Skip to content

बायको सारखी माहेरी जात असल्यास नवऱ्याने हे उपाय करून पहावे.

बायको सारखी माहेरी जाते म्हणून नवऱ्याने काय उपाय करावेत..


सोनाली जे.


बायको सारखी माहेरी जाते याला काही तरी कारणं असतील च ना!! थोडासा विचार बायकोच्या बाजूने करून बघुयात हुं..

१. जन्मापासून ते लग्न होईपर्यंत अगदी २२ ते २५ वर्ष जरी average गृहीत धरले तरी एवढी वर्ष ती आपल्या लोकांच्या मध्ये राहिली असते..त्यांचे संस्कार, राहणीमान, प्रत्येकाचे स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत, समस्या आली असेल तर त्यातून मार्ग काढण्याच्या पद्धती, किंवा कोणत्याही प्रश्नांचे सर्व बाजूंनी विचार करण्याची पद्धत असेल ..thinking process या खेरीज तिथल्या आठवणी , आनंद एकमेकांच्या बरोबर असलेली भावनिक attachment.. या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष बायको त्याच वातावरणात त्याच कुटुंबात असल्याने तिच्या मध्ये पूर्णपणे भिनलेल्या असतात.

२. याउलट सासरी आल्यावर सर्वांचे स्वभाव समजून घेणे , त्यांच्या आवडी निवडी समजून घेणे , तसेच समस्या सोडविताना इतरांचा सहभाग असेलच असे नाही घरातली कर्ती व्यक्तीचं काही वेळेस निर्णय घेते.त्यामुळे आपले विचार, मार्ग , हे मांडण्या ची संधी ही मिळत नाही.. सासरी मर्यादित लोक असतील, एकमेकांच्या बरोबर वैचारिक देवाणघेवाण नसेल किंवा प्रत्येकाचे स्वभाव थोडेसे रिझर्व्ह असतील , मोकळेपणा नसेल , अडीअडचणी किंवा इतर काही गोष्टी मध्ये बोलून , समजून घेवून कोणते मार्ग निघत नसतील, किंवा कोणाला त्यात इंटरेस्ट नसेल तिचे ती बघून घेईल असेही असेल.

तरी ही मग कुठे तरी मोकळेपणा, मनाचा संवाद साधण्याकरिता आपल्या लोकांची आठवण येते.. माहेरी जावून त्यांच्या बरोबर बोलून त्यातून मार्ग निघत असतील किंवा इतर गोष्टी मध्ये सल्ला मिळत असेल . किंवा काही नाही तरी मानसिक दृष्ट्या शांतता , स्थैर्य आणि आपण एकटे नाही याची भावना निर्माण होत असेल तरी ही बायकांचा माहेरी जाण्याकडे  ओढा असतो.

३. नोकरी करणारी असेल तर नोकरीतलि रोजची धावपळ , घरची कामे यातून शारीरिक दृष्ट्या ही थकवा येत असेल..त्यातून माहेरी कामाची सवयच नसेल तर शारीरिक ओढाताण होतेच होते पण मनाची ही ओढाताण होते .चिडचिड, राग , कामे वेळेत पूर्ण होतील का , आपण सासरी आहोत , कोणी काही बोललं तर म्हणून मनातून एक भीती आणि चिंता असते. त्यातून सगळ्या गोष्टीतून थोडे रिलॅक्स होण्याकरिता ही बायका माहेरी जावून परत फ्रेश होवून येतात.

४. मुले लहान असतील तर थोडी धावपळ कसरत होत असते..सतत त्यांच्या मागे लक्ष ठेवणे, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकविणे , त्यांचे खाणे पिणे याची जबाबदारी यातच अडकून पडल्या सारखे होत असेल शिवाय घरच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडताना येणारा मनाचा आणि शरीराचा  थकवा.मीच का करायचं ही भावना यातून होणारे मानसिक त्रास, राग..anger, anxiety, phobia.

मन आणि शरीर यांची एकमेकांशी खूप जास्त जवळीक ..मन आजारी पडले तर ते शरीरावर ही परिणाम करते त्यामुळे होणारे शारीरिक आजार असतील, डोकेदुखी, bp , sugar अगदी काही नाही तर अस्वस्थ वाटणे.

या सगळ्यातून आणि रोजच्या रूटीन मधून  ही कधी तरी बदल आणि सुरक्षित ठिकाण म्हणून बायका माहेरी जातात.

बायका सतत च माहेरी जात असतील तर नवऱ्याने काय केले पाहिजे :-

१. बायको ही वेगळ्या घरातून , वेगळ्या संस्कारातून आलेली आहे..तिची विचारसरणी , तिच्या घरची विचारसरणी कशी आहे हे समजून घेवून आपल्या घरातले वातावरण कसे आहे , लोकांचे स्वभाव कसे आहेत याची नीट ओळख करून द्यावी तिला.

२. सुरुवातीला घर , घरातील माणसे, स्वभाव, सगळ्या वस्तू ही नवीन , कुठे काय ठेवायचे काय नाही याची जाणीव आणि बारीक सारीक गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत माहिती तर द्यावीच पण समजले नाही , चुकले तरी सांभाळून घेवून इतरांना ही तिला सांभाळून घेण्यास सांगून मदत करणे.

३. तिला येणाऱ्या समस्या , घरचे problems यात सर्वांनी मिळून मदत करून प्रोब्लेम solve करणे.काही चुकले तरी त्यातून दुसरे मार्ग काढणे.

४. आर्थिक दृष्ट्या तिला support करणे कारण बरेचदा माहेरी आई वडील सर्व खर्च करत असतात त्यामुळे आर्थिक गोष्टींच्या जबाबदाऱ्या नसतात. आणि परावलंबी, insecure वाटले तरी माहेरी जाण्याचा ओढा वाढतो म्हणून नवऱ्याने आणि घरच्यांनी तिच्या गरजा समजून घ्याव्यात ..तिला खर्चाला पैसे द्यावेत..आणि वेळ प्रसंगी मी आहे हा विश्वास , याची खात्री तिला द्यावी.

५. घरकाम आणि बाकी गोष्टी , मुलांच्या जबाबदाऱ्या त्यांचे अभ्यास , खाणे पिणे , बघावे. जेवढी मदत कारणे शक्य तेवढे करावे..जेणेकरून सगळ्या जबाबदाऱ्या एकतीच्या असे बायकोला वाटणार नाही आणि तिची मानसिकता ही बिघडणार नाही..थोडी ती ही रिलॅक्स होईल.

६. कधी तरी बाहेर पिकनिक , जेवण एखादी ट्रिप ला तिला  घेवून जावे..कधी तिच्या मित्र मैत्रिणी , नातेवाईक , माहेरच्या लोकांना आपल्याकडे बोलवावे.त्यांच्या सोबत ही  जेवण , पिकनिक , कधी movies , get together करावं. कधी तरी तिला स्वैपाकघरात सुट्टी देवून बाहेरून जेवण मागवावे..किंवा तिचे घरकाम कमी होण्याकरिता हाताखाली एखादी बाई मदतनीस म्हणून ठेवावी. जेणेकरून बायको आनंदी आणि secure फील करेल.

७. नोकरी करणाऱ्या बायका थोड्या स्वतंत्र विचारांच्या असतात..त्यांची ध्येय ठरलेली असतात त्यामुळे इतर कोणाशी जुळवून घेणे थोडे अवघड असते..किंवा जुळवून घेत नाहीत. त्यांच्या विचार आणि स्वातंत्र्य यावर कोणती बंधने नको असतात..कधी ऑफिस मधून येण्यास उशीर झाला  किंवा ऑफिस पार्टी मधून घरी येण्यास उशीर झाला , कधी परगावी कामानिमित्त जावे लागले आणि घरी कोणी बोलले तर ते ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नसते यातून शाब्दिक वॉर जरी टाळले तरी मनात कुठे तरी ते साठून राहते त्यामुळे शक्यतो त्यांना ही समजून घेण्याचा प्रयत्न , त्यांचे काम याविषयी कधी चर्चा केल्या आणि कौतुक केले तरी त्यांना मोठा आधार वाटतो आणि त्या रिलॅक्स होतात त्याकरिता त्यांना बाहेर, किंवा माहेरी आधार घेण्याची गरज वाटत नाही..

८. तिला ही स्वातंत्र्य द्यावे कधी तिच्या मतानुसार कामे करू द्यावीत..तिच्या आवडी निवडी , छंद ,जिम किंवा इतर गोष्टी यांचा विचार करून तिला त्या गोष्टी करिता प्रोत्साहन द्यावे.

९. छोट्या गोष्टी वेळेत झाल्या नाहीत तरी आरडा ओरडा आणि भांडणे करू नयेत..स्वतः दमून आलो म्हणून बायको ने गरम गरम चहा खाणे आणून द्यावे अशी अपेक्षा करतो तसे कधी तरी तिलाही करून द्यावे.

शेवटी कुठे ना कुठे adjustment करावी लागते..प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व भिन्न असते, विचारसरणी भिन्न असते, मर्यादा भिन्न असतात, आवडी निवडी भिन्न त्यामुळें दोघांनी मिळून कोणता तरी मध्य काढायचा असतो.एकमेकांना समजून घेणे , तडजोड करणे , आवडी निवडी जपणे आणि काही तरी नावीन्य ठेवणे गरजेचे असते.

नवरा आणि बायको यांच्या मधल्या सामंजस्य , समायोजन , तडजोड , healthy वातावरण निर्मिती मधूनच मुलांवर ही योग्य ते संस्कार होत असतात..मुले घडतं असतात.

कुटुंबाचा बॅलन्स ठेवणे हे सगळ्यांचीच जबाबदारी असते.समजून घेतले तर बायको ही सारखी माहेरी जाणार नाही..प्रेम, जिव्हाळा , आपुलकी, आपलेपणा, काळजी , संयम , आर्थिक आणि मानसिक स्थैर्य असेल तर ती आपल्याच घरी आनंदात आणि सुखात असेल..सुरक्षित कोषात च राहील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “बायको सारखी माहेरी जात असल्यास नवऱ्याने हे उपाय करून पहावे.”

  1. Komal Prakash Sathe

    गिरीश पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. खरंच दोन्ही बाजूंनी विचार केला तर आनंदी आनंदच.धन्यवाद.

  2. गिरीश पवार

    लेख छान आहे. यामध्ये पत्नीची बाजू, तिच्या अपेक्षा सांगितल्या. पण मला वाटतं की पतीच्याहि काही अपेक्षा असू शकतात, कृपया यावर एखादा लेख प्रकाशित केला तर बरे होईल असं मला वाटतं.
    धन्यवाद,
    गिरीश पवार, नाशिक

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!