांत होते तोपर्यंत पहाटे पाच ला अजून एक पेशंट सिरीयस झाला..परत डॉक्टरांची धावपळ आणि दुर्दैव तो ही गेला..
माझ्यावर तरी ही मी कसलाच परिणाम होवू दिला नाही डोळ्या देखत तीन पेशंट गेले ..शांत ..फोकस फक्त बाबा आणि त्यांचा पाय घट्ट धरून ठेवणे एवढेच..डॉक्टर च शेवटी म्हणले एक दहा मिनिटे तुम्ही बाहेर जा…सिस्टर थांबतील इथे .तरीही मी म्हणले नको मी थांबते..
या कठीण प्रसंगांचा नाही म्हणले तरी मनावर कुठे तरी परिणाम झाला पण कोणतीही परिस्थिती येवू देत भीती वाटू द्यायची नाही , खंबीर राहायचे.मनाची स्थिती बिघडवू द्यायची नाही. आणि एकदा मनाने निश्चय केला की कितीही त्रास होवू देत , संकटे येवू देत पण ते काम ..मग कोणतेही असेल काम ते, एखादे ध्येय ठरविले तर ते, शिक्षण असेल किंवा नोकरी असेल किंवा घरची जबाबदारी असेल आपला निर्णय ठाम ठेवून पुढे जात राहायचे.
मी ही या मोठ्या प्रसंगातून हेच शिकले की बाबांची प्रबळ इच्छा शक्ती .. विल पॉवर ..जबरदस्त त्यांनी वत्यानवत्रास होत होता तेवढ्या त्रासात ही सांगितले मला मिशन हॉस्पिटल मध्येच घेवून जा..तिथले डॉक्टर्स आणि ट्रीटमेंट लगेच मिळणार याची खात्री बाबांना होती , त्यांची इच्छा शक्तीच त्यांना मरणाच्या दारातून परत घेवून आली.
तसे या प्रसंगात खूप त्रास झाला पण शिकायला ही खूप मिळाले की वेळप्रसंगी , संकटकाळी आपला तोल कुठेही ढळू न देता वेळीच योग्य निर्णय घ्यावा..येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीर पणें तोंड द्यावे. आणि वेळ न घालविता जेवढे पटापट निर्णय घेता येतील ते घ्यावेत. डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा..तसे मग शाळेतले शिक्षक असतील , कॉलेज मधले प्रोफेसर अस्तीलं किंवा नोकरी मध्ये वरिष्ठ अधिकारी असतील , बिझनेस पार्टनर असेल किंवा मित्र मैत्रिणी असतील किंवा जोडीदार पूर्ण विश्वास ठेवला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे याची जाणीव करून दिलीत तर ते पूर्णपणे तुम्हाला साथ देतात..तुमची काळजी घेतात.
पैशा सारख्या मोठ्या अडचणी ही योग्य ते निर्णय घेवून मदत घेवून सुटतात..आणि जीव वाचला तर तुम्ही शंभर वेळा ती पैशाची तजवीज करू शकता .योग्य ठिकाणी पैसे गुंतवणूक ही करावी आणि त्याचा वापर ही करावा.
कोणतीही परिस्थिती किंवा संकटे येवोत तुम्ही तुमचा बॅलन्स , temper हलू द्यायचे नाही..शांतपणे आहे ही परिस्थिती स्वीकारायची आणि त्यातून मार्ग शोधायचे ..एकच मार्ग असेल तोच तर त्यावर कितीही काटे कुटे आले तरी न घाबरता , मनात शंका न आणता..पुढे जायचे. काही झाले तरी थांबायचे नाही..आपला फोकस पक्का ठेवून ध्येय पूर्ती करायची..
या प्रसंगात खूप मानसिक त्रास झाला , आर्थिक ताण ही आणि शारीरिक दृष्ट्या धावपळ ही, पण मोजकी तीनच लोक आम्ही..दादा, आई , मी असून ही आम्ही खूप छान manage केले..काही वेळेस जरुरी पेक्षा जास्त लोक असतील तर अजून गोंधळ होतो त्यापेक्षा कमी लोकांनी व्यवस्थित manage केले जाते..निर्णय पटापट आणि अचूक घेता येतात .काही झाले योग्य अयोग्य तरी सर्वस्वी जबाबदारी ही सुध्धा आपलीच असते .
त्यामुळे जेव्हा आपल्याला असे वाटते अरे काय त्रास आहे हा..तेव्हा हे पक्के करा की हे कठीण प्रसंग तुम्हाला खूप काही शिकवतात आणि ते अनुभव आयुष्यभर आपल्याला कोठे ना कोठे उपयोगी पडतात.
एक ग्लास पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि एक ग्लास अर्धा भरलेला आहे .अर्धा ग्लास रिकामा आहे याकडे लक्ष देवू नका , नकारात्मक विचार करू नका तर अर्धा ग्लास पाणी आहे आपल्याकडे glass मध्ये हा सकारात्मक विचार करा..
आपल्याला अपयश येते तेव्हा हरून आपण जीव देण्याचा प्रयत्न करतो , डिप्रेशन मध्ये जातो..तेव्हा एकच गोष्ट लक्षत घ्या असे काही लोक आहेत ज्यांचे हात पाय धड नाहीत, हात पाय नसतील , डोळे नसतील , ऐकू येत नसेल, बोलता येत नसेल तरी ती कुठे ना कुठे श्रेष्ठ असतातच..
हात नसेल पायाने ड्रॉइंग काढणारी आहेत .डोळे नसतील तर ब्रेल लिपी शिकून अभास करून मेरिट मध्ये येणारी मूल आहेत.मग आपण तर हाती पायी धड आहोत ..आपण काही ही करू शकतो ही जिद्द बाळगली पाहिजे.
कठीण प्रसंगात हार न मानता त्यातून नवीन शिकता येते अशा सकारात्मक दृष्टीकोनाने बघा.. प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची संधी मिळत असते मग प्रसंग कठोर असो. नकारात्मक असो किंवा सकारात्मक ..प्रयत्न करणे सोडू नका..
पेपरची सुरुवात अवघड वाटते म्हणून पूर्ण पेपर तसाच सोडून येवू नका..पूर्ण पेपर एक ..दोन वेळा शांतपणे वाचा .कदाचित सुरुवात अवघड असते पण बाकी पेपर खूप सोपा जातो..
तसे एखाद्या प्रसंगात सुरुवातीला खूप त्रास होतो पण त्यातून भरपूर शिकण्याची संधी मिळते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


