Skip to content

रागावर नियंत्रण नाहीये…..?? मग एकदा हे वाचाच !

– शुभम कोलगे

राग. राग असं म्हटल्यावर कुठलं तरी भांडण, आईचा मार वा बाबाचे डोळे वटारून पाहणं जरूर आठवतं. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली वा पटली नाही तर राग येतो. मग आपल्याला येणाऱ्या रागाचं कारण जितकी समोरची न पटणारी गोष्ट असते तितकेच आपण देखील असतो का….?

काही चांगल्या गोष्टी योग्य पद्धतीने घडाव्यात यासाठी रागावणे केव्हाही उत्तम कदाचित आवश्यक ! परंतु काही वेळा एटक्याश्या गोष्टीवरून आभाळ पेटवणं कितीत योग्य ? आपण कधी हा विचार करतो का कि आपल्याला राग येतो कसा.? मुळात तो येईलच कसा ? शी व सु असती तर ठीक आहे की ती आली परंतु या गोष्टींवर पण आपण नियंत्रण ठेवतो, मग राग ? आणि तो येतो कसा !!!!!!

एक उदाहरण घ्या. 
तुम्ही ऑफिस मध्ये गेलात तुम्ही तुमच प्रामाणिकपणे काम करताय नि काही कारणास्तव तुमचा बॉस येऊन तुमच्या चुका शोधू लागला. असल्या नसलेल्या गोष्टीवरून वाद घालू लागला, तुमच्या कामचोर पणाच्या पावत्या शोधू लागला. सर्व तुमच्या समोर घडतंय…..  परंतु तुम्ही शांत ! का? “अरे मी बोलेन पण याला उलट बोलल्यावर आपली नोकरी टिकणार आहे का ! मग अश्या वेळी आलेला राग गायब कुठे झाला की ऐकलत नि शांत बसलात नि गोड smile देऊन कामाला लागलात. आता रोजच्यासारखे त्रासलेले तुम्ही घरी आलात. Tv वर बातम्या लावून तसेच हातपाय ताणून बसलात. अचानक तुमची दोन्ही मुले टाहो फोडत तुमच्या समोर आली आत बायको भांडी आपटतेय.. हे सगळं बघून तुम्हाला राग येतो आणि तुम्ही चार शब्द बायकोला सूनवता नि एक एक करून दोन्ही मुलांच्या पाठीत लगावता.. का? राग आला ! मग तो मगासारखा आत का नाही राहिला ? कारण तुम्हाला हे माहितेय कि तुम्ही तुमच्या लहान मुलांना कितीही मारलं किंवा कितीही बायकोला रागावल तरी ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि विचार असा करा की यावेळी तुमच्या घरात सण असेल तर…. 
तर त्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन तुम्ही प्रेमाने समजावलं असतं….! नि बायकोचा हि हळूच रुसवा काढला असता. एकंदरीत काय तर तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही राग आणता ना कि तुम्हाला राग येतो. आणि तुम्ही विचार न करता त्याचा कुठेही स्फोट करता.
***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “रागावर नियंत्रण नाहीये…..?? मग एकदा हे वाचाच !”

  1. भावनांचे योग्य शब्दात प्रकटीकरण कसे करावे किंबहुना कसे व्यक्त व्हावे हे वडीलधाऱ्यांना जो पर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत अशा समस्या forward होत राहतील !!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!