मृणाल घोळे मापुस्कर
स्ट्रगल म्हटलं की; संघर्ष, ओढाताण, लढा तारेवरची कसरत वगैरे फार गंभीर शब्द आपल्या डोळ्यांपुढे रिंगण घालू लागतात. पण माझ्या दृष्टीनं स्ट्रगल म्हणजे आयुष्याच्या शिक्षणातील ही एक प्रात्यक्षिक परीक्षाच जणू आणि कोणत्याही शिक्षणात नुसती थेरी पक्की असून काय उपयोग.. त्याच प्रमाणे या आयुष्यनामक शिक्षणातही प्रात्यक्षिक परीक्षा हवीच..
स्ट्रगल म्हणजे; कोणत्याही गोष्टीचा झगडा सुरु असताना त्या दरम्यान मिळणारे अत्यंत मोलाचे अनुभव. या अनुभवांमुळे जीवनाचा पाया मजबूत होतो.. अणि एकदा का हा पाया मजबूत झाला की त्यावर आपण आपल्या स्वप्नांची कितीही मोठी ईमारत उभी करू शकतो.. आपल्याला नकोशी वाटणारी प्रत्येक गोष्ट वाइट नसते केवळ त्यातील चांगली बाजू आपल्याला शोधता येणे गरजेचे असते..
स्ट्रगलशिवाय आयुष्याची गणिते सुटतीलही कदाचित पण ते आयुष्य खूप मिळमिळीत होऊन बसेल..
जसे चांदण्यांशिवाय चंद्राला शोभा नाही त्याचप्रमाणे स्ट्रगलशिवाय आयुष्याला रुची नाही.. म्हणूनच भरपूर बरे वाइट अनुभव स्वतःचे स्वतः घ्या आणि भरभरून आयुष्य जगा..
सर्वांना आयुष्याच्या या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा….
***
‘आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”