आनंदी संसार पुढे जाऊन उध्वस्त होण्याची कारणे पाहूया…
सोनाली जे
जेव्हा संसाराची नवीन नवीन सुरुवात होते तेव्हा एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणे यात वेळ जातो.किंवा याकरिता वेळ दिला जातो.कधी त्याच त्याच वातावरणातून थोडा बदल म्हणून बाहेर फिरणे, आवश्यक गोष्टींची खरेदी, कधी कधी उत्साही वातावरण निर्माण होण्यास एखादी movie बघितला जातो..आनंदी वातावरण निर्मिती किंवा सुखी संसार सुरू होतो.
सुरुवातीला दोघेही एकमेकांना भरपूर किंवा पुरेसा वेळ देवू शकतात. पण जस जसे रोजचे रूटीन सुरू होते..एकमेकांचे स्वभाव चांगलेच माहिती होतात..अर्थात दोन भिन्न व्यक्तिमत्त्व सारखी असू शकतं नाहीत..विचार , मानसिकता , आवडी निवडी भिन्न असतात..सुरुवातीला एकमेकांस जपले जाते पण रोजचे झाल्यावर हळूहळू दुर्लक्ष केले जाते किंवा होते..
जबाबदाऱ्या वाढू लागतात.मग पुरुष किंवा स्त्री दोघांच्या ऑफिस मधील असतील किंवा घरातील जबाबदाऱ्या ही असतील ..जसे की सुरुवातीला दोघेच असतात मग त्यात मुलांची वाढ होते मग त्यांच्या जबाबदाऱ्या ..वाढती कामे यात अडकून पडले जाते.
काही वेळेस या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी धावपळ, त्यातून होणारी चिडचिड, कधी कर्जाचा बोजा, ताण तणाव, कामाचा स्ट्रेस, अपुरी झोप, .किंवा एकमेकांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत..मग बोलणे असेल किंवा शारीरिक दृष्ट्या ही.कधी गडबडीत नेहमीची गोष्ट ही चुकते..विसरते..जमत नाही. एकमेकांची केलेल्या गोष्टींची कदर केली जात नाही .
कधी वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या असतील किंवा सांसारिक मीच का करायचे यापासून सुरुवात होते ..छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत मग मतभेद होतात.. parents responsibilities असल्या तर स्त्री अजून चिडचिड करते ..कुठे तरी तिच्या स्वातंत्र्यावर गदा आली असे वाटते तिला..
वय वाढेल तसे शारीरिक कष्ट ही झेपत नाहीत..किंवा शारीरिक तक्रारी सुरू होतात..हळूहळू शारीरिक मोकळेपणा त्यावर ही बंधने निर्माण होतात.
बऱ्याचवेळा स्त्रिया सांसारिक जबाबदाऱ्या , मुलांचे , घरच्या वरिष्ठांचे करण्यात, स्वैपाक असेल किंवा अगदी शाळेला सोडणे घेवून येणे , क्लास, शिवाय मुलांचे अभ्यास यात गुंतून पडतात की जोडीदाराला वेळ देवू शकत नाहीत.
यातून मग पुरुष ही बाहेर जास्त वेळ राहू लागतात, मित्र , बाहेरचे खेळ असतील , ऑफिस मध्ये पार्टी .असतील यात रमु लागतात. जुन्या मित्र मैत्रिणी त्यात किंवा नवीन मित्र मैत्रिणी शोधून त्यात रमू लागतात..यातून कधी संशय निर्माण होतात. तर विश्वास कमी होतो.
कधी त्यापलीकडे भावनिक आणि शारीरिक दोन्ही गरजा पूर्ती करिता स्त्री असेल पुरुष कोणी ही बाहेर नाती प्रस्थापित करतात..अर्थात प्रत्येक घरी असे होते असे नाही.
स्त्रिया ही सगळ्या रूटीन मधून बदल म्हणून पार्लर , मैत्रिणी ,, भिशी , किटी पार्टी यात रमू लागतात.. परत घरी आले की घरच्या जबाबदाऱ्या यात अडकून पडतात.
काही वेळेस एकमेकांच्या कडून अवास्तव अपेक्षा असतात, जसे की छोट्या घरात राहणारे मोठ्या घराची अपेक्षा , किंवा मुलांच्या कडून अवास्तव अपेक्षा , अगदी साधी ही अपेक्षा ऑफिस मधून दमून आल्यावर एखादा कप गरम गरम चहा , किंवा खूप दमल्यावर थोडे अंग चेपून देणे किंवा शांतता ठेवणे असेल किंवा अगदी शारीरिक सुखाची अनुभूती करिता maturity आलेली असते त्यामुळे एखादा अनुभव आधीचा चांगला असेल तर तिचं अपेक्षा पुढेही ठेवली जाते..
आता अगदी सहज उपलब्ध व्हिडिओज बघून तशा अपेक्षा जोडीदाराकडून ..आणि जेव्हा इच्छापूर्ती..अपेक्षा पूर्ती होत नाही तेव्हा आनंद तर दूरच पण पटवून घेण्याची मानसिकता ही राहत नाही . किंवा जोडीदाराची कमतरता, उणिवा सुरुवातीला सहन करून आता तडजोड करण्याची क्षमता संपते.
सुरुवातीला एकमेकांना प्रत्येक गोष्टीत वेळ देणारे शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक ही समाधान देणारे जेव्हा पुढे जावून कुठे ही sacrifice करण्याच्या मनस्थितीत नसतात..सगळी कार्य यंत्रवत पार पाडू लागतात..एकमेकांची ओढ, आपुलकी संपते , कमी होते, आणि आनंदी असणारे हे संसार जोडीदारांमध्ये अंतर पडू लागल्याने ही अगदी घटस्फोट घेण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतात..
किंवा मग मुलांच्या वर वाईट परिणाम होवू नये त्यांचें जीवन विस्कळीत होवू नये या करिता एकत्र राहत असूनही अंतर पडलेले संसार आहेत.
थोडक्यात काय तर अवास्तव अपेक्षा , पटवून घेण्याची मानसिकता संपते..एकाकी असल्याची भावना, तडजोड करण्याची वृत्ती संपुष्टात येते..किंवा एखाद्या गोष्टीत पूर्वी दोघांनी आनंद मिळविला असेल तरी ती गोष्ट एखाद्याला एकदा करायला आवडेल पण परत तीच करण्याची मानसिकता ही नसेल तरी मतभेद होतात.
आणि आनंदी , सुखी असणारे कित्येक जोडपी केवळ काही किरकोळ गोष्टी असतील तर कधी मतभेद तर कधी स्वातंत्र्य पाहिजे व्यक्ती म्हणून तर कधी स्वतच्या आवडी निवडी मारून जगायला तयार नसतात ..तसे कोणी मिळाले तर त्यांच्या सोबत ही पुढे जायचं विचार करतात नाही तर एकटे ही राहण्याची तयारी दर्शवितात..
जीवनाचे वैशिष्ट्य आहे येणारे अनुभव खूप काही शिकवून जात असतात..अगदी सुरुवातीला चालणे शिकणारे बाळ आणि पालक ही किती खुश होतात..याउलट ती रोजची गोष्ट झाली की ते लक्षात ही येत नाही..तसेच जोडीदाराचे ही संसारात आहे.ज्या गोष्टी आहेत त्याकडे बरेचदा दुर्लक्ष च होते आणि जे नाही त्याच गोष्टीवर अडून पडायला होते..त्याचा अट्टाहास ..आणि कधी कधी एकमेकांच्या मधील उणिवा ज्या बदलू शकणार नाही याची जाणीव आणि खात्री पटते.यातूनच खूप आनंदी असणारे संसार ही उध्वस्त होतात..
नाती जोडणे खूप कठीण असते आणि ती टिकविणे त्याहूनही कारण त्यात त्याग , प्रेम , ओढ , आपुलकी असते.तडजोड असते. जसे पदार्थ रुचकर बनविताना आंबट , गोड , कडू , तिखट , नमकिन घटक योग्य प्रमाणात असावे लागतात कमी किंवा जास्ती झाले तरी पदार्थ बिघडतो.. तसेच संसरतला ही एखादा घटक कमी पडतो, जेव्हा यातली एक किंवा अधिक गोष्टी कमी पडतात तेव्हा आनंदी संसार ही पुढे जावून उध्वस्त होतात.
तुटू नये याचा प्रयत्न करायचा ..पण काही वेळेस गोष्टी हाताबाहेर असतील तर सरळ एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस देण्यास शिकायचे
कुठेही मानसिकता बिघडवू द्यायची नाही. तवा तापला तर त्यावर हात ठेवला तर चटके बसणारच..तवा गार व्हायची वाट बघायची तसेच एकमेकांच्या. स्वभाव ही प्रयत्न करायचा संयम आणि शांतता राखण्याचा..
आनंद हा मानण्यात असतो…तो मृगजळ च जणू प्रत्येक वेळी तो निर्माण करावा याकरिता सगळ्यांनीच प्रयत्न करायचे असतात..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


