Skip to content

शारीरिक सुख नसल्यास वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते का ?

शारीरिक सुख नसल्यास वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते का ?


सोनाली जे


तसे खर तर हा खूप सखोल विषय आहे..समाजशास्त्र, शरिरशास्त्र, मानसशास्त्र , वैद्यकीय शास्त्र , रसायनशास्त्र म्हणले तरी सगळ्या च शास्त्राचा याच्याशी खूप निकटचा संबंध आहे. मुळात लग्न ही कॉन्सेप्ट वरील सर्वच शस्त्रांशी निगडित.

लग्न करून दोन भिन्न लिंगाच्या व्यक्ती सर्वार्थाने एकत्र येतात .आता यात अर्थ, धर्म , काम , मोक्ष हे चारही धर्म आलेच..पूर्वापार चालत आलेली लग्न संस्था दोन भिन्न लिंगी लोकांना विचार, आचार, राहणीमान, संस्कार, शरीर मिलन , प्रजोत्पादन , मुलांचे संगोपन , या दृष्टीने एकत्र आणते.
खरे तर आपण जर गृहीत धरले की एक विवाहित दाम्पत्य आहे ..तर साहजिकच त्यांच्यात आकर्षण , शारीरिक सुख या गोष्टी अपेक्षित असतात..

लग्न झाल्यावर काही वेळेस समजते की जोडी दारा पैकी एकाला कोणाला शारिरिक सुख देण्याची किंवा घेण्याची फारशी आवड नसते..पण तरी ही लग्न झाले आहे म्हणून जोडीदार म्हणतो म्हणून काही वेळेस जबरदस्ती ने ही हे शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात .परंतु जबरदस्तीने, नाराजीने प्रस्थापित झालेले हे संबंध दोघांनाही आनंद देवू शकत नाहीत..वैवाहिक जीवन सुखी बनवू शकत नाहीत.

आता एक दुसरा भाग विचारात घेवू लग्न झाल्यावर दोघेही शारीरिक सुख देण्यात घेण्यात आणि वैवाहिक जीवनात अतिशय समाधानी होते परंतु मुलांच्या जन्मानंतर एकमेकांना वेळ देणे, बोलणे , किंवा शारीरिक सुख यापासून दुरावा निर्माण होतो अर्थात हे मुद्दाम कोणीच करत नाही परंतु परिस्थितीजन्य असते.तरीही एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो…

आपला जोडीदार आता आपल्याकडे दुर्लक्ष करतो ही भावना निर्माण होते..किंवा खरेच शारीरिक गरजांची पूर्ती होवू शकत नाही त्यामुळे दोघांच्यात सतत ताण ..तणाव ..चिंता ..काळजी निर्माण होते..कधी कधी पुरुष ही ऑफिस ..व्यवसाय यात पूर्ण बिझी होवून जातो त्यामुळे ही स्त्री एकटी फील करू शकते..किंवा स्त्री ही ऑफिस ..व्यवसाय ..घरकाम, मुले ही सगळी जबाबदारी , कसरत सांभाळत असताना जोडीदाराला वेळ देवू शकत नाही त्यामुळे ही पुरुष ही एकटा आहे असे फील करू शकतो..

वैवाहिक जीवनात शरीर सुख हा महत्वाचा दुवा असतो दोघांना एकत्र आणण्याचा ..येण्याचा..काही वेळेस वाद असतील ते मिटविण्याचा..ताण असेल तो कमी करण्याचा..किंवा खरेच एकमेकांच्या शरीरातील हार्मोन्स जी शरीर सुख आणि एकत्र येण्याकरीता द्रवतात.आणि मग खरेच सगळे मानसिक , शारीरिक ताण कमी होतात.

Freud या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यांच्यामते भूक किंवा अन्न, तहान , झोप या गोष्टी व्यक्तीच्या basic needs आहेत त्याचप्रमाणे शारीरिक सुख ही एक भावना ही आहे आणि basic need ही आहे.जसे भूक लागली अन्न पाहिजे, तहान लागली की पाणी प्यावेस वाटते तेच शरीर ही त्याची गरज भागविण्यासाठी डिमांड करते..आणि ती वेळेत पूर्ण झाली नाही तरीही भूक लागली आणि अन्न मिळाले नाही तर जी अवस्था होते तीच शरीराची ही ..

काही वेळेस काही शारीरिक व्याधी असतील आणि त्यामुळे शारीरिक सुख avoid केले जाते तेव्हा योग्य ते निदान करवून कायमचे मार्ग काढणे जरुरीचे असते.

विवाहित दाम्पत्या मध्ये केवळ शारीरिक संबंध असणे ही एक वेगळी गोष्ट आणि शारीरिक सुख ही वेगळी गोष्ट..आता कशी काय बरे?? नुसते शारीरिक संबंध यात सुख ही भावना येते का ?? तर बरेचदा केवळ गरजपूर्ती करिता दोन चार मिनिटात भागविली गेलेली भूक म्हणजे शारीरिक संबंध.

आणि जर शारीरिक सुखाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर शारीरिक सुखाची सुरुवात आधी मनापासून होते…तुम्ही दोघेही एकमेकांना किती चांगले ओळखता, आवडी निवडी , मग अगदी एकमेकांना आकर्षित करण्याकरिता चे प्रयत्न ..त्यादृष्टीने पेहराव , भाव , त्यात involvement , विषय , गप्पा, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात..वागण्यातून , बोलण्यातून, नजरेतून एकमेकांची ओढ ,हलकासा स्पर्श हा शरीर आणि मन उत्साही आणि प्रफुल्लित करतो, आकर्षण वाटणे, वाढणे जरुरीचे असते..

त्यातून मग शारीरिक संबंध आणि अगदी सांगायचे झाले तर यातून दोघांना satisfaction मिळणे गरजेचे असते..तर ते सुखी आणि आनंदी होतात..तसे झाले नाही तर मग चिडचिड होते, वाद होतात..एकमेकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम होतो.

शारीरिक सुख शरीराच्या गरजा पूर्ती करतातच त्या शिवाय मानसिक गरजा पूर्ती, ही करीत असतात.. सुखाच्या सर्वोच्च बिंदूवर पोहचवितात , भावना नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. आपला आधार आहे , सोबत आहे आणि आपणही जोडीदाराकरीता महत्वाचे आहोत याची सकारात्मक जाणीव ही उत्साही राहण्यास मदत करतात..

त्यामुळे शारीरिक सुख नसेल तर वैवाहिक जीवन सुखी होवू शकत नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “शारीरिक सुख नसल्यास वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते का ?”

  1. एन.अशोक

    माझी पत्नी कॅंन्सरमुळे १३ वर्षांपूर्वी वारली.
    माझे आज वय 63 आहे. या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये माझी इच्छा असूनही कौटुंबिक दबावामुळे मी दुसरे लग्न करू शकलो नाही
    तसेच सामाजिक बंधनांमुळे अन्य मार्गाचा अवलंब करू शकलो नाही.. शरीर साऊथच्या न मिळाल्यामुळे मला सर्व काही असून नसल्यासारखे वाटते.. एकाकी जीवन जगायचे म्हणून जगतो आहे… म्हणतात ना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही
    काही उपाय सांगितला तर बरं होईल

  2. प्रा,पाटील सर

    सर आपले लेख मी नेहमी वाचत असतो आपला जर या संदर्भातील watsap ग्रुप असेल तर माझा मो नंबर 9527698168
    ऍड करावा आपला वाचक

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!