Skip to content

आनंद मिळेल याची वाट पाहण्यापेक्षा आनंदाची निर्मिती करा.

आनंद मिळेल याची वाट पाहण्यापेक्षा आनंदाची निर्मिती करा.


सोनाली जे.


काय असते हो आनंदाची व्याख्या?? आपल्याला हे मिळाले ..ते मिळाले की होतो तो आनंद ?? का या व्यक्तीने आपले कौतुक केले तो आनंद? का या व्यक्तीसोबत किंवा यांच्या सोबत असलो की त्यांच्या सोबतचा वेळ मग ते जे करतील तो आनंद??

इतरांच्या सोबत कायम आनंदी राहा..पण एकदा खरचं स्वतः मध्ये डोकावून पाहा ना..आपल्याला कोणत्या गोष्टींनी आनंद मिळतो..आनंद होतो..मग कधी एकटेच राहून बघा..आवडत्या गोष्टीत मन रमवून बघा..आपल्याला काय आवडते काय नाही याची एक लिस्ट तयार करा, काय काय गोष्टी केल्या आहेत आणि काय काय राहिले विचार करा.काय शिकायचे राहिले असे वाटत असेल तर शिकून घ्या..

वेळ कधीच जात नसते.कोणत्याही वयात शिकण्याची तयारी असेल तर शिकता येतेच.आत्मपरीक्षण करा..नाही तर लाँग ड्राईव्ह ला जा..मस्त music ऐका किंवा एखादे वाद्य वाजविता येत असेल तर ते वाजवा..छंद जपा.

लहान मुलांच्या कडून भरपूर शिकता येते..ती कशी स्वतः मध्ये रममाण असतात. सतत काही ना काही करत असतात..कोणी नसेल तरी त्यांची ती बडबडत असतात..कधी खेळ असतील तर कधी पावसाच्या पाण्यात भिजताना कागदी नाव सोडतील..

एकदा ऑफिस मधून घरी आले आणि बघितले तर माझ्या धाकट्या मुलीने वरती पूर्ण खोलीभर अख्खा जॉन्सन बेबी पावडर चा डबा रिकामा केला होता..सगळीकडे पावडर च पावडर..मोठीला म्हणले काय ग हे तू का नाही थांबवले तिला तर ती मला म्हणाली मी सांगत होते नको टाकू सगळी पावडर तर तिने ऐकलेच नाही..

आणि मला म्हणाली बघ यावर स्केटिंग मस्त होते म्हणून आम्ही स्केटिंग करत होतो..मला एव्हढे हसू आले मी पण त्या पावडर वर स्केटिंग करून बघितले मग काय मज्जाच मज्जा..पावडर वाया गेली हा राग त्या आनंदात कुठल्या कुठे पळून गेला..

मुले नेहमी काही तरी वेगळे प्रयोग करीत असतात..पण स्वतला त्यात गुंतवून आनंदी ठेवत असतात.. आपण काय चूक करतो तर आनंद मिळेल याची वाट बघत असतो..कोणी तरी येईल आपल्या करिता काही तरी करेल..movie बघायला जावू. सोबत शॉपिंग ला जावू असे करत कोणाच्या तरी सोबत असण्याची वाट बघत असतो…पण जरी त्यांच्या सोबत असलो तरी स्वतः चा आनंद स्वतः निर्माण करा..आतून येवू देत गोष्टी…किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा आनंद घ्या..

वाहन नसेल तर चालत मस्त मौज मजा करीत फिरा..वाहन असेल तर त्यातून जा ..पण दुचाकी आहे चारचाकी च नाही म्हणून नाराज होवू नका तर दुचाकी वरून सर्व मोकळ्या हवेतून ..इकडे तिकडे निसर्गाची मजा लुटत जा..रस्त्यात दिसणारे इतर लोक बघा ..जे चालत जात आहेत त्यांच्या दृष्टीने तुम्ही किती सुखी आणि आनंदी आहात…तो तुमचा आनंद समजून घ्या..ओळखून घ्या ..

रस्त्यावर खेळणारी गरीब कुटुंबातील मुले बघा जे मिळेल त्यात आनंद शोधत असतात..अगदी जुनी टायर मिळाली तरी त्यांच्या दृष्टीने ती चारचाकी च असते जणू.

आपण सगळेच जण बहुदा बाह्य जगातच आनंद मानत असतो..आपला आनंद व्यक्ती सापेक्ष , वस्तू सापेक्ष , किंवा स्थळ सापेक्ष असतो..
कधी तरी आनंदाची स्वनिर्मिती करून बघा..दुसऱ्या कोणाकडून ही आनंद मिळेल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतः मध्ये आनंद शोधा..कसा बरे??

माईंडफुलनेस माईंड: आनंदाची स्वनिर्मिती…

माईंडफुलनेस (मनोसाक्षीभाव)-

माईंडफुलनेस म्हणजे माझ्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील मानसशास्त्रीय जाणिवामध्ये (emotional feelings), त्यांच्या प्रतिसादांमध्ये (responces), त्यांच्या निर्धारमध्ये (confirmation), त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये (reactions) त्यांच्या अनुभूतीमध्ये (experience) या सर्व घटकांमध्ये जाणीवपूर्वक बदल करून घेणे…

आपण नेहमी काय करतो तर बाह्य जगाला महत्व देतो जसे आपण एखाद्याला बघताक्षणी एखाद्याची personality छान आहे असे म्हणतो ते कशावरून तर फक्त बाह्य रुपावरून.. जसे आपण बाह्य जगाला महत्व देतो तसे आपल्या अंतर्गत जगात जरा डोकावून बघा की.
माईंडफुलनेस माईंड (मनोसाक्षीभाव)-

हा आपल्याला मानसिक दृष्ट्या परिपक्व बनविण्याकरिता किंवा आपल्याला अधिक जागृत करण्याकरिता आपले मानसिक संतुलन ठेवण्याकरिता आणि आनंदाच्या परमोच्च बिंदूवर पोहचण्या करिता मदत करतो.जसे की आपण म्हणतो आत्मपरीक्षण च जणू..आपल्या भावना ,( emotions) , thoughts ( विचार), feelings, या अंतर्गत भावना बाह्य जगताशी inter connected आहेत.

मनाच्या आनंदमयी अवस्थेपर्यंत पोहाचण्या करिता किंवा आनंदमयी जीवनाची अनुभूती घेण्याकरिता अंतर्गत बदल .मानसशास्त्रीय गोष्टी समजून घेणे आणि स्वीकारणे गरजेचे..काही वेळेस विचार , भावना हे negative , नकारात्मक असू शकतात त्याची जाणीव स्वतः मध्ये करून घेणे आणि त्याचा स्वीकार करणे हे सुधा गरजेचे असते.कित्येकवेळा आपले मन आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी जाणून बुजून स्वीकारत नाही .जसे समजा एखाद्या गोष्टीवर पटकन react होतो आपण ..प्रतिक्रिया देतो ..कधी तरी चिडतो ही..

पण समजा त्या परिस्थिती मध्ये शांत राहिलो लगेच react झालो नाही थोडा आवेग ओसरू दिला तर शांत डोक्याने एक वेळ प्रतिक्रिया दिली नाही तरी चालेल पण रागाच्या भरात चुकीची प्रतिक्रिया नको. पण जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतः ला ओळखाल तेव्हाच हे बदल घडवून आणू शकाल. मग सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी दोन्ही चा स्वीकार कराल तेव्हा ते आंतरिक समाधान आणि आनंद देवून जाईल .

योगा, meditation, motivational व्हिडिओज तुम्हाला स्वतः ला जाणून घेण्यास मदत करतील. आणि बाह्य जगतातला आनंद क्षणिक आहे परंतु आंतरिक आनंद किंवा मनोसाक्षीभाव कायम टिकणारा आणि सुखाच्या परमोच्च बिंदूवर घेवून जाणारच ..त्यामुळे प्रयत्न करा स्वतः मधले छोटे आनंद स्वतः शोधण्याचा , ते जपण्याचा. क्षणिक आनंद निर्मिती पेक्षा दीर्घकालीन आनंद सुखाची अनुभूती च देणारा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!