नव्याने जगण्यासाठी मागचा भूतकाळ कसा विसरायचा ??
सोनाली जे.
आपण कायम भूतकाळ , आणि भविष्य काळात जगत असतो..आठवत असतो..आठवणे हे एका दृष्टीने चांगले म्हणजे तुमचा मेंदू चांगला कार्यरत आहे. आणि तुमची मेमोरी अजून चांगली आहे.
पूर्वी घडलेल्या चांगल्या वाईट घटना, अनुभव , कोणी कसे वागले किंवा वागविले आपण कसे वागलो किंवा कसे वागायला. पाहिजे होते.त्याक्षणी परिस्थिती मध्ये आपण खूप पटकन react ka झालो..किंवा परिस्थितीवर नियंत्रण का मिळवू शकलो नाही. अगदी काही नाही तेव्हा असा आनंद मिळविला होता तसा त्याच अपेक्षा पुढे ही आपण ठेवत असतो..किंवा जो पस्त experience तो च घेवून जगात असतो.
मागचा भूतकाळ विसरायचा असेल तर नक्कीच आपल्याला भूतकाळ , आठवणी, ते अनुभव विसरावे लागतील ..पण खरेच हे विसरणे शक्य होते का?? तर नाही..पण त्याची तीव्रता कमी होवू शकते. काय करता येईल बरे त्याकरिता?? तुम्ही ही तुमच्या दृष्टीने विचार करा..कारण प्रत्येकाच्या भावना , आठवणी, अनुभव याची तीव्रता भिन्न असते..त्यातून मार्ग ही भिन्न असू शकतात .पण साधारणपणे सर्वांनीच पुढील प्रयत्न केले तर थोडे फार भूतकाळाची तीव्रता कमी करू शकतील.
अर्थात भूतकाळ विसरायचा म्हणजे मग स्मृतिभ्रंश का? तर नाही.
१. वर्तमानात जगा..
भूतकाळात ज्या चांगल्या वाईट गोष्टी आपण उगाळत बसतो ते विसरायचे. जर काही चुकले असेल तर ते अनुभव म्हणून लक्षात ठेवून पुढच्या वेळेस तसे चुकणार नाही याची काळजी घेण्याकरिता लक्षात ठेवू शकता.
अगदी उदाहरण द्यायचे झाले तर आपण मोबाईल खरेदी करतो चांगल्यात ले चांगले मॉडेल पण तेवढ्यात नवीन मॉडेल येते आणि उगीच आपल्याला वाटत राहते अरे आपण चुकलो थोडे थांबलो असतो तर नवीन मॉडेल मिळाले असते.. पण एक लक्षात घ्या रोज नवीन नवीन technology develope होणार.नवीन मॉडेल्स येत राहणार.त्यामुळे चूक झाली असे म्हणून रोज तेच उगाळत बसू नका..आहे त्यातला आनंद ही निघून जाईल. प्रत्येक वेळी तेव्हा असे झाले होते तेव्हा तसे झाले या पेक्षा वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा… प्रोब्लेम जरी असेल तरी आताचे solution बघा.तेव्हा कसे काय सोडविले ते विचार मनात आणू नका.
२. आनंद किंवा दुःख हा व्यक्ती सापेक्ष , स्थिती सापेक्ष , किंवा स्थळ सापेक्ष ठेवू नका….
पूर्वी एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या स्थळी गेला असाल तर त्या आठवणी सतत काढून त्यात राहू नका ..आठवणी ठेवा पण त्यातच रमू नका..तर आता ज्या व्यक्ती जेव्हा सोबत असतात तेव्हा आणि जरी स्थळ तेच असेल किंवा भिन्न तरी त्यांच्या सोबत वर्तमानात आनंद घ्या..किंवा पूर्वी कधी त्रासदायक अनुभव असेल , दुःखद असेल तरी ते विसरून वर्तमानात ला चांगला अनुभव घ्या..
भावना असतात मान्य पण आपल्या सारख्या दुसऱ्या व्यक्तींच्या ही तेवढ्या च तीव्र असतील असे नाही ना..त्यामुळे वेळ जशी पुढे जात असते तसे पुढे जात रहा.
३. छंद जोपासा..सतत विचार करणे सोडून द्या..
Empty mind is devil’s workshop ashi म्हण आहे.रिकामे डोके सैताना चे घर. सतत कशात तरी बिझी राहिलात तर मनात सतत विचार येणार नाहीत..आणि हे विचार बहुदा भूतकाळ कसा होता त्यात काय झाले किंवा भविष्यकाळात काय होईल याविषयी च असतो..
त्यापेक्षा आवडते छंद जपा..मग कोणतेही असतील ते जपा.
४. लहान मुलांच्या सोबत रहा..
बरेचदा लहान मुलांकडून खूप शिकण्यासारखे असते..एक तर त्यांच्या सोबत खेळताना , बोलताना काही तरी सतत नवीन शिकता येते.कारण ती एकच एक गोष्ट करत नाहीत ..सतत काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न , नवीन खेळ, नवीन शोध लावत असतात..त्यामुळे ती उत्साही असतात आणि स्वतः ला बिझी ठेवतात.
तसेच पूर्वी भूतकाळात काही झाले असेल किंवा तासाभरा पूर्वी जरी आपल्या मित्र मैत्रिणीं सोबत भांडणे झाली असतील तर केलेली कट्टी काही वेळात सगळे विसरून बट्टी करून काहीच झाले नाही असे परत खेळायला सुरुवात करतात..तसे त्यांच्याकडून ही आपल्याला हे शिकता येईल.
५. .Delete emotional baggage of Past memories
आपल्या ब्रेन चे memory card मधली स्पेस व्यवस्थित arrange करा. तुमच्या भूतकाळातल्या भावनिक आठवणी memory card मधल्या एका कप्प्यात ठेवा. पण नको असतील तेव्हा delete ही करा..तर बाकी कामाच्या , अभ्यासाच्या , आणि इतर चांगल्या गोष्टी स्टोअर करून वापरता येतील..मेमोरी storage इतर गोष्टींनी भरून गेले तर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या साठवून ठेवायला जागाच राहणार नाही..
क्लिअर all ..याचाच अर्थ आयुष्यातली नकारात्मक गोष्ट, अपयश असेल मग ते अभ्यासातले असेल , नोकरी व्यवसायात किंवा नात्यात , चुकलेले निर्णय असतील, किंवा परिस्थितीजन्य गोष्टी असतील या सतत मनात येत असतील ..सतत तो मनातला कचरा वाढत असेल तर नवीन गोष्टी मनात कशा येणार..यालाच
घरात कसे रोज साफ सफाई करता ..रोजचा कचरा टाकून देता..कचऱ्याची गाडी आली किंवा कचरा साफ करणारी स्वच्छ करणारी लोक आली की घरातला कचरा , अडगळ देवून टाकत असता तसे मनातला ही कोपरा आणि कोपरा साफ करा.
६. Control your state of mind. ..
स्वतच्या मनावर , विचारांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा..एकदा जर भात्यातून बाण सुटला तर परत तो भात्यात ठेवता येत नाही..त्यामुळे तुमच्या भावना ..मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर …mind state var control ठेवा.
एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर rudeLy.. उद्धटपणें वागतो. वागते..असे का? तर हे त्यांच्या स्वतः मध्ये किती मोठ्या प्रमाणत स्ट्रेस आहे हे indicate करते..
कोणत्याही परिस्थितीत..वातावरणात स्वतः वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा.आणि तुमच्या या कंट्रोल किंवा तटस्थ भूमिकेतून, समजून घेण्याच्या भूमिकेतून , शांत राहण्याचा भूमिकेतून समोरच्या व्यक्तीच्या ही लक्षात येईल तुमचे त्यांच्या प्रती असलेले unconditional love. संयम..एकाग्रता..ठेवा.
६. पूर्वी घेतले निर्णय .. Let go..
पूर्वी आपण एखादा निर्णय घेतलेला असतो ..कधी लग्नाचा असेल, प्रेमाचा पण त्यात प्रेमभंग झाले म्हणून वेगळे झालात किंवा लग्नानंतर विभक्त झालात तर त्यातच अडकून पडलात..सतत उगाळत बसलात , विसरला नाहीत , आयुष्यातून गेलेली माणसे त्यातच अडकून पडलेत त्यापेक्षा कधी तरी let go करायला शिकला नाहीत, आजचा दिवस जगायला शिकला नाहीत तर उद्याचा दिवस कसा येणार.
मागचा अंधार घेवून त्यातच चाचपडत राहिलात त्यापेक्षा पुढे दिसणाऱ्या कणभर उजेडाकडे पावूल टाकले तर अंधारातून मार्ग सापडेल..मागे जात राहाल तर अजून अजून अंधारच होत जाईल .योग्य दिशा मिळण्याकरिता पुढे जात राहणे गरजेचे.
७. Accept ..
आपण एखादी गोष्ट पटकन accept करत नाही..जसे बघा आता ची ही corona स्थिति , pandemic situation यात आयुष्य खूप uncertain झाले आहे..अनेक जणांची नोकरी , उद्योगधंदा , बरीच नाती, मुलांच्या शाळा हे सगळेच पणाला लागले आहे असे म्हणले तरी चालेल पण आपण काय विचार करतो की corona आधीची स्थिती किती चांगली होती ..तेव्हा नोकरी , ऑफिस , व्यवसाय व्यवस्थित सुरू होते.
मुलांच्या आणि पालकांच्या दृष्टीने शाळा व्यवस्थित सुरू होत्या अभ्यास करत होती मुले..परीक्षा नीट देत होती..रोजचा अभ्यास पूर्ण करायची ..लिखाण करायची आता ते लिहीत च नाहीत..अभ्यासच करत नाहीत..परीक्षा पर्याय निवडायचे असल्याने निश्चिंत झाली आहेत..पूर्वी किती चांगले होते ..शिक्षक रागवत..रोजच्या रोज अभ्यास मुले करत होती.
असेच काहीसे नात्यांचे..काही नाती दुरावली आहेत..मित्र मैत्रिणी असतील , नातेवाईक..प्रत्यक्षात गाठी भेटी नाहीत, वेळेला , गरजेला मदत नाही..विचारपूस कधी केली केली नाही तर नाही ..कोणाकडे जाणे येणे नाही यामुळे काही नाती दुरावत आहेत..आणि तेव्हा ही मग हेच विचार होतात पूर्वी किती चांगले होते महिन्यातून एकदा तरी भेट व्हायची ..गरज असेल मदत असेल आपली लोक यायची. पण आता ची परिस्थिती कोणीच नाही कोणाचे..उद्या परत परिस्थिती बदलेल पण हा आज आपण अजून स्वीकारत नाही.. आहे या परिस्थिती मध्ये मार्ग कसे काढायचे ते शिकले पाहिजे .जे पर्याय आहेत ते स्वीकारले पाहिजेत.
८. Negative गोष्टी विसरायला शिकले पाहिजे..
आयुष्यात पुढे जाताना negative गोष्टी विसरायला च पाहिजेत. पुढील वाटचाली करिता , सकारात्मक होण्याकरिता negative goshti विसरायला च पाहिजेत.जर रोज त्याच घटना , negativity cha विचार करत गेलात तर रोज तुम्ही तेच जीवन जगत असता, त्यात नावीन्य आणायचे असेल तर negative गोष्टी विसरून पुढे जा.दुर्लक्ष करायला शिका.
अगदी घरातले उदाहरण द्यायचे झाले तर रोज उठून नवरा बायको यांच्यात भांडणे होत असतात.नवरा सतत टोचून बोलतो , सासू टोचून बोलते पण आपण घर सोडून जावू शकत नाही कारण आपली मुले त्यांच्या जबाबदाऱ्या..आणि कोणीच सोबत नसते..कोणाची साथ नसते..आर्थिक स्थिरता नसते..किंवा नोकरी ही नसते तेव्हा आपण या बाकी गोष्टी टोचून बोलणं किंवा त्रास या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर च सकारात्मक राहून पुढे जावू शकू.
असेच मित्र मैत्रिणी यांच्या बाबत होवू शकते..मित्र मैत्रिणी तुम्हाला कशातच involve करून घेत नसतील तुम्ही फोन केलात तर तुम्ही मेसेज केला तर किंवा किरकोळ गोष्टीतून ही दुरावा अंतर ठेवत असतील तर सरळ दुर्लक्ष करा..भेटू ही नका ..फोन ही करू नका..संपर्क ही करू नका..ते तुमच्याविषयी काय विचार करतात किंवा इतरांशी काय बोलतात हे कोणाला विचारायला ही जावू नका..पूर्णपणे विसरून जा..अलिप्त व्हा Detach व्हा.कारण काय तर आपल्या मनाचं स्वास्थ्य आपण जपायचे असते..कोणाविषयी तिरस्कार , द्वेष वाढतो, किंवा अपेक्षा expectations वाढतात. त्यापेक्षा अलिप्त राहणे योग्य..
आयुष्य रोज भरभरून जगा..आजचा दिवस बघायला मिळणे हे खूप मोठे भाग्य समजून पुढे जा..आपल्या मनाला निरोगी ठेवा..मनात जे षडरिपु आहेत .जसे काम , क्रोध, मोह , मद , मत्सर, माया या सगळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा..
मन निरोगी असेल तर शरीर ही निरोगी राहील..भूतकाळ विसरून रोजचा दिवस जगा..भविष्यकाळ आणि त्याची चिंता करा पण खूप नको..भविष्याची तरतूद करा कारण उद्याचा दिवस बघणार आहोत ही आशा आणि सकारात्मक विचार आपल्याला जगण्यास उभारी देतो नक्कीच..पण भविष्यकाळ चांगला असावा म्हणून आज वर्तमानात कंजुषी करून, आपल्या इच्छा ,भावना , आवडी निवडी, आकांक्षा , छंद , रुची सोडून , मारून मुटकून वर्तमान जगू नका..तर वर्तमान असा जगा की भूतकाळ ही आठवणार नाही आणि भविष्याची चिंता ही राहणार नाही…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूप सुंदर आणि अगदी बरोबर…🌸🌸🌸
Nice