Skip to content

मनासारखे काहीच होत नसेल तर अशा वेळी काय करावे ??

मनासारखे काहीच होत नसेल तर अशा वेळी काय करावे ??


सोनाली जे


मनासारखे होत नाही म्हणजे काय होते बरं??? आपण एखादी गोष्ट अशी घडावी , तशी घडावी , अगदी एखादी व्यक्ती अशी वागवी अशी इच्छा करतो , अपेक्षा ठेवतो आणि ती घटना तशीच घडली नाही किंवा ती व्यक्ती आपल्या अपेक्षे प्रमाणे वागली नाही तर आपण दुखावतो..
काही लोक म्हणतात माझ्या मनासारखं कधीच घडत नाही..आणि तसे घडले नाही की काही वेळेस या व्यक्ती एकल कोंड्या होतात, चिडचिड करू लागतात, अस्वस्थ राहू लागतात, सततची चिंता.. anxiety, स्ट्रेस , कधी कधी निराशा depression मध्ये ही जातात.

मनासारखे काहीच होत नसेल तर अशा वेळी काय केले पाहिजे याचा आपण विचार करूयात..

१. Don’t expect and accept…

साध्या साध्या गोष्टीत अपेक्षा करीत असतो आपण जसे की दोघी घट्ट मैत्रिणी आहेत ..तर अपेक्षा करतात की मी हीची चांगली मैत्रीण हिने मला सगळे सांगावे..पण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव , वर्तन , त्याचे विचार , त्याच्या सभोवतालचे वातावरण हे भिन्न असते. काही वेळेस काही गोष्टी सांगते ती मैत्रीण दुसरीला पण काही वेळेस नाही..पण या मैत्रिणीच्या डोक्यात ती सांगत नाही हेच बसते.याउलट ती चुकून विसरली असेल , गडबडीत असेल किंवा योग्य वेळ आली की सांगेल किंवा तिला ती गोष्ट तेवढी महत्वाची वाटत नसेल म्हणून सांगत नसेल हे बाकीचे विचार ही डोक्यात येत नाहीत . आणि समोरची व्यक्ती कशी वागावी हे आपण कोण ठरवणार? त्या व्यक्ती चे स्वतंत्र अस्तित्व आहे.

आपण जसे आपल्या मनाप्रमाणे , गरजेप्रमाणे, विचार , परिस्थिती प्रमाणे वागत असतो तसेच इतरांचे आहे ही गोष्ट स्वीकारा.. आणि अपेक्षा ठेवू नका जे आहे त्याचा मनापासून स्वीकार करा.. तरच मनासारखे घडले नाही म्हणून येणारे नैराश्य, चिडचिड थांबेल , चिंता कमी होईल..जे आहे ते accept करून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा…खूप चांगल्या गोष्टी आहेत तिकडे बघा.. जी परिस्थिती येईल तिचा स्वीकार करण्याची वृत्ती जोपासणे. ही वृत्ती शहाणपण, सहिष्णुता, सामंजस्य ह्या सदगुणांनी युक्त हवी.

२. Control your state of mind. ..

स्वतच्या मनावर , विचारांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा..एकदा जर भात्यातून बाण सुटला तर परत तो भात्यात ठेवता येत नाही..त्यामुळे तुमच्या भावना ..मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर …mind state var control ठेवा.

एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर rudeLy.. उद्धटपणें वागतो. वागते..असे का? तर हे त्यांच्या स्वतः मध्ये किती मोठ्या प्रमाणत स्ट्रेस आहे हे indicate करते.. जसे एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या आजारी असते तिच्यावर आपण औषधोपचार करतो आणि विश्रांती घेण्यास सांगतो .विश्रांती देतो ..तसेच जी व्यक्ती rudely वागते तिला मानसिक थकवा आला आहे , स्ट्रेस आहे असे समजून मदत करण्याचा प्रयत्न करा नाही तर तुम्ही शांत रहा…

त्यांच्या अशा वागण्यामुळे तुम्ही स्वतः डिस्टर्ब होवू नका..upset होवू नका..फक्त शांतपणे smile द्या..समोरची व्यक्ती react करणे सोडून देईल..आणि तुम्ही जर त्यांचे थोडेसे विचित्र वागणे दुर्लक्षित केले अगदी सांगायचे तर digest केलेत तर तुम्ही शांत राहाल..उंच झाडांच्या सारखे वादळ, सोसाट्याच्या varyat, धो धो मुसळधार पावसात , कडाक्याच्या थंडीत ही त्यावर कशाचा परिणाम होत नाही..कारण काय त्या वृक्षाची मुळे खूप खोलवर रुजलेली असतात..जमिनीला घट्ट धरून असतात..

मुळात पाया घट्ट असतो त्यामुळे इतर कोणत्याच गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही ..तसेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत..वातावरणात स्वतः वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा.आणि तुमच्या या कंट्रोल किंवा तटस्थ भूमिकेतून, समजून घेण्याच्या भूमिकेतून , शांत राहण्याचा भूमिकेतून समोरच्या व्यक्तीच्या ही लक्षात येईल तुमचे त्यांच्या प्रती असलेले unconditional love.

३. Create Alternate way of thinking.. ..

थ्री डी किंवा फोर डी इमेज आपण कशी बघतो तसेच एखाद्या विचार किंवा व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन ठेवा. नदीचे पाणी दुथडी भरून वाहू लागले , पुर आला तर नुकसान होते..आणि पावूस कमी पडला तर हे वाया जाते पाणी म्हणून खरे तर जसे आपण पाणी जाणार असेल तेव्हा पाणी साठवून ठेवतो मग बादली असेल, टाकी असेल किंवा पिप असेल..

तसेच धरण म्हणजे काय पावूस भरपूर आला आणि ते पाणी वाया जावू नये आपत्कालीन परिस्थिती मध्ये त्याचा वापर करता येईल म्हणून मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या करिता केलेला पाणी साठा..

हा एक प्रकार झाला..आपण घरगुती रेन हार्वेस्टिंग मधून ही पाणी साठा तर करूच शकतो .थोडक्यात काय एक नाही तर अनेक पर्याय , विचार आपल्या कडे तयार ठेवा आणि त्याचा वापर ही करा..विविध मार्गांनी विचार करत गेल्यास कुठे ना कुठे इप्सित स्थळी सुधा पोहचता येते .आणि सर्व गोष्टींचा विचार करून पुढे जात राहिलो तर मनाची संभ्रमावस्था टाळता येते.

४. Delete emotional baggage of Past memories ,hurt or failure…

Computer वर कसे आपण command गाजवित असतो..एखादी गोष्ट नको असेल तर delete करतो. Recycle bin मधून ही नको असल्यास कायमची काढून टाकतो तसेच काहीसे आपण व्यवहारात ही दैनंदिन जीवनात ही आचरणात आणले पाहिजे..past memories आपल्या करिता महत्वाच्या असतात परंतु समोरच्या व्यक्तीला ही त्या तेवढ्याच महत्वाच्या वाटत असतील असे नाही ना!!

आणि तसेही होवून गेलेली चांगली किंवा वाईट घटना खरेच सोडून द्यावी त्यातून आपल्याला आलेले चांगले किंवा वाईट अनुभव लक्षात घेवून पुढे वाटचाल करावी .कोणी त्या क्षणी दुखावले असेल आपल्याला किंवा आपण दुःखी झालो असू किंवा आपल्या मुळे इतर कोणाला त्रास झाला असेल तर ती गोष्ट मोठ्या मनाने माफ करून तिथल्या तिथे सोडून दिली पाहिजे..

तसेच अपयश ही..पूर्वी कधी तरी अपयश आले होते म्हणून आताही अपयश च येणार ही भावना मनातून काढून टाका..तेव्हा अपयश का आले होते ? कारणे कोणती होती ? काय चूक झाली होती .मग ते शैक्षिणक , नोकरी किंवा नात्या सबंधित असेल तरी ही जे घडले त्यात कोणती कारणे झाली का परिस्थिती हाताबाहेर गेली..ती नियंत्रणात आणण्या करिता काय केले पाहिजे हा विचार करून कृती करा.

जसे गॅस वर दूध तापत ठेवले असते ..आणि आपण काही इतर कामे करत असतो ..दूध उतू गेले ..का गेले तर आपले लक्ष नव्हते आपला focus नव्हता ..इतर कामे करताना लक्षात राहिले नाही…किंवा गॅस मोठा होता..किंवा अगदी फ्रिज मधून काही काढताना गॅस कडे दुर्लक्ष झाले..ठीक आहे होवून गेली घटना पुढच्या वेळेस आपण नक्कीच काळजी घेतो ना ..गॅस बारीक करू ..किंवा दूध तापवून इतर गोष्टी करू..
तसेच जीवनात ही साध्या गोष्टीतून शिका..past विसरून present मध्ये जगा…

आकाशवाणी वरचे announcer किंवा गायक , वादक , आर्टिस्ट किंवा painting करणारा आर्टिस्ट असेल त्यांचा प्रत्येक performance महत्वाचा असतो…एकदा चांगले केले झाले असे नसते..प्रत्येक वेळी तोच दर्जा किंवा त्याहून जास्त चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो तरच लोकांना ते अपील होते..तसेच आहे आपले आयुष्य ही..सततचा परफॉर्मन्स देत राहणे..मागचा वाईट झाला तर त्यात काय चुकले आणि काय सुधारणा करता येईल हे विचार करून पुढे जात राहणे.

५.Refresh + Recharge = Restart

Delete केल्यावर सुधा आपण आपले Phone computer refresh करतो त्याकरिता एक बटन असते…मग आसेच आपल्या मनाचे ही बटन शोधून काढा स्वतः laa refresh करा आणि परत रिचार्ज करा..जसे की आपल्या आवडत्या गोष्टी करा , छंद जोपासा, मित्र मैत्रिणी यांच्या सोबत बोला ..मोकळे व्हा..आणि नसतीलच मित्र मैत्रिणी तर पुस्तके वाचा ..music ..भटकंती करा आवडत्या गोष्टी करा…आणि नावडत्या गोष्टी असतील तर त्या का नावडत्या याचा अभ्यास ..

विचार करून त्या जिद्दीने करण्याचा प्रयत्न करा…अवघड कोणतीच गोष्ट नसते .. फक्त आपली इच्छा नसते ते करण्याची…किंवा धाडस नसते. मनाची तयारी नसते…कोणतीही गोष्ट साध्य होवू शकते जर योग्य दिशेने प्रयत्न केलेत तर.. ज्या गोष्टी मनासारख्या होत नसतील किंवा ज्या परिस्थितीत घडत असतील..

परिस्थिती नियंत्रणात नसेल जशी कोरोना ची सुरुवातीला असंख्य लोकांचा नाहक मृत्यू झाला पण आता vaccine आले..विवीध सोयी सुविधा निर्माण झाल्या..बरीच परिस्थिती नियंत्रणात आली तसेच आहे प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडेल असे नाही ना ..आणि नाही घडले तसे तर आवडत्या गोष्टी करून स्वतः ला रिफ्रेश करून रिस्टार्ट करा की…लागले तर थोडे थांबा..विसावा घ्या आणि परत जोमाने पुढे जा..

६. Accept it, change it , leave it..

गोष्टी किंवा स्वतः किंवा इतरां मधले बदल स्वीकारा…गोष्टी स्वीकारता येत नसतील तर बदला त्याकरिता स्वतः मध्ये सामर्थ्य निर्माण करा..
आणि जर काहीच जमले नाही तर गोष्टी, व्यक्ती तिथेच सोडून पुढे जा…काही गोष्टी वेळेवर सोडून द्या..वेळच योग्य ते ठरवेल किंवा परिस्थिती वर सोडून द्या..

सगळेच कायम आपल्या मनासारखे होईल हाच विचार मुळात मनातून काढून टाका. आपल्या कंट्रोल मधल्या गोष्टी नक्की करा..पण ज्या आपल्या हाताबाहेर आहेत त्याचा ..इतरांनी आपल्याशी चांगलेच वागले पाहिजे हे सोडून द्या तुम्हाला चांगले वागायचे तर तुम्ही चांगलेच वागा..मनाविरुद्ध झाले म्हणून हिरमुड होवू देवू नका.हताश होवू नका..परत नवीन जोमाने उठा आणि पुढे चला..बघा मग आयुष्यात किती सकारात्मकता येईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!