Skip to content

दहा वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडले…आणि ??

दहा वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडले…आणि ??


वाचनात आलेली एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा..

आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी, याचं नवल मलाचं वाटतं..दिसायला एकदम दणकट, राकट म्हणजे कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा.

कॉलेजमध्ये येऊन टवाळक्या करायच्या. बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची.बुलेट काढून सगळ्या कॉलेजला कानठळ्या बसवायच्या, पण पोरींच्या बाबतीत फुल रिस्पेक्ट. टुकार पोरांचा कॉलेजमध्ये असताना त्रास व्हायचा. त्यांच्या प्रोपोज ला नकार दिला की गाडीची हवा सोड, सीट फाड असे भिकार चाळे चालायचे. याच्याशी ओळख झाल्यानंतर या सगळ्या लफड्यातून सुटका झाली…

त्याचा आधार वाटायचा. प्रेम वगैरे होतं हे फार नंतर कळालं. एखादा पुरुष आपल्यासाठी ढसाढसा रडतो हे पाहिल्यानंतर मनात कालवायचं. २१ वर्षाची होते मी. कोणताही निर्णय घेण्याची अक्कल नव्हतीच. घरच्यांना खोटं बोलून त्याच्यासोबत फिरायला जायचे. कित्येकदा असे प्रसंग आले, त्याच्या मनात आलं असतं तर तो वाट्टेल ते करू शकला असता. मीदेखील आडवलं नसतं. उलट मलाच कधी कधी इच्छा व्हायची. मिठी मारून पाठीवर हात फिरवायला पाहायचे पण तो तिथेच आडवायचा.तू लहान आहेस बेटा, हे सारं नको….

त्याचं लग्न झालं पण मला त्याची लागलेली सवय काही सुटत नव्हती. वाटायचं कशाला त्याच्या संसारात ढवळाढवळ करायची. कितीही प्रयत्न केला तरी राहावायचं नाही आणि मी फोन करायचे. उगाच रडायचे. तो समजावून सांगायचा. लग्न कर म्हणायचा, तुझं मन रमेल. मी तर त्याची रखेल म्हणून राहायलाही तयार होते…

त्याने जपलं मला. माझ्या मनाला सांभाळलं. तिशी पार केलेल्या पुरुषाला एक विशीतली तरणीताठी पोरगी सर्वस्व देत होती, पण त्याने मोह कधीच केला नाही. भेटायला यायचा. बायकोसोबतचे फोटो पाहिले की मी चिडायचे. तुला आता मिळाली, माझी कशाला काळजी वाटणार. त्याने तोल कधीच ढळू दिला नाही. माझ्या बालीशपणाला परिस्थितीच भान आणून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला…

आज मला एक मुलगी आहे. नवरा चांगला कमवणारा, प्रेम करणारा, सगळं सुखात. कॉलेजचा विषय निघाला की आठवण येते त्याची. फेसबुकवरून कॉनटँक्ट देखील केला मी. भेटायला येशील का विचारलं. सुरुवातीला तो नाही म्हणाला, मग मीच जास्त फोर्स केला. माँल मध्ये भेटायचं ठरलं. आरशासमोर नटताना वेगळाचं उत्साह होता. लिपस्टिक नीट लागलीये का हे पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. दिवाळीत घेतलेली नवीन कोरी साडी नेसली. दर्ग्याशेजारून आणलेलं छान अत्तर लावलं, त्याला आवडणारं. ठरल्या वेळेला संध्याकाळी पोहचले…

तास दोन तास झाले, तो आलाच नाही. मी फोन लावला पण लागतचं नव्हता. वाट पाहायचं ठरवलं. आठ वाजून गेले तरी तो नव्हता आलेला. प्रचंड राग आला. ही कुठली वागण्याची पद्धत झाली. चिडचिड करत मी रिक्षा पकडली. त्याचा काँल आला. हावरटासारखा मी लगेच उचलला…

“छान दिसत होतीस. सुंदर अगदी. बर्याच दिवसांनी पाहिलं तुला. तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेलीये. फेसबुकवर पाहिलं मी. काही आठवणी आठवणीच चांगल्या असतात बेटा. त्यांना फुलासारखं जपायचं. तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले. किती बदल झालाय तुझ्यात. मला मोह नसता आवरला म्हणून समोर नाही आलो. स्वतःला असंच जप. काळजी घे, तुझी आणि घरच्यांचीसुद्धा…..”

फोन कट झाला. पुन्हा लागणार नाही याची खात्री होती. आजही तोच जिंकला. मी अजूनही लहानच आहे, बालिश,पोरकट. तो मैदानात उतरलाचं नाही. स्वतःची विकेट राखून ठेवली त्यानं…..माझा डाव सावरण्यासाठी.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

17 thoughts on “दहा वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडले…आणि ??”

  1. Lekh changla aahe yavr kay paryay aahe ka
    Mulgi17 mulga29 muliche shikshan chalu aahe mulga9 vi napas mulgi hushar aahe1no asto nehmi mulgi eikat nahi aasha veli palkani kay karayche plz sangal ka

  2. खूपच छान.. असं कुणी काळजी घेणारा

    भेटायला पण नशीब लागत.

  3. माझ्या जीवनावर आधारित आहे
    मी बी.एड ला नागपूर येथे शिकत होतो नंदा एक मूलगी आणि तिच्या गावच्या 5/6 मैत्रीनी सुध्दा बी.एड ला प्रवेश झाला होतो नंदा खूप चांगली मैत्रीन होती
    कॉलेज सुरू झाले होते ऑगस्त महिन्यात सर्वात शेवटी एक ऍडमिशन झाली ती एडमिशन झाली ती नंदाची जवळची मैत्रीन होती तिला घेऊन नंदाने मगच दराने आत आली
    मी 4 रो मध्ये 3 डेक्स वर अनिल गायकवाड सोबत बसायचो नंदा आणि तिने प्रवेश केला मी तिला पाहले मनात विचार सुरू झाला कोण ही बानकर मॅडम चा तास चालू होता ती येऊन बसली
    पाठ निरीक्षण चालू होते मॅडम तिला उभे केले तिला शिकविण्यास सुरवात केली तिचा 1ला दिवस होता मॅडम नी मला पाठचे निरीक्षण करण्यास सांगितले मी पाठ निरीक्षण करताना तिला म्हणालो मॅडम तुमचा आवाज खूप सुंदर आहे तास संपला सर्वजण बाहेर आले ती पाण्याच्या फिल्टर जवळ उभी होती
    तिने मला पहाले मी तिला पाहाले तिच्या डोळ्यांत चमक होती मी अनिल गायकवाड पुढे निघून गेलो क्लास रूम मध्ये जातांना नंदा भेटली ओळख करून दिली नंदा ओळख करून दिली ती कायमची मी त्यापेक्षा10 वर्षां मोठा होतो माझे सुध्दा लग्न झालेले होते

  4. LEKHA CHAN HOTA KHAR PREM HE NIRAGAS ASAT AAPAL EKHADYA MULIWAR /MULAWAR PREM ASEL TE JAR NAHI MILALE TAR TYCHI AJIBAT KHANT KARU NAYE JE MILAL TE AAPAL NASIB AAP JINKE KARIB HOTE HAI WO BADE NASIB WALE HOTE HAI HAR KISI KO NAHI MILATA …

  5. चांगली माणसं आहेत हेच दिसतयं … छान आहे लेख!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!