टाईमपास म्हणून कोणाच्याही भावनांशी अजिबात खेळू नका!
सोनाली जे
मनाली अग काय झालं? अग मी कधी पासून तुझ्याशी बोलते आहे तुझे लक्षच नाही , काय झाले? काहीच नाही ग प्रिया .. मनाली अग असे किती दिवस चालणार, मनीष सगळे कधीच विसरून त्याच्या आयुष्यात पुढे गेला पण..तुझ्या असण्या नसण्याने त्याला काहीच फरक पडत नाही मग तू का अशी??
प्रिया अग कसे विसरू हे सगळे..शाळेत असल्यापासून दोघे एकत्र होतो . एकत्र राहता येईल म्हणून एकच कॉलेज निवडले.मला सायन्स ला admission घ्यायची होती पण त्याला कॉमर्स म्हणून कॉमर्स ला घेतली admission. कॉलेज पूर्ण होवून M.B.A. केले आणि जॉब ही मिळाले पण company वेगळी आणि तिथून बिघडत गेले.
त्याच्या सोबत काम करणारी मानसी त्याला आवडू लागली.आणि तो तिच्या सोबत च दिसू लागला..वेळ घालवू लागला..मी भांडले की मग अगदीं गोड बोलून जवळ यायचा ..मग फिरायला घेवून जायचा.शॉपिंग ..हॉटेलिंग..आणि मग त्यापुढे जावून ही सगळे काही…
हळूहळू अंतर वाढू लागले प्रत्येकवेळी मी चिडचिड भांडण केले की भेटायचो नाही आपणहून फोन नाही, मेसेज नाही, कुठे आहे काही माहिती नाही..मग अजूनच चिडचिड वाद..मी mesesage केले तरी बघायचा नाही..reply नाही. मी म्हणजे नंतर नंतर मानसी नसेल तर त्याचे टाईम पास चे साधन झाले होते..
इतर वेळा तो कुठे आहे काही माहिती नसायचे.काय करतो काही माहिती नसायचे..पूर्वी रोज भेटायचो. तासन तास फोन वर बोलायचो, रात्र रात्र चॅटिंग करायचो..प्रत्येक छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत सेलिब्रेशन असो किंवा सुख दुःखाच्या गोष्टी सगळे शेअर करायचो..भेटीची ओढ सतत असायची..
पण आता मानसी नसेल तरच माझी आठवण येते.तेही वाटते की मी रोज मेसेज करतेच त्यामुळे आणि मग time pass ..त्यातून पुढे जावून शारीरिक जवळीक संपले..मग नंतर परत मी आठवत पण नाही..
लग्नाचा विषय काढला की एवढी काय घाई आहे ग असे म्हणून विषय बदलतो.. आता परवा तर एव्हढे झाले की मी त्याला स्पष्टच सांगितलं की आता भेटायचे ते निर्णय फायनल करूनच..मानसी बद्दल बोलले तर म्हणाला तुला सरळ काही बघता येतच नाही.तू तुझ्या पुरता बघ की!!
तुझी वृत्ती संशयी आहे, तू स्वार्थी च आहेस..
आपण विचार केला पाहिजे आपल्या नात्याविषयी..मला त्रासच होतात.तुझ्या विचारांचे.वादाचे.आणि आता खूप झाले मी हे काही सहन करणार नाही तुला काय करायचे ते कर.
त्यानंतर फोन नाही , मेसेज नाही, मी मेसेज केला तर read पण केला नाही ..रोज वेड्यासारखी फोन बघते मेसेज आले की प्रत्येकवेळी आशेने बघते..फोन वाजला की त्याचाच फोन असेल असे वाटते आणि उत्साहाने फोन घ्यायला गेले की दुसराच कोणाचा तरी फोन असतो ..
अक्षरशः विचारांनी वेड लागते..भावना गुंतलेल्या आहेत ग प्रिया, छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत आणि आता तर भावनाच केवळ नाहीत पण शरीर ही सर्वस्व दिले याच विश्वासावर की आज नाही उद्या तरी आपण एकत्र असणारच आहे..लग्न करणारच आहोत..
पण हा सगळे संपवून गेला ग..का ग मनीष ला खरेच काही भावना नाहीत? का असे? कुठे कमी पडले ग मी?? मी काय खेळणे आहे का ग?? आज मनात आले खेळले वापरले उद्या सोडून दिले..उद्या परत दुसरे खेळणे मानसी?? आणि जर मानसी बरोबर ही पटले नाही तर मग अजून कोणी ??
का हे पुरुष स्त्री ला समजून घेत नाहीत, तिच्या भावना का समजू शकत नाहीत?? का प्रत्येकवेळी मित्रांसमोर फुशारकी करिता , टाईमपास करिता असतो का ग आपण मुली?? आपल्या सारख्या भावना मध्ये ते का अडकत नाहीत..
दरवेळेस त्यांचे निर्णय का अंतिम ? का आपण नुसते कठ पुतली सारखे नाचतो? का आपण त्यांच्या सारखे त्यांना वागवू शकत नाही.. इथे मनाली चा विचार झाला..तिची बाजू पाहिली आपण..
पण आज काळ एवढ्या झपाट्याने बदलत चालला आहे की काही मुली ही ज्या खूप मॉडर्न आहेत किंवा होण्याचा प्रयत्न करतात त्या ही मुलांना असेच टाईमपास म्हणून वागवतात..त्यांच्या बरोबर फिरायचे , मजा मारायची , पार्टी, धिंगाणा, कधी त्याही पलीकडे सगळ .सगळे टाईम पास ..मोकळीक घ्यायची.आणि एके दिवशी अचानक आई वडिलांच्या इच्छेने लग्न करून निघून जायचे..एखादा जर खरेच मनापासून गुंतला असेल तर उलट त्याचा दोष असाच आविर्भाव..
हेच मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये ही मुले मुली चक्क एकमेकांचा वापर करून घेतात..कंटाळा आला चल टाईमपास करू म्हणून मग पब , पार्टीज ..यात भावनिक असेल तो मात्र आयुष्यभर मनाली सारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत..वाट बघत , सैरभैर आयुष्य जगत असतात .एकलकोंडी..अगदी मानसिक समतोल ढळलेली..कुठे तरी शून्यात हरवलेली ..
खरे तर म्हणूनच या पिढीला तर सांगणे आहेच पण सगळ्यांनाच सांगावेसे वाटते कृपया कोणाच्या भावनांशी खेळु नका..कोणाकडे टाईमपास म्हणून बघू नका..त्यांच्या जागी तुम्ही स्वतः ला ठेवून बघा..तुमची बहीण..भावंडे बघा..
आपल्याच लोकांच्या भावना जपा त्यांना जपा..तर सोसायटी ही सुरक्षित राहील. प्रयत्न करा असे कोणी असतील तर त्यांना समज द्या..शरीराचे घाव ..जखमा भरून निघतात ही पण मनाचे घाव भरून निघत नाहीत..त्याची तीव्रता कमी होते पण ते घाव आयुष्यभर रहातातच..जपा स्वत : ला आणि आपल्या लोकांनाही.भावना सांभाळा..एक चांगले व्यक्तिमत्त्व घडवा..आणि आजूबाजूला ही तसेच घडविण्याकरिता प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
अगदी सत्य स्थिती आहे अस रोज घडत कोणा ना कोणा बरोबर