Skip to content

जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर त्या सांभाळण्याची हिम्मत सुद्धा येते.

जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर त्या सांभाळण्याची हिम्मत सुद्धा येते.


सौ. मिनल वरपे


आपल्या आजूबाजूला असे अनेक माणसं आपल्याला भेटतील जे आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत असतात आणि ते सुद्धा शब्दाविना कृतीतून.. आणि काहीवेळेस मात्र आपण स्वतः जरी अनुभव घेतला नसेल.. कधी त्या परिस्थितीतून गेलो नसू तरीसुद्धा एखाद्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, धीर देण्यासाठी आपण अगदी सहजपणे अस बोलून जातो जे त्याची हिम्मत वाढवते..

असच एकदा मी जॉब वर जात असताना.. माझ्या कानांवर शब्द पडले आणि खरचं ते शब्द माझ्या कायम लक्षात राहतील मला प्रेरणा देतील असेच होते.. ते म्हणजे जबाबदाऱ्या स्वीकारल्या की त्या सांभाळण्याची हिम्मत सुद्धा त्यासोबतच येते..

खरचं किती सहज सोप आहे.. आपण काय करतो तर जबाबदाऱ्या म्हटलं की त्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो.. किंवा एखादी जबाबदारी आपल्यावर आधीच असेल आणि अजून नविन जबाबदारी म्हटलं की आपल्याला जास्त टेन्शन येते..

उदाहरण द्यायचं झालं तर बघाना.. एखाद्याला घराची पूर्ण जबाबदारी असेल लहानपणीच आई वडील सोडून गेले असतील.. भावा बहिणींना सांभाळत स्वतःच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष केलं असेल आणि अचानक कोणी बोललं की अरे आता लग्नाचं वय झालंय तुझं लवकर लग्न केलं पाहिजेस.. तर अशावेळी त्याला अजून विचार येतात की आधीच घराची जबाबदारी.. लग्न केलं तर लग्नाचा खर्च… नवीन नाती.. घरात येणाऱ्या जोडीदाराला समजून घेऊन तीच मन सांभाळणं.. नाती जपण शिवाय हे सगळं करताना घरातील इतरांना न दुखावता त्यांनासुद्धा जपत,. घराची आर्थिक स्थिती सांभाळणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही..

खर तर ज्यावेळी जे आपण केलं पाहिजे तेव्हा न करता त्यापासून लांब पळालो की नंतर पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही.. त्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून ते सांभाळण्याची हिम्मत केली तर ते आपल्यासाठी tension न राहता आपल्यासाठी पुढे जाण्याचं धाडस देत राहते…

जबाबदाऱ्या कोणाला नसतात.. आणि खर म्हणायचं तर जबाबदाऱ्या त्यालाच सांभाळायची संधी मिळते जो त्या सांभाळण्याची हिम्मत ठेवतो..
आज लग्न झालंय..म्हणजे जोडीदाराचं मन जपणं.. काही वेळेनंतर मुल होणार.. मुलांचा छान सांभाळ करणे नंतर त्यांचं शिक्षण करिअर लग्न.. यासारख्या असंख्य जबाबदाऱ्या या आपल्याला घ्याव्याच लागतात म्हणून मी लग्नचं नाही करणार अस म्हणून चालत नाहीना..

लग्न झालंय पण आर्थिक स्थिती अगदी उत्तम नाहीये.. म्हणून मुलांचा विचार सुद्धा नको अस म्हणणारे नंतर मुल होण्यासाठी लाखोवरी खर्च करतात.. त्यापेक्षा जे जस आहे ते स्वीकारून समाधान मानण्याची वृत्ती असेल तर मार्ग मिळत जाणार आणि जबाबदारी ही चिंता न देता कायम हिम्मत देईल..कारण असे अनेक गृहस्थ आपल्याला भेटतील जे शून्यातून जग निर्माण करताना.. योग्य वेळेत योग्य जबाबदारी ओळखून ती पार पाडत पुढे गेलेत..

म्हणून जबाबदाऱ्यांना घाबरायच सोडून त्यांना स्वीकारलं तर ती जबाबदारी सांभाळणं आपल्याला कायम प्रेरणा देईल…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर त्या सांभाळण्याची हिम्मत सुद्धा येते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!