चांगली कामे करताना अनेक संकटे का येतात??
सोनाली जे.
संकटे हे आपण कोणत्या अर्थाने घेतो? संकटे म्हणजे एखादे काम करताना येणाऱ्या अडचणी.. पण या संकटांकडे आपण कसे बघतो , तेव्हा आपल्या मनावरचा ताबा न घालविता , चिडचिड न करता आपण परिस्थिती वर कसा ताबा मिळवीत असतो मार्ग काढतो , पर्याय शोधतो हे महत्वाचे असते आणि मग ती संकटे किंवा अडचणी ही वाटतं नाहीत.
आता बहुदा आपण चांगली , शुभ कामे करताना किंवा इतर ही छोटी मोठी कामे करताना संकटे का येतात बरे?
Concentration…focus.. आपण एखादे चांगले काम उत्साहाने करायला घेतो . ते करायचे आहे पटापट पूर्ण याचाच मनात ध्यास असतो.त्या उत्साहाच्या भरात काही चुका होतात..काही गोष्टी निसटून जातात..मोठ्या गोष्टींचे विचार करताना बारीक गोष्टी सुटून जातात.याकरिता जे काम करायचे आहे त्यावर पूर्ण concentration..focus करा..
घाई घाईत ते संपवायचे याच्या मागे लागू नका .मन कुठे तरी वेगलिकडे असते..विचार काही वेगळेच सुरू असतात.थोडा वेळ लागला तरी चालेल पण ते पूर्ण लक्ष देवून पूर्ण करा..
त्यात काही गोष्टी राहिल्या तर पुढे अडथळे येतात जसे अगदी कोणाला तरी अमेझॉन , flip kart वरून गिफ्ट पाठवायचे ठरवून तुम्ही payment पुर्ण करता, ऑर्डर देता पण चुकून address त्यांचा टाकायचा राहतो त्यामुळे ते आपल्याच पत्त्यावर येते.त्यामुळे छोट्या छोट्या कामात सुधा कटकट वाटते. यात चूक आपलीच असते..
रतन टाटा यांच्या सारखी मोठी व्यक्ती एकदा कामाकरीता निघाली असता त्यांची गाडी पंक्चर झाली तेव्हा वेळ लागेल असे समजताच गाडीतले बाकी लोक उतरून इकडे तिकडे करू लागले त्यांचा ड्रायव्हर जवळ पास कोणते गॅरेज किंवा कोणी आहे हा शोधण्याकरिता गेला काही वेळात त टाटांच्या सोबतच्या लोकांना लक्षात आले रतन टाटाजी कार मध्ये नाहीत म्हणून ते बघायला आले तर रतन टाटा स्वतः गाडीचे चाक बदलत होते..
म्हणजे काय तर आलेली अडचण किंवा संकट या कडे बघत बसण्यापेक्षा त्यात काय करता येईल म्हणजे ती अडचण दूर होईल याचा विचार आणि कृती ही टाटांनी केली..एवढ्या महान व्यक्ती ला ही अडचणी , संकटे यांचा सामना करावाच लागतो पण त्यात कुठे ही अडचण , संकट म्हणून न बघता परिस्थितीवर मात करण्याची संधी आहे असे समजून त्याला तोंड दिले तर सगळे मार्ग निघतात आणि संकटे ही संकटे वाटतच नाहीत..
आपण काय करतो तर छोट्या छोट्या गोष्टींनी , अडथळे , यांनी घाबरून जातो , बावचाळून जातो..आणि मुळात आपल्या मनाची तयारी नसते की अपेक्षे पेक्षा काही वेगळे घडले किंवा जे गृहीत धरले त्यापेक्षा काही वेगळे घडले म्हणजे expect केले असते एक आणि वेगळेच घडते तेव्हा आपण ते accept करत नाही म्हणून ती संकटे वाटतात आपल्याला..
याउलट आलेला छोटा प्रोब्लेम असेल किंवा मोठा तो आल्यावर fact accept करून सोल्युशन्स शोधली , मेंदू कार्यरत ठेवला, मनाची खंबीरता ठेवली तर पटकन प्रोब्लेम solve केले जातात.
पण आपण प्रत्येक वेळी प्रोब्लेम , संकट कसे आले , का आले , कसे झाले , घडले याचाच विचार करतो याउलट आला आहे प्रोब्लेम किंवा संकट तर ते सोडविण्याकरिता solutions , उत्तरे काय आणि ते कसे सोडविता येतील याची कृती करणे गरजेचे असते.
परीक्षा उद्या आणि मुले बिनधास्त असतात की माझ्याकडे सगळ्या नोट्स आहेत रात्रीत अभ्यास करू..पण अभ्यास करायला घेतला की एव्हढा vast syllabus बघूनच घाबरतात ..मग टेन्शन येते, , anxiety ,depression येते..त्यात सुरुवात कुठून करायची काय अभ्यास करायचा यात गोंधळ उडू लागतो आणि भीतीने पुढचा काहीच अभ्यास होत नाही याउलट जर एक एक chapter पूर्ण करत गेलो पूर्ण portion cover होणार नाही असे वाटले तर एखादा चॅप्टर ऑप्शनलला टाकला तरी आहे ते व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला सहज सगळे येते..
पण मनात उगीच भीती तो ऑप्शनल ला त्यातले च आले तर..पण हे नाही विचार करत की बाकीचे सगळे व्यवस्थित केले आहेत त्यातले काही आले तरी आपल्याला येणारच..पण थोडक्यात जे नाही त्याचाच विचार करतो आपण आणि जे आहे त्याचा सकारात्मक विचार येतच नाही मनात आणि मग जे नाही त्या गोष्टींचे विचार ही आपल्याला संकटे च वाटतात..
पण स्वतः वर विश्वास ठेवला , खात्री ठेवली , सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मग मोठ्यातले मोठे संकट ही सहज छोटे वाटते ..दूर केले जाते.
तसेच काही कामाची सुरुवात तर आपण करतो पण अचानक आपल्याला समजते की आपल्याकडे या गोष्टी नाहीत ..त्यामुळे काम अडून राहते..मग ते वेळेत पूर्ण होत नाही म्हणजे ही संकटच वाटते.
जसे फॅब्रिकेटर ने सांगितले की हे fabrication Che काम संध्याकाळ पर्यंत देतो पण अचानक लाईट गेले तर त्याचे काम थांबते…अशा वेळेस जर त्याने आधीच थोडी परिस्थिती कंट्रोल मध्ये राहण्याकरिता काही पूर्व नियोजन केले असेल जसे की लाईट गेले तर त्याला alternate option असेल त्याची तजवीज जसे generetor किंवा इतर काही गोष्टी, किंवा मटेरियल चा आधीच साठा म्हणजे ऐन वेळी मटेरियल करिता ची धावपळ वाचेल..
आणि काम पूर्ण करून देण्याकरिता थोडा extra वेळ आधीच मागून घेतला असता बाकी गोष्टींचे विचार करून लाईट गेले तर, काम करणारा माणूस आजारी पडला तर त्याच्या बदली कोणी करणारा किंवा मग एक दिवसाचा जादा चां अवधी मागून घेतला असता तर .असे संकटे आली तरी त्याला पर्याय ठेवले तर काम करताना येणाऱ्या अडचणी ही संकटे वाटणार नाहीत..आणि कायम उत्साहाने , सकारात्मक दृष्टीने काम करण्याची इच्छा निर्माण होईल.
आता उदाहरण द्यायचे झाले तर ३ इडियट मध्ये रांचो आणि त्याचे मित्र मोना ची delivery करताना अचानक लाईट जातात तेव्हा व्हायरस जो इन्व्हर्टर आधीच बनविला असतो तो उपयोगी पडतो ..म्हणजे परिस्थितीवर मात करतात..
याउलट संकटे म्हणूनच बघत राहिलो तर निराशा येईल , चिंता वाढत जाईल, depression वाढत जाईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूपच सुंदर लेख अगदी खऱ्या आयुष्यातील हे संकटे वाततात्