तीच लग्न झालं, आता मी काय करु ?
लालचंद कुंवर
उरुळी कांचन , पुणे.
‘ हम तुम्हे इतना प्यार करेंगे
के लोग हमें याद करेंगे ‘
हे ‘ बिस साल बाद ‘ या चित्रपटातील अप्रतिम असं दोन प्रेमी जीवांच्या मनातील भावविश्व जगाला सांगणार हे गीत.
खरचं एकमेकांमध्ये एवढं प्रेम असावं , की लोकांच्या आठवणीत आपण रहावं.
किती सुंदर तरल भावना आहे की, ज्याच्याशी जीवापाड प्रेम करावं ,त्याच्याशीच लग्नाची गाठ बांधली जावी. प्रेमात असतांना जी सुखी आयुष्याची स्वप्न ज्याच्या सोबत रंगवली, ती प्रत्यक्षात साकार व्हावी. ज्यांनी पाहिलेली स्वप्नं साकार केलीत , ते खरोखरचं ‘ प्रेम ‘ या शब्दाला जागलेत !
खरचं, या गीता प्रमाणे.
अपने प्यार के सपने सच हुए
होठों पे गीतों के फूल खिल गये
सारी दुनिया छोड़ के मन मीत मिल गये
अपने प्यार के सपने…
का होतात , काहींचे प्रेमाचे स्वप्न साकार ?
आणि का राहते काहींची , एक अधुरी प्रेम कहाणी ?
हे जर जाणून घेयायच असेल तर ‘ प्रेम ‘ या भावनेमागचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल. खरं तर , प्रेम म्हणजे काय आसक्ती , मालकी हक्क नव्हे ,
अणि लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नव्हे.
प्रेम ,लव्ह ,लोचा अणि लग्न यांचा सहसंबंध काय आहे हे लक्षात घ्यावे लागेल. बऱ्याचदा आकर्षणालाच प्रेम समजलं जातं. परिणामतः नको त्या वयात , नको तेवढा भावनिक गुंता वाढवून ठेवला जातो. अणि येथेच खरी मेख आहे. पण याची झळ पोहचल्याशिवाय लक्षात येत नाही.
जगप्रसिद्ध मनोविकारतज्ञ फ्रॉइड यांनीही हेच सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नलिंगी आकर्षण हे खूप लहानपणापासूनच असते अणि ते असण नैसर्गिकच आहे. अगदी अजानत्या वयापासून ते वयात येण्याच्या टप्प्यावर आपल्याला कोणीतरी like करावं … कोणीतरी आपल्याला notice करावं…… आपलं कौतुक करावं …….. ,
हि भावना मनात हळुहळू जन्म घेत असते. जेव्हा हे प्रत्यक्ष घडायला लागतं त्यावेळेस एक सुखद संवेदना मेंदूमध्ये जागृत व्हायला लागतात.
मग अशा मनस्थितीत असताना सर्व काही छान छान दिसत असतं. खरा चेहरा, एकमेकांमधील दोष याची पुसटशी जाणीव हि होत नसते
मग येथेच नेमका लोचा होतो !
कालांतराने पुढे दोन गोष्टी घडून येवू शकतात ….., एक ज्या वयात करिअर वर फोकस करून उज्ज्वल भवितव्यासाठी झटायच असतं , त्यावेळी प्रेमात पडून आयुष्याचा लोचा करुन ठेवतो. अणि दुसरं अजाणत्या वयात प्रेमाच्या नावाने भावनिक गुंता वाढवून ठेवल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा आणि खरा स्वभाव लक्षात येईलच याची शाश्वती नसते.
म्हणून किशोवयीन अवस्थेत निर्माण झालेलं प्रेम हे बहुतांशी वेळा फक्त आणि फक्त आयुष्याची मातीच करु शकत.
बरं जे हा किशोरवयीन वादळी अवस्थेतून करिअर घडवत सुखरुप या टप्प्यातून बाहेर पडतात , अणि जर प्रेम निर्माण झालाच तर की ज्यात बालिशपणा व आकर्षणाचा लवलेशही नाही……. ! एक प्रगल्भ अणि वैचारिक बैठकीच्या जाणीवेतून ज्यांच्यात प्रेम जडल …… !
त्यांच्या
आयुष्याच्या दिशा …..
आवडी निवडी……
वैचारिक लेव्हल……
सर्व काही एक होत……
तरीही का राहाते एखाद्याची अधुरी प्रेम कहाणी……… ?
खरं तर, Matured Love हे कधीच एकमेकांना सोडून परव्यक्तिशी लग्न करण्याची अनुमती देत नाही.
मग अशा वेळी नेमक घडतं काय…… ?
तरी अशा matured प्रेमात जी हिम्मत एकमेकांच्या सहवासात घालवण्यासाठी दाखवतात, तेच गट्स प्रेम मिळवण्यासाठी का दाखवले नाही … ?
सध्या तरी जातीपातीचे बंधन गळून पडली असली तरी कुठेतरी स्वतः ला सिध्द करण्यास अणि येऊ घातलेल्या परिस्थितीशी सामना करण्यास का कमी पडलोत….. ? याच डोळसपणे चिंतन असावच.
एक वेळेस अख्खं जग जिंकता येण सोपं पण एखाद्याचं मन जिंकण इतकं सोपं नसतं…… ! मग दोन परिवाराची मन का जिंकता आली नाहीत ? याच आत्मपरीक्षण असावं.
शक्य असलेली गोष्ट , अशक्य करून , लग्नाच्या गाठीत अणि सप्तपदीच्या वचनात राहण्याची संधी गमावलेली असताना. पुढे तीच लग्न झालं, आता मी काय करु ? हि सल मनात घेऊन जगतांना, काही घटनांचा केवळ भावनिकतेतून न पाहता सारासार विवेकबुद्धीतून पहाण्याची दृष्टी असावी.
का तर, आता ती कोणाची तरी बायको झालेली असते , हे सत्य कितीही कटू असल तरी मनाला बजावून सांगावंच लागेल. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नव्हे पाहिजे तेव्हा, पाहिजे तस वागायला. अविचाराने केलेली एक कृती चार लोकांचं आयुष्य आणि दोन कुटुंबांचे संसार उध्वस्त करु शकते नव्हे करतेच…… !
याची जाणीव सतत सदसदविवेकबुद्धीला करून द्यावी लागेल. कुठेतरी आपण कमी पडलो, हा समंजसपणा दाखवावा लागेल. कदाचीत केवळ आपल्या धरसोडवृतीमुळे, sacrifice of love हे प्रायचित्त अजन्म म्हणून घ्यावं लागेल.
नाहीतर याच्यासारखी ” प्रेम ” या शब्दाची विटंबना कुठली असेल ?
समाप्त
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

