Skip to content

केवळ मुलांसाठी एकत्र राहणाऱ्या पती-पत्नींसाठी हा लेख!!

केवळ मुलांसाठी एकत्र राहणाऱ्या पती-पत्नींसाठी हा लेख!!


अपर्णा कुलकर्णी


आपल्या देशात अशी कित्येक कुटुंब आहेत ज्या मध्ये नवरा बायको च एकमेकांसोबत पटत नाही पण मुलांसाठी ते दोघं एकत्र राहत आहेत.काही जणांचा संसार बरीच वर्षे होतो मुले मोठी होतात आणि मग त्यांच्यात वाद निर्माण होतात.अशा वेळी बहुतेक घरात बायको ल बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.तर काही ठिकाणी लग्नाला काहीच वर्षे झालेली असतात एखाद् अपत्य असत आणि लझात येत की आपलं पटत नाही.मग मुल लहान असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे वेगळं न होता आयुष्य तडजोड करून घालवण्याचा विचार केला जातो.

पण ही तडजोड काही दिवसांची किंवा महिन्यांची नसून आयुष्यभराची असते हे दोघांनीही लक्षात घ्यायला हवे आहे.बर ही तडजोड कधी मुलासाठी,समाजासाठी,बऱ्याच वेळा आई वडील यांच्यासाठी करतात नवरा बायको.पण मुले लहान असो किंवा मोठी घरातल्या वातावरणाचा परिणाम कळत नकळत त्यांच्यावर होतच असतो तो ही आयुष्यभर.

मुलांना एक छान हसत खेळत वातावरण हवं असत,आई आणि बाबा यांचं एकत्र प्रेम हवं असत. तरच मुले मानसिक दृष्ट्या सक्षम होतील.प्रत्येक आई बाबा आपल्या मुलांना हे देण्याचा काटेकोर पण प्रयत्न करत असतील पण तरीही कुठेतरी काहीतरी कमतरता भासातच राहते.

जिथे पालक वेगळे न होता मुलांसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात तिथेच ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दोघंही पालक म्हणून मुलाच्या भल्याचा विचार करत आहेत.पण तेवढंच पुरेस नाही.जेंव्हा तुम्ही मुलांसाठी एकत्र राहण्याचा विचार करता तेंव्हा काही गोष्टी दोघांनीही कटाक्षाने पलयलाच हव्यात.

१. मुलांसमोर वाद घालायचा नाही.

२. एकमेकांच्या अपरोक्ष मुलांना एकमेकांबद्दल काही बोलायचं नाही.

३. तुमच्यात कितीही गैरसमज आणि वाद असले तरीही मुलांसमोर पालक म्हणून वावरताना एकत्र दिसायला हवं.तुमच्यात नात्यातील अडचणी मुलांसमोर यायला नकोत.

४. रोज दोघांनी एकत्र वेळ काढून मुलांना द्यायला हवा.

अशा काही गोष्टी स्वतः वर नियम घालून पालयलाच हव्यात.तर ती मुल नीट वाढतील नाहीतर तुमचं एकत्र राहणं निष्फळ होऊन जाईल.आधी एकमेकांसमोर बसून नीट बोला,समस्येच्या मुळाशी जा,करणं समजल्यानंतर त्यावर उपाय योजना करा आणि जमलच तर एकमेकांना मोठ्या मनाने माफ करून टाका.

आपल्या भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत आज ही बायकांवर खूप अत्याचार,अन्याय होतोय.आणि प्रत्येकच स्त्री वेगळं होऊन एकटीने आयुष्य घालायचा विचार नाही करत.स्त्री ल काही सामाजिक,भावनिक बंधने असतात.म्हणून ती नेटाने संसाराचा गाडा पुढे ढकलत असते.तिच्या बाबतीत झालेला अन्याय,मनाची पिळवणूक नाही विसरता येत.काही जखमा आयुष्यभर कोरल्या जातात मनावर कितीही काळ लोटला तरी.मान्य अगदी मान्य.आपण काय कोणी संत महात्मा नाही सगळं विसरून पुढे जायला.साधी माणसं आहोत.

पण या जखमा तुम्ही सतत उकरून काढत राहिलात तरी त्याचा काय उपयोग?? हे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी कायमच लपवून ठेवणे च योग्य नाही का ??

घरात नेहमी वावरताना आपण तोच तो विचार सतत मनात ठेवून तर सगळ्यांशी वागत नाहीत ना ?? उगाच घरातल्या लोकांचा राग आपल्या मुलांवर काढत नाही ना ?? झालेल्या गोष्टींचा अती विचार करून स्वतःला आणि इतरांना त्रास देत नाही ना ?? मुलांसमोर राग काढून आपली खरी बाजू चुकीची तर सिद्ध होत नाही ना ??

या गोष्टींचा विचार व्हायला हवा.जे झालं ते झालं ते बदलणं शक्य नाही पण त्यातून योग्य तो बोध घेऊन वागणं तर आपल्याच हातात आहे.माणूस मात्र भुळणा पात्र.कधी कधी नवरा/बायको आपली चूक लक्षात घेऊन नीट वागण्याचा प्रयत्न करत असतील पण त्यांनी केलेल्या जुन्या चुकांमुळे आपल्या ते लक्षात येत नसेल.

मला अस नाही म्हणायचं की पटतच नसेल तरी पटवून घ्याच आणि पूर्ण आयुष्य तडजोडीने,अन्याय सहन करत घालावा.काही वेळा नाहीच शक्य होत पटवून घेणं.

पण तोडण्या आधी एकदा विचार करा की हे नात इतकी वर्षे का जपलं ?? कारण तोडून टाकणं खूप सोपं आहे पण जोडणं महाकठीण.आपण निदान प्रयत्न तरी करूया.अस वाटायला नको की हे केलं असत तर आज एकत्र असलो असतो.

परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो नवरा बायको ने वेगळं न होता अडचणी शोधून त्यावर उपाय करायला हवा. असच जर सगळ्यांनी वेगळं होण्याचा विचार केला तर एकही कुटुंब एकत्र राहणार नाही.जरा एकमेकांच्या कलेने घ्या.आपल्या माघार घेण्याने घरात शांतता राहणार असेल तर माघार घ्यायला काय हरकत आहे?? आणि ती ही आपल्याच माणसांसाठी.

वेगळं होण हा पर्याय नक्कीच नाही.दोघांनी मिळून एका नव्या जीवाला जन्म दिलेला असतो,हे जग दाखवलेलं असत,आई बाबा होण्याचं स्वर्गसुख प्राप्त झालेलं असत.त्याच्यासाठी सगळे हेवेदावे विसरून नव्याने जगायला लागा,नव्याने नात्याची सुरुवात करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “केवळ मुलांसाठी एकत्र राहणाऱ्या पती-पत्नींसाठी हा लेख!!”

  1. pratyek weli baykawar anyay hoto ani mahilawarach anyay hote he bolne chukiche aahe … Purush hi khup man marun jagat astat

  2. नवरा बाहेरख्याली आहे व तो त्या मैत्रिणीचेच ऐकून वागत असले आणि फक्त शरीर संबंध ठेवण्यासाठी जवळ येत असेल, 5ते10 मिनिटे, तर काय करायचे बाकी सर्व वेळ परस्त्री बरोबर तर कस व काय पटवून घ्याचे.? मुले मोठी पण शिक्षण चालू त्यांचे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!