Skip to content

तो ‘गे’ निघाला, मग त्याने माझ्याशी लग्न तरी का केलं ??

तो ‘गे’ निघाला, मग त्याने माझ्याशी लग्न तरी का केलं ??


सौ. शमिका पाटील


ऑफिसमध्ये प्रणयने सर्वांसमोर स्मिताला लग्नाची मागणी घातली, तिचा होकार मिळताच टाळ्यांचा नुसता गडगडाट झाला. एका मोठया कंपनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर चे काम करत असणाऱ्या स्मिताचे तर भाग्य उजळले. प्रणयची स्वतःची कंपनी होती, पार्टनरशीप मध्ये तो आणि त्याचा मित्र सुदीप ती कंपनी चालवत होते.

प्रणयची अफाट श्रीमंती होती, मोठा बंगला, ३ गाड्या, घरात नोकरचाकर इतकेच नव्हे तर बाहेरगावी सुध्दा त्याची प्रॉपर्टी होती. एवढ्या श्रीमंत मुलाला त्याच्या बरोबरीची मुलगी अगदी सहज मिळाली असती तरीही त्याने स्मिताला पसंद केली. सगळ्यांसाठी हा गोड धक्काच होता.

ऑफीस मध्ये पहिल्या दिवसापासून त्याला स्मिता आवडायची. अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्याने कमी वेळात तिने सर्वांशी मैत्री केली, दिसायला सावळी पण रेखीव, ड्रेसिंग मिडल क्लास टाईप, पण तिचा हसरा चेहरा प्रणयच्या मनात घर करून गेला.

हळू हळू त्याने तिच्याशी ओळख वाढवली आणि मग मैत्री केली, पुढे जाऊन त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल हे कोणालाच ठाऊक नव्हते. ती मध्यम वर्गीय होती तरीही प्रणयाच्या घरच्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला. लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले, स्मिताच्या घरातल्यांना कुठल्याही प्रकारचे ओझं नको वाटायला म्हणून लग्नात फार कमी रोषणाई करण्यात आली.

आपल्या मुलीला इतके प्रेम करणारा नवरा तसेच एवढे श्रीमंत घराणे लाभले म्हणून तिच्या माहेरचे देखील खुश होते. येणारा प्रत्येक पाहुणा दोघांना बघून made for each other म्हणत होता. स्मिताचा आनंद तर गगनात मावेनासा झाला जेव्हा तिला समजलं की लग्नानंतर फिरायला दोघे बाहेरगावी जाणार आहेत. अतिशय सुरेख पद्धतीने लग्न सोहळा पार पडला.

दोन दिवसांनी दोघेही परदेशात फिरायला जाणार होते, स्मिताने आजपर्यंत फक्त लोकल ट्रेन ने प्रवास केला असतो पण आता पहिल्यांदा विमानात बसायचा योग येणारं होता, एअरपोर्टवर तिला सुदीप सरांसारखा कोणीतरी दिसतो. ती लगेच प्रणयला सांगते, मला आत्ता सुदीप sir दिसले. सुदीप हा बिझनेस पार्टनर सोबत प्रणयचा एक चांगला मित्र पण असतो.

छे, तो नसेल, मी त्याच्यावर चांगली हफ्त्याभराची जिम्मेदारी सोपवली आहे. तो कशाला जाईल कुठे फिरायला. खोटं वाटतं असेल तर कॉल करून बघुया का ? नको हो, कदाचीत हुबेहूब दिसणारा कोणीतरी असेल. आपण जाऊयात, फ्लाईट सुटायची वेळ झाली आहे. विमानात बसल्याचा एक वेगळाच अनुभव स्मिताला आला, ती खुप खुश होती. तिथे गेल्यावर प्रणय एका आलीशान हॉटेल मध्ये स्मिताला घेऊन गेला.

तिथले दृश्य बघून तिच्या डोळ्याचे पारणे फिटले. Wow प्रणयजी, किती सुंदर हॉटेल आहे, खुप महाग असेल ना. तू काय पैसे घेऊन बसलीस, तुझ्या आनंदापुढे सर्व फिके आहे. चल, तुला रूम दाखवतो. प्रवास करून स्मिता खुप थकली होती, तिला बेड वर पडल्या पडल्या कधी झोप लागली समजलेच नाही. प्रणय सुध्दा तिला उठवत नाही.

मध्य रात्री जेव्हा तिला जाग येते, तेव्हा ती रूम मध्ये एकटीच असते, प्रणय कुठे दिसत नाही म्हणून तिचा जीव घाबरा होतो. अंधारात लाईट लावून ती रूमच्या बाहेर येते, एवढ्या पॉश हॉटेल्स चे रूम सगळे लॉक असतात. ती प्रणयला आवाज देत देत पुढे येते, तेच एका दरवाजाजवळ तीचे पाय थांबतात. तिला आतून प्रणयचा जोरजोरात हसण्याचा आवाज येत असतो.

ती कसलाही विचार न करता, दरवाजा ठोठावते, प्रणय नुसता व्हाईट कलरचा टॉवेल गुंडाळून दरवाजा उघडतो. त्याला असे अर्ध नग्न बघून स्मिताला घाम फुटतो, तेच पाठून आवाज येतो, कोण आहे रे ? स्मिता आतमध्ये वाकून बघते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते. सुदीप अंगावर चादर घेऊन झोपलेला तिला दिसतो. तिची बोबडी वळते, थरथर कापत ती तिच्या रूममध्ये येते. पाठोपाठ प्रणय सुध्दा येतो. हे सर्व काय आहे प्रणय ? तू रिलॅक्स हो, मी सर्व काही सांगतो.

सुदीप आणि मी एकमेकांवर प्रेम करतो म्हणजे आम्ही कपल म्हणून एकमेकांसोबत राहतो. पण घरच्यांना आमचं नातं पटणारं नाही म्हणून मी तुझ्याशी लग्न करण्याचं ठरवलं. निदान, आमचं स्टेटस तरी टिकून राहील. कुटुंबाची लाज राखण्यासाठी मी आमचं नातं समाजापासून लपवून ठेवलं.

उद्या जर हे प्रकरण बाहेर आलं तर त्याचा परिणाम आमच्या बिझनेस वर होईल म्हणून तुझ्यासारख्या गरीब मुलीसोबत लग्न करुन मी सर्वांचे मन जिंकले. पण स्मिता तुला मी कधीच बंधनात नाही ठेवणारं, तू तुझं आयुष्य हवे त्या प्रकारे जगू शकतेस. मी कधीच अडवणारं नाही.

तुझ्या माहेरच्यांच्या सर्व गरजा मी पुर्ण करेन, सगळे लोन मी फेडेन फक्त हे प्रकरण बाहेर येऊ देऊ नकोस. सुदीपला मी कधीच सोडू शकणारं नाही, पण तुलाही मी कधी नाराज करणारं नाही. दॅट्स माय प्रॉमिस. स्मिताला एखादा विजेचा धक्का बसल्यासारखी ती स्तब्ध होते.

एवढा मोठा विश्वासघात झाल्यावर तिची पुढे काही बोलायची इच्छा नसते. दीर्घ श्वास घेऊन पुढे काय करायचे ह्यासाठी विचार करायला ती थोडा वेळ मागते.

स्मिताने ह्या नात्याचा स्वीकार करायला हवा की नको ???


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!