आपला Self Respect हा आपल्या “इमोशनल फिलींग्स” पेक्षाही Strong असावा.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
एकदा सहजच फिरत फिरत चहाच्या कट्ट्यावर गेले आणि चहा पिता पिता सहज एक वाक्य कानावर पडलं……ते म्हणजे “हल्ली भावनांना काही किंमत नाही राहिली या स्वाभिमानापुढे…..!! हे वाक्य ऐकताच कानाला प्रचंड वेदना झाल्या.खर तर तळपायातली आग मस्तकात जावी अगदी तशीच अवस्था झाली होती.
अरे भावनांना काही किंमत नाही राहिली स्वाभिमानापुढे… म्हणजे काय..??? स्वाभिमान काय बाजारात सहज विकत मिळतो का..?कि त्याची किंमत भावनांपुढे शुन्य व्हावी.मान्य आहे आयुष्यात भावभावनांनाही एक वेगळ स्थान आहे.पण “स्वाभिमान”…. स्वाभिमानालाही आयुष्यात स्थान आहे नं….आणि मुळात स्वाभिमान आणि भावनांची तुलना कशाला…?आपल्या वागण्याचा दोष आपण यांना का द्यावा..?
अशा कितीतरी विचारांनी मनात अक्षरशः विचीत्र असा गोंधळ माजवला. आणि मग…..समुद्रातील लाटांना जसं ऊधाण येतं न तसच माझ्या चर्चांना ऊधाण आलं………कितीतरी प्रश्न मनातून बाहेर येऊ पाहत होते… त्या कट्ट्यावरच मी चहाचा एक एक घोट पित…कोऱ्या कागदावर माझ्या प्रश्नांना / शंकांना वाट मोकळी करून दिली……
१) स्वाभिमान म्हणजे नक्की काय..?
२)स्वाभिमान बाजारात असा विकत मिळतो का..?
३)स्वाभिमान कमवायला लागतो न?
४)भावभावना तर मनुष्याला असतातच नं…?
५)भावना जपल्या पाहिजे स्वाभिमान नाही का..?
६)स्वाभिमान आणि भावनांची तुलना कशाला..?
७)स्वाभिमान एवढा तकलादू आहे का की तो हळव्या भावनांपुढे फिका पडतो..?
८)भावना महत्त्वाच्या… मग स्वाभिमानाच काय?
९)स्वाभिमान असणं चुकीच आहे का..?
१०)स्वाभिमान म्हणजे अहंकार किंवा गर्व नाही हे तुमच्या लक्षात येत नाही का..?
अशा कितीतरी गोष्टी मनातून कागदावर उतरल्या. तर…आपला Self Respect हा आपल्या इमोशनल फिलींग्स पेक्षाही Strong असावा…..कसं आणि का? ते जाणून घेऊयात या वरील प्रश्नांच्या उत्तरांमधून……….
स्वाभिमान म्हणजे काय तर आत्मपरिक्षण करून स्वःताची एक नवी ओळख निर्माण करणे. , समजुन घेण्याची क्षमता , आत्मविश्वास, रोजच्या जगण्यातील आपल्या वागणुकीच कटाक्षाने केलेल मुल्यमापन, गोष्टींमधला acceptance या सगळ्यांच्या एकजीव झालेल्या मिश्रणातून स्वाभिमान जन्माला येतो.
आज संपला उद्या बाजारात जाऊन विकत आणूया. असा स्वाभिमान विकत नाही मिळत ओ…नाहीतर बाजारात भाजीसाठी नाही तर या स्वाभिमानासाठी गर्दी झाली असती..भावभावना तर मनुष्याला असतातच…पण स्वाभिमान जन्मःताच येत नाही… तर तो कमवायला लागतो.आणि कितीतरी गोष्टी पणाला लावून स्वाभिमान कमावला जातो.
जशा भावना जपल्या पाहिजेत तसाच आपला स्वाभिमानही जपला पाहिजे. जशा भावना महत्वाच्या आहेत तसच आयुष्यात स्वाभिमानही महत्वाचा आहे. स्वाभिमानापुढे भावनांची किंमत कमी कशी होईल…?मुळात दोघांची तुलना करणारे आपण कोण..?स्वाभिमान आणि आपल्या इमोशनल फिलींग्स या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत.
दोघांच मिश्रण करून चालणार नाही. स्वाभिमान हा इतका तकलादू नाहीये की तो असा कधीही कुणापुढे फिका पडेल. मुळातच स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही… काहींना स्वाभिमान म्हणजे अहंकार,गर्व वाटतो….आणि मग ते स्वाभिमानाला चुकीच समजायला लागतात.आयुष्यात स्वाभिमान आणि भावनांची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
स्वाभिमान आणि feelings या गोष्टी एकत्र केल्या तर आयुष्य कोणत्या वळणावर येईल काही कळणार नाही.आपल्या आजुबाजुलाच ,दैनंदिन जीवनात अगदी छोटी छोटी उदाहरणं आपण बघत असतो.आणि यातून शिकण्यासारख बरच काही असतं.उदाहरण बघायच झालं तर………..”पैसा”…पैसा हा घटक स्वाभिमानाला खूप छान स्पष्ट करू शकतो.कसं ते पाहूयात…..:-
आपल आयुष्य सुखसोयींनी परिपूर्ण असावं असं बऱ्याचदा वाटतं. आणि ज्याच्याकडे पैसा तो स्वाभिमानी असा एक गैरसमज आपल्या समाजात अजूनही आपण बघतो.पण गरीब श्रीमंत असा भेद इथे नसतोच.प्रत्येक मनुष्याला स्वाभिमान हा असतोच.
अजून एक गोष्ट म्हणजे…काही जणांकडे स्वाभिमान असूनही त्यांना त्याचा नीट वापर करता येत नाही. त्याचा अर्थ त्यांनी कधी समजूनच घेतला नसतो.त्यामुळे त्या स्वाभिमानाच केव्हा अहंकारात रूपांतर होतं काही समजत नाही. “मला ही ही गोष्ट हवी आहे… पण त्यासाठी मी प्रयत्न करेन, पाण्यात पोहायला शिकेन आणि जे हवं आहे ते कमवेन.उगाच मिळालेल्या गोष्टी घेऊन त्यावर स्वतःच अधिराज्य गाजवायच नाही. हे ज्याला कळालं त्याने तो स्वाभिमान कमावला.तो झाला खरा स्वाभिमान…..”
अजून एक उदाहरण घेऊयात ते म्हणजे नात्यांच उदाहरण….
आता नाती आली म्हणजे भावभावना आल्याच. भाव-भावना नाही ते नातं कसलं…?असं बऱ्याचदा होतं की आपला स्वाभिमान दुःखावतो आणि नात्यांची पारडी हलकी व्हायला लागतात.अगं/अरे तुला तुझा स्वाभिमान इतका महत्त्वाचा आहे का की त्याच्यापुढे तुला भावनांची काहीच किंमत नाही?इतका कसा तु निष्ठुर झालास…?जरा तुझा “तो स्वाभिमान” बाजूला ठेव आणि ते जे काही आहे ते निस्तर एकदाचं..नाहीतर उगाच भावनेच्या भरात काहीतरी व्हायचं.
असं म्हणून प्राण पणाला लावून कमावलेल्या स्वाभिमानाला क्षणात असं कोपऱ्यात टाकायच????तेही भावनांना जपण्यासाठी..!!एकदा दोनदा आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवतोही पण यामुळे आपण गृहीत धरले जातो हे आपण विसरतो.पण सारख सारख असा स्वाभिमान सोडून का वागायचं आपण…?
आपल्या स्वाभिमानालाही काही किंमत आहे की नाही..?ईमोशनल असावं पण इमोशनल “फूल* असू नये.नाहीतर तुमचा अमूल्य स्वाभिमान केव्हा विकला जाईल तुमच्या लक्षातही येणार नाही. Self Respect म्हणजे आयुष्यातील अगदी किमती गोष्ट आहे.ती कमवण सहज शक्य नाही.
सगळं सहन करून ,विविध पल्ले गाठूनच स्वाभिमान कमावला जातो.असं नेहमीच भावनिक होऊन स्वाभिमानाला क्षणात विरघळू देऊ नका. स्वाभिमानाची ताकद ताठ मानेने जगायला शिकवते.हा कमावलेला स्वाभिमान जपण मात्र आपल्याच हातात आहे. आणि दुसऱ्याच्या स्वाभिमानालाही तितकच महत्त्व द्या.”Give Respect,Take Respect” हे लक्षात ठेवा. नाहीतर उगाचच अहंकारी वागण्यामुळे कमावलेला तो किमती स्वाभिमान गमवायला वेळही लागणार नाही.
स्वाभिमानाची ताकद समजायला तो कमवायलाच हवा.आणि आपला स्वाभिमान हा इतका मजबूत हवा की त्याच्या ताकदीने इतरांच्या भावनांमध्ये बळ निर्माण झालं पाहिजे.त्याच भावनांनी स्वाभिमानाला अगदी अभिमानाने शीळ घातली पाहिजे.
भावना किती काळ तग धरून राहू शकतात माहीत नाही कारण त्या जितक्या कठोर असतात तितक्याच मृदू असतात. भावनांमध्ये ताकद असतेच पण स्वाभिमानाची ताकद सगळ्याहून निराळी असते.चिखलात तग धरून ऊभ रहाण्याची क्षमता या स्वाभिमानामुळेच येते.त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत कणखर, मजबूत असायलाच हवा.भावनांच काय….तर त्या काटेरी असतात तर कधी नव्हाळ हिरव्या पानांसारख्या असतात.
कधी जखमा करणाऱ्या तर कधी सुखाची शाल पांघरणाऱ्या……पण स्वाभिमान काचेसारखा पारदर्शक असतो….फक्त त्याला तडा जाऊ न देण सर्वस्वी आपल्या हातात असतं.म्हणूनच आपला Self Respect हा आपल्या emotional feelings पेक्षाही Strong असावा….कारण तो असेल तर सगळ काही असेल….म्हणून स्वाभिमान जपा…सहजासहजी त्याला विकू नका…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


