Skip to content

आज आपण जिवंत आहोत, याहून दुसरा शुभमुहूर्त कुठलाच नाही.

आज आपण जिवंत आहोत, याहून दुसरा शुभमुहूर्त कुठलाच नाही.


सोनाली जे.


आयुष्य खरेच खूप सुंदर आहे…रोज उगवणारा नवीन दिवस आपल्याकरिता काही तरी नवीन घेवून येत असतो. आणि दिवसाच्या शेवटी काही तरी नवीन अनुभव देवून जात असतो..नवीन गोष्टी शिकवून जातो.

आयुष्यात करण्यासारखे खूप काही आहे..सतत आनंदी , उत्साही आणि positive राहिलो तर रोजचा दिवस सुदिन च म्हणावा.. खूप लहान असताना बघितलेला आनंद हा सिनेमा आजही तेव्हढाच भावून जातो , कितीही निराश , उदास असलो तर केवळ आनंद सिनेमामधल्या राजेश खन्ना यांनी साक्षात जिवंत केलेला हा आनंद आपल्याला जगण्याची नवी उमेद देऊन जातो ,

जगात आपले कोणी नाही , आपला मित्र नाही तरी रस्त्यावरून चालणारा, जाणारा असेल तर त्याच्या पर्यंत आपले vibes पोहचवून त्याच्याशी आपण बोलून मोकळे होणारा , आणि असेच खरेच एकदा समोरून ही ,मुरारीलाल कडून कुतुब मिनार वर भेटलेल्या आठवणी , मैत्रीचे vibes मिळूनही जातात.

डॉक्टर भास्कर बॅनर्जी याना आनंद या कथेकरिता पुरस्कार मिळतो , तो घेत असतानाच सुरुवातीचे वाक्य आनंद को हमेशा दोस्ती की तलाश थि ,

त्यातले हे वाक्य तर आयुष्य आनंदात जगण्याचा मंत्र च देवून जाते.. “बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही ”

जसे की आयुष्य छोटे असेल तरी त्यात खूप वेगवेगळे अनुभव असावेत…सतत नवीन शिकण्याचा ध्यास असावा..मग ते केवळ शैक्षणिक ..शालेय शिक्षण नाही तर कला असेल, संगीत असेल किंवा अगदी डॉक्टर असेल तरी नुसत्या डॉक्टर मधून specialist डॉक्टर किंवा शल्य. चिकित्सक होण्याकरिता चे प्रयत्न असतील..

जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचा लाभ घ्यावा.. सुंदर मोहक रंगसंगती असलेल्या फुलपाखरा चे आयुष्य खूप कमी असते..पण ते फुलपाखरु कधी स्वच्छंद उंच भरारी घेते तर कधी या तर कधी त्या फुलातील मकरंद शोषून घेतात.त्याला पकडायला गेलो तरी भरकन उंच भरारी घेवून हुलकावणी देते..छोट्याश्या आयुष्यात ही खूप आनंदी ..मुक्तपणे भ्रमण करणारे हे फुलपाखरू..

असेच माणसाचे ही असावे…येणाऱ्या संकटाना धीराने तोंड देवून मनसोक्तपणे आयुष्याचा आनंद लुटला पाहिजे..

आज कोरोना सारख्या रोगाने गेली दीड वर्ष धुमाकूळ घातला आहे त्यात नवीन नवीन variations येत आहेत..आता काय तर delta variants, असे जीवघेणे व्हायरस येत आहेत शिवाय इतरही रोग..हृदयविकार, कॅन्सर असे बरेचसे रोग ही असतील किंवा जाता जाता आपली चूक नसतानाही होणारे accident असतील..

जे आपले सगळ्यांचं आयुष्य डळमळीत करून उद्या चा दिवस किंवा सकाळ आपल्याकरीता उजाडणार का नाही असे काहीसे गंभीर प्रश्न पडत आहेत..आणि सध्या जेव्हा आपण रात्री झोपून सकाळचा नवीन दिवस बघतो तो नवीन दिवस आपल्या करिता उगवितो..तेव्हा आपण जिवंत आहोत ही जाणीव आणि आयुष्य पुन्हा भरभरून जगण्याचा, नवीन गोष्टी करण्याचा, जिद्दीने नवीन गोष्टी करण्याचा ..शिकण्याचा, .आनंद ..उत्साह मिळविण्याचा , सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा याहून दुसरा शुभमुहूर्त कुठलाच नाही किंवा नसावा..

यात ही नेहमी वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा दिवस हा एक उनाड दिवस movie सारखा भरभरून जगण्याकरीता शुभमुहूर्त देणाराच असावा.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!