Skip to content

मनातील मरगळ सकारात्मक ऊर्जेने घालवूया…..

मनातील मरगळ सकारात्मक ऊर्जेने घालवूया…..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


मित्रांनो , मन म्हणजे कधी “भणाणणारा वारा”…तर कधी “आकाशातील शरदाचं चादणं” आहे.पण अशाच या मनावर कधी धूळ साचते.अक्षरशः मरगळून जातं मन………मग अशा या मनातल्या मरगळीच  काय करायच?मनातील मरगळ घालवायची कशी?ही मरगळ कधी जाणार किंवा मरगळ जाईल ना? असे असंख्य प्रश्न “मनातच” गोंधळ घालू लागतात…….. मात्र उत्तरं काही सापडत नाही आणि मनातील मरगळही जात नाही.

हल्ली , आयुष्याचं चक्र कसं फिरतय काहीच कळत नाही. जीवनशैली विचीत्र वाटते.मनामनात मरगळ साचली आहे. ईतकच नाही तर पुरेशी झोप झाल्यावरही मन अस्वस्थ वाटतं. काहीही करायची अजिबात इच्छा नसते. उगाचच गोष्टी करायच्या म्हणून करतो आपण.पण अशा या वागण्याला काही अर्थ नाही.

मन स्वच्छ, उत्साही असताना एखादी गोष्ट करणं आणि मन निरुत्साही असताना एखादी गोष्ट करणं यात कितीतरी फरक आहे. एकदा निरीक्षण करून मनातील मरगळ झटकली पाहिजे.मनाला उभारी दिली पाहिजे.अवतीभवती असणारं गढूळ वातावरण मनालाही गढूळ करतं.पण मग अशा वेळी “Positive Energy” अर्थातच सकारात्मक ऊर्जा निर्माण करून मनातील मरगळ घालवण आपल्याच हातात आहे.

संत तुकाराम म्हणतात तसच…
||मन करारे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण||

मन प्रसन्न असेल तर सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात….पण मन प्रसन्न राहण्यासाठी मनातील मरगळ घालवणं गरजेचं आहे. मन आणि शरीर यांचा फार जवळचा संबंध आहे. मन ताजतवाणं असेल तर शरीराने आपण अगदी मजबूत  असतो..पण यासाठी गरजेची आहे ती “सकारात्मक ऊर्जा”.

आपलं मन सतत कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेलं असतं.थोडी म्हणून त्याला कसलीच उसंत नसते.नैराश्य, अस्वस्थता, ताण-तणाव, नकारात्मक विचार यांच्यामुळे मन थकून जातं.एक प्रकारची मरगळ या मनाला चिकटते.तर ही मरगळ घालवायची कशी….???

तर…………आज मी खूप थकलेय.मरगळल्यासारख झालयं मला….चहा ,कॉफी की सरबत घेऊ…..? जेव्हा शरीराची मरगळ जाणवते तेव्हा किती पटकन विचार करतो आपण….काय हवं काय नको त्याला.पण मनाला मरगळ येते तेव्हा……??? तेव्हा काहीच सुचत नाही. वेड्यासारख नकारात्मक ऊर्जेला मानगुटीवर घेऊन आपण फिरत असतो. सकारात्मक विचार करून मनाची मरगळ जाऊ शकते हे आपण विसरलेलो असतो.

यासाठीच पुन्हा एकदा चला सकारात्मक ऊर्जेला साद घालूया……………….तुमच्या माझ्या परिचयाच्या असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून…..

प्राणायम-योगासने :

कुणाला आवडतं तर कुणाला नाही. कारण एक तरी आळशी माणूस नाही असं मुळीच नाही. कणभर का होईना आपल्यात आळस हा असतो.पण प्राणायाम, योगासने करताना आपल मन खूप एकाग्र होत असतं.हळूहळू एकाग्रता वाढत जाते. पंधरा मिनीटाच्या या प्राणायाम नी योगासनामुळे उरलेला पूर्ण दिवस अगदी “फ्रेश”  जातो.एक सकारात्मक ऊर्जा दिवसभर आपल्या सोबत असते.

सकाळी मोकळ्या हवेत चालणं

पहाटेच्या वातावरणात मस्त सुखावणारा गारवा , पक्षांचा मधुर किलबिलाट, हिरव्या गवतावरचे दवबिंदू नी फुललेला बावरा प्राजक्त तनामनात एक वेगळीच रुंजी घालतात.या वेळी सकारात्मक ऊर्जा अगदी ठसठसून जाणवते.म्हणून म्हणते पहाटे थोडं मोकळ्या हवेवर चालायला जाऊया……

सकारात्मक विचार

विचार आणि मन दोन्हींची सांगड कशी घालायची हे आपणच ठरवायच. कारण जितके नकारात्मक विचार तितकी मनात मरगळ…… आणि याउलट जितक सकारात्मक वातावरण… विचार तितक उत्साही मन…म्हणून सतत सकारात्मक विचार करा.

व्यक्त व्हायला शिका

मनातल्या गोष्टी व्यक्त करायला शिका.मरगळलेल मन हळुहळू उभारी घेईल.गोष्टी सुसंवादयुक्त असाव्यात. उगाचच निरर्थक गैरसमजामुळे नैराश्य नको.

स्वतःला वेळ-स्वतःशी संवाद

स्वतःला वेळ देण खूप महत्त्वाच आहे.स्वतःशी निवांत संवाद साधून स्वतःला जितक समजून घेता येईल तितक समजून घ्यावं. चिडण रागावण कमी करून मनमोकळ्या संवादावर भर द्यावा.

छंद

सकारात्मक ऊर्जा आणि छंद यांच खूप जवळच “connection” आहे. छंद जगायला शिकवतात. नाना प्रकारचे ते छंद जोपासायला हवेत.कारण छंदातून आनंद मिळतो.आणि आनंदातून नवं काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते.

पुस्तकं आणि सुखावणारी गाणी

वपुर्झा” सारखी सहज सुंदर अशी पुस्तकं आणि मनाला शांतता देणारी “soothing” गाणी म्हणजे एक वेगळीच किमया असते.याने मनातील नैराश्याचे धागे कसे चटकन विरून जातात…

वागणं

रोजच्या वागण्यात थोडा बदल करायचा. कधीतरी मनसोक्त झोपायच.आई ओरडेपर्यंत लोळायच…. आवडेन ते पोटभरून खायच.”Rock songs” लावून बेभान होऊन नाचायच. किती किती “energy” येते त्याने.सगळ विसरून मनमुरादपणे बागडता आलं पाहिजे. वेदनांचा विसर तर तेव्हाच पडतो ना….!

ईतकच नाही तर….कोवळं ऊन, पावसाच्या सरीचा एक थेंब नी थंडीत स्वेटर घालून दोन घोट आल्याचा चहा…..मनातील, चिकटगोंड्यासारखी चिकटलेली मरगळ कशी क्षणात पळवून लावतात.

आयुष्य खूप सुंदर आहे.फक्त सकारात्मक दृष्टीकोनातून जगता आलं पाहिजे.त्यामुळे जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ सकारात्मक वातावरणात वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.कधी न कधी “मनाला मरगळ” तर येणार पण ती किती दिवस ठेवायची हे मात्र आपल्यावरच अवलंबून आहे. सभोवतालच वातावरण आनंदी ठेवा…आणि स्वतःही आनंदी रहा….सकारात्मकता कशी पावसासारखी बरसेल….!!आणि मनाची मरगळ कदाचित कायमची रूसेल…….

 चला… ,

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलुया…..
मनातील मरगळ सकारात्मक ऊर्जेने घालवूया…..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “मनातील मरगळ सकारात्मक ऊर्जेने घालवूया…..”

  1. श्री प्रदिप शंकर ठसाळे

    खुप छान लेख आहे मनाला ऊर्जा देणारी सकारात्मक
    वाक्य दिली पाहिजेत Ex mind program मी सुखी आहे मी आनंदी आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी सकारात्मक आहे
    माझे आरोग्य चांगले आहे

  2. खूप छान….. भारी वाटल वाचून ….2,3 वेळेस लेख वाचला ☺️🥰

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!