पुरुषांनी स्त्रियांना त्रास दिला, आता स्त्रिया पुरुषांना त्रास देतील….
कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे
“पुरुषांनी स्त्रियांना त्रास दिला, आता स्त्रिया पुरुषांना त्रास देतील….” हे ऐकायला थोडं हास्यास्पद वाटत असलं तरी या वाक्यात किती गर्भितार्थ दडला आहे हे हळुहळू समजेलच….
‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ हे प्रसिद्ध असं मनुवचन. या मनुवचनानुसार स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य मिळता कामा नये.ति जन्माला आल्यावर पित्याच्या , लग्नानंतर नवऱ्याच्या आणि म्हातारपणात मुलाच्या ताब्यात असते असे म्हणतात.तिच्या आयुष्याचा रिमोट कोणाच्या तरी ताब्यात असावा अशी कल्पना पूर्वी समाजमान्य होती आणि आजही ती काही प्रमाणात अजूनही कायम आहे असे दिसते.
आता पुरूषांनी स्त्रियांना काय त्रास दिला तर….आपल्या सगळ्यांना “पुरूषप्रधान संस्कृती” तर माहीतच आहे.या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत होती.कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक, शैक्षणिक हिंसाचार आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी पुरूष प्रधान समाजात कशा होत्या याची आपल्याला जाणीव आहेच.बाहेर म्हणून जाण्याचे स्वातंत्र्य तिला नव्हते. चूल आणि मूल या पलिकडे तिचं आयुष्य कधी नव्हतच.
विधवा म्हणून मिळणारी विचीत्र वागणूक,नवरा गेल्यानंतर केले जाणारे केशोपन, आधी पुरूषांनी जेवायच आणि नंतरच बाईने , पुरुष म्हणतील तीच पूर्वदिशा…यातून होणारी स्त्रियांची घुसमट, त्यांच्यावर होणारा अन्याय आपण पुरूष प्रधान संस्कृतीत अनुभवला.का आणि कशासाठी पुरूषांनी असा स्त्रियांचा छळ मांडला तेच कळत नाही.
पुरुषप्रधान संस्कृतीत दया माया काहीच नव्हती बहुदा.. कारण त्यांनी स्त्रियांना कणभरही स्वातंत्र्य दिले नाही. हळुहळू या संस्कृतीला छेद देऊन स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काही थोर स्त्री-पुरूषांना मात्र मनापासून धन्यवाद…! त्यांच्यामुळे तिचं जगणं काही अंशी तरी सुखकर झालं.
परंंतु , आजमितीला पाहता पुरूषांनी स्त्रियांना खूप म्हणजे खूप त्रास दिला.आज एकविसाव्या शतकातही हे चित्र तसच आहे.स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या एका विशिष्ट चौकटीतून बाहेर पडल्या. आकाशात उंच भरारी घेऊ लागल्या. पण काही माणसं सोडली तर कित्येकांची स्त्रियांबाबतची मानसिकता अजून बदलेली नाही.
मुळात ति बाहेर पडली आपल्या बरोबरीने काम करू लागली याने कित्येकांचा अहंकार दुःखावला. शिवाय इतकच नाही बाहेरच्या जगातही तिच्यावर पुरूषांनी अनेक बंधने लादली. वेळेत घरी , सतत जाताना काय कुठे का कोण…?अशा प्रश्नांचा भडीमार करून किती त्रास देतात हे पुरुष…..एखादी दुर्गा सोडली तर बाकी सगळ्या निमुटपणे ऐकून घेतात. आणि यातूनच कदाचित पुरुष अजून तिला त्रस्त करतो.
अहो इतकच नाही…. अन्याय, अत्याचार, छेडछाड, विनयभंग, बलात्कार यामध्ये पुरुष अगदी “टॉप” ला आहे असं म्हणावं लागेल.स्वतःची किंमत कमी होऊ नये म्हणून तिचं वाईट चिंतणारा पुरुष…. ,एखाद्या गोष्टीसाठी सूड उगवणारा पुरुष, कामाच्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक छळ मांडणारा तो पुरुष…….. किती किती छळतो स्त्रियांना….!!
जिवंतपणीच असं मेलेल आयुष्य जगायच म्हणजे सोप नाही.पण खूप त्रास दिला या पुरूषांनी ,संधी मिळेल तेव्हा आणि संधी निर्माण करूनही नकोनको त्या प्रकारे स्त्रियांना मानसिक, शारिरीक, वेदना दिल्या. ताजीतवानी गोष्ट म्हणजे या Covid -19 (2020) मध्ये गुगलवर कोटीच्या प्रमाणात How to control your women…? , How to hit a woman..? ते मी आज तिला घरी आल्यावर मारून टाकणार आहे…
हे तब्बल सोळा ते सतरा कोटीवेळा सर्च केल गेलं.म्हणजे स्त्रिया पुरूषांना इतका त्रास देतात का…? स्त्रिया इतक्या नकोशा झाल्यात का..? कि स्त्रियांना छळायचे नवीन नवीन मार्ग हे पुरुष शोधायला लागलेत. हे किती लाजिरवाण आणि घृणास्पद आहे.
आता बस् झालं…. निसर्गाने सहन करण्याची पुरेपुर क्षमता स्त्रियांना दिली असली म्हणून काय झालं तिलाही भावना आहेत यार….तिलाही वेदना होतात…. “Patience” तिचेही संपू शकतात…… ति प्रत्युत्तर देऊच शकते.आजच्या स्त्रिया लढायला लागल्या तर तुम्ही काही झाशीची राणी वगैरे नाही अस काहीजण त्यांना निक्षून सांगतात. हो मान्य आहे त्या झाशीची राणी नाहीत पण ति एक स्त्री आहेच नं…? मनात आल तर ति सुद्धा पुरूषांसारखा अधिकार गाजवू शकते पण ति तिच्या मर्यादा सहसा ओलांडत नाही ओ…….
पण आता सगळ सहन करण्या पलिकडे गेलय…आत्तापर्यंत पुरूषांनी खूप त्रास दिला….आता या स्त्रिया केव्हा पेटून उठतील सांगता येणार नाही. याचच एक काहीवर्षांपूर्वीच उदाहरण म्हणजे-तुम्ही सर्वांनी “निकोला थोप” हे नाव ऐकलं असेलच… “डिअर सर वेअर हिल्स” या मोहिमेशी निगडीत हे नाव जगभर पोहोचलं. बॉसने ऑफिसमध्ये येताना हाय हिल्स घालने बंधनकारक केले होते. आणि निकोलाने हे नाकारले त्यामुळे तिला ऑफीसमधून काढून टाकले होते.
“मुळात आम्ही कोणत्या चपला घालायच्या हे आम्ही ठरवू.आम्ही काय घालायच आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?हाय हिल्स घालणे सगळ्यांना सहन होईल असे नाही. हिल्समुळे टाचा दुखतात, मणक्याला वेदना होतात हे तुम्हाला कळणार नाही. अस म्हणत तिने “डिअर सर वेअर हिल्स” या मोहिमेला सुरुवात केली.” एखाद्या पुरूषाची शारिरीक छळवणूक ,छेडछाड करणे स्त्रियांच्या तत्वात तस बसत नाही आणि बसणारही नाही…..(थोडे फार chances वगळता)
पण असेच जर पुरुष स्त्रियांना सतत त्रास देत राहिले तर स्त्रिया पुरूषांना त्रास द्यायला आता कमी करणार नाहीत.स्त्रियांच्या सहनशक्तीचा एकदा का अंत झाला तर त्या काय काय करु शकतात हे न सांगितलेलच बरं….!!तरीही सांगायच झालं तर अन्नावाचून त्या पुरूषांची उपासमार करतील..(हॉटेलमध्ये किती खाणार…आणि बनवूनही किती खाणार….), गळ्यात पट्टा बांधून अगदी कुऱ्यासारख वागवतील…बस् म्हणल की बसायच नी उठ म्हणलं की उठायचं….
गाढवासारखच पाठीवर नकोनको ती ओझी वहायला लावतील,भर चौकात,चारचौघात लक्षात राहील असा अपमान करतील, त्यांच्या स्वाभिमानाला क्षणात बेचिराख करतील,त्यांच्या पुरूषी अहंकाराला दुःखावून त्यांना कायमच कोलमडायला लावतील……या स्त्रिया….!!आणि आता हे पुरूषांच त्रास देण वाढतच गेल तर स्त्रिया कधी रौद्ररूप धारण करून पुरूषांना मनाने नी शरिराने उध्वस्त करतील सांगता येत नाही. स्त्रिया नक्कीच पुरूषांना त्रास देतील यात तीळमात्र शंका नाही.आता तुम्हीच ठरवा स्त्रियांना त्रास द्यायचा की नाही???
(ज्या पुरूषांची स्त्रियांबाबतची मानसिकता अजून बदलली नाही त्यांच्यासाठी हे लागु होतं… सध्यस्थितीला काही अंशी स्त्रियाही चुकतात इथे केवळ पुरूषांनाच दोष देण्याचा उद्देश नाही. पण जिथे असं घडत,जिथे अशी लोक आहेत त्यांच्यासाठी हा लेख….!!)
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



ज्या पुरुषांनी स्त्रियांना विनाकारण त्रास दिला आहे त्यांच्याशी स्त्रियांनी असं वागलंच पाहिजे. पण बरेच पुरुष असे पण आहेत की लग्नानंतर ते आपल्या पत्नीला खूप जीव लावतात. पण तरीही नवरा हा वाईटच असतो, त्याचे आईवडील, भाऊ बहिणी वाईटच असतात हे तिच्या डोक्यात घातलं जातं आणि त्यानुसार तिच्या सासरी ती त्या हेतूने नवऱ्याशी व घरातील इतर सदस्यांशी वर्तणूक करत असते. त्या नंतर त्यांचा संसार विखुरला जातो आणि याला जबाबदार पुर्णतः ती स्त्रीच असते. हे सर्व मी अगदी जवळून अनुभवलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे?
You never know what’s happening behind the doors….
Being a girl I’m really ashamed to say that I’ve seen women’s who are taking disadvantage of being educated.
Ancestors are the ones who should be punished why today’s men…??
So many harassment cases and still increasing. Society is accepting everything with time. They’re giving every freedom to their ladies but the ones who are allowing are the same who are facing the cons. I’ve seen ladies who are threatening men and even women when nothing goes as per their wish. These ladies don’t even think of helping elders and listen to them even if elders are showing care.