Skip to content

बायकोची खरी ओळख ही नवऱ्याच्या अडचणीत होते.

बायकोची खरी ओळख ही नवऱ्याच्या अडचणीत होते.


सोनाली जे.


आई वडील जन्म देतात तरी अर्धांगिनी म्हणून बायको च असते..मग कायदा असेल किंवा समाज यात तिचे स्थान खरच उच्च असते. अर्धांगी म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यात एकरूप झालेली. तन , मन , धन या सगळ्यात आपल्या बरोबरीचे स्थान असलेली. मन एकरूप होते, विचार , भावना एकरूप होतात म्हणून शरीराचे मिलन आणि त्यातून पुढची पिढी ही निर्माण होते.यात आनंद , सुख , आपलेपणा या सगळ्या भावना आहेत.

जेव्हा पती पत्नी हे एकमेकांच्या मध्ये पूर्ण involve असतात, ओढ असते तेव्हा सगळ्या गोष्टी एकमेकांच्या सहमतीने केल्या जातात..जी काही मिळकत असेल त्यात ही savings, घर भाडे असेल , किंवा इतर खर्च त्या व्यतिरिक्त घर खर्च आणि इतर दोघंही मिळून करत असतात. कधी कमी जास्त खर्च झाले तरी खर्चाचे गणित दोघे मिळून सांभाळत असतात.

बायकोची खरी ओळख नवऱ्याच्या अडचणीत होते असे म्हणतात.. खरेच आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की आयुष्यात किती चढ उतार येतात..अगदी life line सरळ झाली तर माणूस ही मृत घोषित केला जातो .तसेच आहे आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभव आणि परिस्थितीतून पुढे जात असते. अडचणी म्हणता साधारणपणे कधी नवऱ्याला गरज पडते बरं बायकोच्या साथीची?

१. नोकरी व्यवसाय बदलताना , नोकरी काही कारणास्तव गेली तर, किंवा व्यवसायात नुकसान – कर्ज बाजारी.

काही कारणास्तव नोकरी व्यवसायात बदल करणे ही गरजेचे असते किंवा नोकरी व्यवसायात आर्थिक नुकसान आले, कर्जबाजारी झालोच तर बायको ने चिडचिड , राग न करता नवऱ्याच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. त्याला विश्वास दिला पाहिजे की हे दिवस ही जातील ..परत स्थैर्य येईल त्याकरिता प्रयत्न आणि आत्मविश्वास जागे केला पाहिजे.

अशा वेळी स्त्री ची ही खरी परीक्षा असते .कारण ती संयम टिकवून ठेवली नाही तर वाद , विवाद होतात आणि नवऱ्याला बाहेरच्या टेन्शन, स्ट्रेस सोबत ही घरची टेन्शन निर्माण होतात त्यामुळे कधी तो स्वतः वरचे नियंत्रण ही हरवून बसतो, depression , frustration , anxiety अशा प्रकारचं मानसिक असंतुलन घडून येते अशा वेळी बायको ने प्रत्येक सुखात जशी साथ दिली तशी दुःख आणि त्रास यात ही साथ देणे गरजेचे असते आणि योग्य लोकांचा , डॉक्टर , किंवा सल्लागार असतील त्यांचा सल्ला मार्गदर्शन घेणे योग्य असते.

नवऱ्याने घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा आहे असे आरोपी या दृष्टीने न बघता त्यात काय संभाव्य धोके येवू शकतील किंवा त्यातून मार्ग कसे काढता येतील याकरिता बायकोने कायम सकारात्मक राहूनच भावनिक साथ तर द्यावीच शिवाय पूर्णपणे विचार करून मार्ग शोधण्यासाठी मदत करावी .

२. शैक्षणिक निर्णय : –

काही वेळेस नवऱ्याला त्याची प्रगती , प्रमोशन करिता काही शिक्षण घेण्याची , स्किल develop करण्याची गरज असते तेव्हा त्याला त्याच्या प्रगती करिता पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. तेंव्हा बाहेरील काही कामे असतील, मुलांच्या जबाबदाऱ्या असतील , किंवा नाती जपणे किंवा इतर व्यवहार ते स्वतः केले तर नवऱ्याचा वेळ इतर कामात वाया जाणार नाही आणि तो त्याच्या काम आणि घेत असलेल्या शिक्षणावर focus करू शकेल .लक्ष केंद्रित करू शकेल , वेळ ही योग्य ठिकाणी लागेल .आणि मानसिक किंवा शारीरिक ताण ही निर्माण होणार नाहीत..

३. शारीरिक व्याधी..किंवा अपघात..

नवरा दीर्घ कालीन आजार असोत , accident सारखं अचानक उद्भवणारे problems असोत किंवा तत्कालीन किंवा छोटे मोठे आजार असोत यात बायकोची साथ खूप गरजेची असते , त्याच्यावर योग्य ठिकाणी उपचार करण्यापासून , आर्थिक गोष्टींची चिंता करू नये याचे आश्वासन , खात्री सकट त्याची काळजी घेणे , वेळेत खाणे पिणे तर आहेच पण इतर ही गोष्टी असतील स्पंजिग असेल किंवा फिजिओ थेरपी असेल.त्यात मदत केलीच पाहिजे.

शिवाय जर जास्त काळ किंवा तात्पुरते जरी बेड टेस्ट किंवा विश्रांती घेण्याची वेळ आली तर मानसिकता बिघडते, आपण परावलंबी आहोत अशा भावना असतील किंवा आता Corona सारख्या व्हायरस ने घातलेल्या धुमाकूळ असेल त्यात मानसिक आणि शारीरिक हतबलता येते तेव्हा खऱ्या अर्थाने मी आहे..सोबत आहे..यातून बाहेर पडता येईल हा मानसिक आधार..

मग तेव्हा motivational videos असतील , तशा सकारात्मक गप्पा , चर्चा असतील किंवा योगा meditation असेल किंवा आवडते छंद जपण्याकरिता मदत करा ,एखादे आवडते किंवा कॉमेडी नाटक , सिनेमा बघा, music ऐका , ज्या आवडत्या गोष्टी त्या काळात करा ..आवडते खाद्य पदार्थ सुधा करून बायका काळजी आणि आवड जपण्याचा प्रयत्न करू शकतात जेणे करून मानसिक उभारी येईल..आणि मन खंबीर असेल तर शारीरिक व्याधी वर ही सहज मात करू शकता येते.

४. कधी कामा करिता बाहेर गावी जावे लागते, राहावे लागते कधी परदेशी एकट्यालाच जावे लागते अशावेळी इतर गोष्टी सोबत देण्यापासून ही हे तात्पुरती तडजोड आहे ..तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही यश तर मिळवून येणारच पण तिकडे ही एकटे नाही आम्ही सोबत असू हा मानसिक आधार देणे गरजेचे असते.

कारण त्यावेळी सगळे सोडून जाताना , जबाबदाऱ्या , मुले , बाकी पालकांची जबाबदारी ही असेल दिसत असेल तर द्विधा अवस्था होते तेव्हा पुढाकार घेवून सर्व गोष्टी सुरळीत होतील याची खात्री देणे ही गरजेचे असते . आणि आजकाल internet , सोशल मीडिया सारखे app sahaj उपलब्ध आहेत आणि सोयीचे त्यावरून संपर्क साधून ही जवळीक साधता येते .

५. व्यसन ..काही वेळेस मित्रांची संगत किंवा इतर सोशल मीडिया चा प्रभाव यामुळे व्यसन लागते मग ते कोणतेही असेल अगदी दारू , सिगारेट , सट्टा जुगार असेल किंवा बाहेरख्याली ही..त्यात बायको ने चांगले वाईट, त्याचा शरीरावर होणारा परिणाम , हरलो तर येणारे अपयश ..आणि शिवाय तेच पैसे योग्य ठिकाणी गुंतविले तर त्यातून दीर्घकालीन होणारे फायदे हे क्षणिक काळ सुख मिळविण्यापेक्षा जास्त चांगले आणि सुखकारक असतील.

याकरिता नवऱ्याच्या बारीक सारीक गरजा , आवडी निवडी , भावना , शरीराची गरज .किंवा शारीरिक कष्टाचे काम असेल तर तशी किंवा अती बुध्दीचे काम असेल तर येणारा शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करणे याकरिता त्याला समजून घेवून तशी साथ देणे गरजेचे असते..मोकळेपणा टिकवून ठेवणे गरजेचे असतें.एकमेकांशी सुसंवाद साधणे , दोघांनी चर्चा करून , विविध पर्यायांचा विचार करणे ..निवडी .., निर्णय प्रक्रिया यात सहभागी होणे ही मोठीं साथ असते.

६. त्याच त्याच रूटीन चा कंटाळा येतो तेव्हा बायकोने रूटीन मध्ये थोडेसे बदल आणणे जरुरी असते .कधी बाहेर फिरायला , कधी खरेदी स्वतः करिता असेल मुले पण नवऱ्य्या करिता ही आवरजून करावी.कधी भटकंती करावी.कधी ट्रेकिंग, कधी निसर्गरम्य ठिकाणी बदल म्हणून जाणे, घरचे खावून कंटाळा येतो तेव्हा कधी बाहेर जावे हॉटेल मध्ये ..कधी सगळ्यातून रिलॅक्स म्हणून movie, संगीताचे कार्यक्रम असतील तर कधी exhibition मग फुलांचे, चित्रकला किंवा हस्तकला ही असेल अगदी पुस्तक प्रदर्शन असेल…

नातेवाईक त्यांना भेटा.मित्र मैत्रिणी एकत्र या ..असे get together arrange करून , अशी मोकळीक घ्यावी पण द्यावी पण काही वेळेस त्याच त्याच वातावरणातून आलेला मेंटल फटीग , किंवा शारीरिक थकवा ही क्षणात दूर होतो.

बायको ही चांगल्या वाईट काळात साथ देणारी च पाहिजे..समजून घेणारी..मदत करणारी एक वेळ शारीरिक नसेल पण मानसिक आधार देणारी ..असते आणि तिने तसे राहिले ही पाहिजे..विश्वास, आधार , आणि पाठिंबा या गोष्टी मध्ये साथ दिली पाहिजे.

शेजाऱ्यांच्या किंवा मैत्रिणी यांच्या शी स्पर्धा नको ..त्यांच्याकडे हे आहे , ते आहे , या वस्तू , दागिने , असतील या गोष्टी आपल्याला ही पाहिजेत असा ध्यास घेण्यापेक्षा किंवा मिळत नाही म्हणून नवऱ्याला सतत कमी लेखण्यापेक्षा ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याचे कौतुक असू द्या.

एक व्हिलन नावाचा सिनेमा आहे त्यात रितेश देशमुख चे त्याच्या बायकोवर ..मुलावर खूप प्रेम असते , तो त्यांच्या करिता , त्यांच्या आनंदा करिता कायम प्रयत्न करत असतील परंतु त्याची बायको सतत त्याचा पाणउतारा करत असते .कमी लेखत असते अपमान करत असे.सतत त्याची ऐपत नाही म्हणून त्याला हिणवत असते..

पैसे , दागिने , फिरायला घेवून गेला की तेवढी खुश त्यातून त्याच्यावर इतका मानसिक परिणाम होतो की तो मानसिक रुग्ण च होतो आणि कोणत्या स्त्री ने त्याला काही विरोधात म्हणले किंवा चिडून बोलले की तो त्यांचा खून करत असे ..कारण काय तर बायको वर निस्सीम प्रेम पण बायकोला काही करू शकत नाही तो राग बाहेर काढून तो असा हत्यारा झाला होता त्यातून तो मानसिक , आत्मिक शांतता मिळवीत होता..

केवळ तो नवरा म्हणून त्यानं च कर्तव्य पूर्ण केली पाहिजेt, त्याच्या कडून अपेक्षा न ठेवता बायकोने ही आनंदाने तिची कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत. त्याचमुळे ही सर्वस्वी बायकोची जबाबदारी असते की नवऱ्यावर विश्वास , त्याचा आदर करणे.त्याची मानसिकता समजून घेणे आणि वस्तुरुपी घटकांवर जीव टाकण्यापेक्षा आपल्या माणसाला जीव लावणे सगळ्यात गरजेचे..

नवऱ्याच्या अडचणीत सोडून न देता जी साथ देते ती अर्धांगिनी ..खऱ्या अर्थाने बायको.स्त्री ला आदिशक्ती मानले आहे आणि खरेच तिने ठरविले तर ती हे नक्की सिध्द करू शकते..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!