तुमच्या छंदांना गंज लागण्याआधी त्याचा वापर जगण्यासाठी करा.
सोनाली जे.
साधारणपणे मानसशास्त्रज्ञ maslow यांच्या नियमानुसार human needs ५ स्टेजेस मध्ये त्यांनी सांगितल्या आहेत आणि त्या मानवी वर्तनाला कायम motivate करतात.
१. Physiological needs … जसं की खाणे, पिणे, झोपणे, या गोष्टी पूर्ण झाल्या तर तो safety needs चा विचार करतो..
२. Safety needs .. जसे physical आणि financial stability.. आणि ती आली की social needs विषयी विचार करतो व्यक्ती..
३. सोशल need.. मनुष्य समाजशील प्राणी आहे..त्याला कायमच इतर लोकांची गरज असते. जेव्हा खाण्या पिण्याची चिंता मिटते..इन्कम ची , राहण्याची चिंता मिटते तेव्हा व्यक्ती जोडीदार, मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात रमू लागते.
४. Esteem needs… social needs पूर्ण झाल्या की सेल्फ esteem विषयी विचार करू लागतो…जसे इंटर्नल कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स… आणि external confidence जसे की दुसऱ्याकडून respect मिळविणे..इतरांच्या पेक्षा superior दाखविण्या करिता ब्रँडेड गोष्टी..मोबाईल .. कार etc..
५. जेव्हा व्यक्तीच्या सगळ्याच गरजा पूर्ण होतात.. फुलफिल होतात तेव्हा ती सेल्फ actualization कडे वळते.. म्हणजे काय की माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या , कामाचे प्रेशर नसले किंवा आर्थिक घडी सुरळीत बसली की माणसाला आपल्या छंदाची आठवण येते…किंवा स्ट्रेस कमी करण्याकरिता ही व्यक्ती मग आपला छंद परत जोपासू लागतो..जसे कोणाला पेंटिंग करण्याची..ड्रॉइंग ची आवड असेल , कोणाला संगीत , music , डान्स ची , कोणाला travelling ची मग विविध देश दर्शन ..कोणाला देवाची आवड असेल तर विविध स्तोत्रे..देवदर्शन करेल…कोणाला खेळ आवडत असतील…कोणाला भरतकाम विणकाम..
आता मानसशास्त्राच्या नियमानुसार व्यक्ती हे आपले छंद कधी जोपसते तर सर्व गरजा पूर्ती झाल्यावर म्हणजे काय तर उमेदीचा बराच काळ सरल्यावर…तेव्हा मग कदाचित डोळ्याला चशमा असेल तर भरतकाम करताना डोळे दुखतील..तर चित्रकार उत्कृष्ट चित्र काढत असून वाढत्या वयातील दुखणी जसे एका जागी बसून पाठदुखी होईल..तर उत्साह थोड्या प्रमाणात वाढेल पण इतर त्रासामुळे त्याचा वापर करून उत्साह वाढण्याऐवजी बाकी त्रासंकडे लक्ष केंद्रीत होईल..
सर्वांना मनापासून सांगावेसे वाटते की आपला छंद हा आपल्याला कायमच जोपासता आला पाहिजे…इतर गरजा पूर्ण करण्याच्या मागे आपले छंद मागे पडतात त्यावर गंज चढतो..तसे होवू देवू नका..तुमचे छंद कायम सोबत ठेवा त्यातून तुम्हांला कोणतेही काम करण्याकरिता उत्साह ..energy मिळेल..
जर तुमचा छंद च तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही अधिक आवडीने ..मनापासून आणि उत्साहाने काम कराल…जसे की एखादी व्यक्ती चित्रकार आहे आणि ती खूप चित्रं काढून त्याचे प्रदर्शन ही भरविते आणि त्यात विक्रीही तर आवडता छंद जोपासताना work satisfaction ही मिळालेच…आनंद मिळालाच आणि वेळ energy योग्य मार्गाने लागली त्यातून इन्कम ही मिळाले तर सोन्याहून पिवळे च की..
अगदी छंद च आपला व्यवसाय म्हणून नाही करू शकलो तरी ही कामाचा खूप मोठा ताण असेल, शारीरिक श्रमाचे काम असेल किंवा जास्त बुध्दीचे काम तरीही शारीरिक आणि मानसिक थकवा येतोच तो दूर करण्याकरिता तुम्ही थोडा वेळ का होईना तुमचा छंद जोपासत गेलात तर काम करण्याकरिता ताकद , energy बरोबरच खूप positivity मिळेल..mind आणि body fresh होईल…
उदाहरण द्यायचे झाले तर गुगल कंपनी चे work station बघितले तर तिकडे सर्व सोयी आहेत…प्रचंड मेंदूचे काम , बुध्दीचे काम असते तेव्हा मेंटल फटिग येतो..त्यांना त्या कामातून बदल म्हणून तिथे सर्व सोयी देण्यात येतात..जसे एखाद्याला खाण्यात आनंद मिळतो…विविध प्रकारचे खाण्याचे प्रकार असतात…एखाद्याला विविध खेळ जसे कॅरम , टेबल टेनिस असेल किंवा इतर ही गेम …किंवा एखाद्या चे बसून बसून अंग जड झाले असेल…ते मोकळे होण्याकरिता जिम , स्विमिंग पूल , किंवा अगदी मस्त स्पा असेल …अगदी theatre ही असेल जिथे बसून मस्त आवडत्या movie बघून परत उत्साहाने कामाला सुरुवात कराल..
थोडक्यात काय सतत काम करून त्यातून तोचतोचपणा येत गेला तर काम करण्याचा कंटाळा येतो या उलट काम करत असताना हसत खेळत काम केले तर कामाचा कंटाळा तर येतच नाही पण मनापासून काम केले जाते त्यातून output वाढते..नावीन्य देवू शकतो आपण..creativity वाढीस लागते..
जसे लहान मुलांना ओरडुन , चिडून अभ्यासाला बसविले तर त्यांची एकाग्रता तर होत नाहीच…शिवाय जबरदस्तीने अभ्यासाला बसविले म्हणजे नकारात्मकता वाढीस लागते आणि अभ्यास करण्या ऐवजी ते टाळाटाळ.. टंगळमंगळ करू लागतात..याउलट त्यांना हसत खेळत कविता म्हणत शिकविले किंवा अभ्यासात थोडा ब्रेक दिला …मध्येच एखादा तास खेळण्याचा..किंवा music चाही दिला, किंवा चित्रकलेचा दिला तर पुढचा अभ्यास ते अजून आवडीने करतात..
म्हणजेच काय तर आवडी निवडी..छंद जरूर जोपासा आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला तर सकारात्मक राहाल…कधी negative झालात…energy कमी पडते वाटते तेव्हा हेच छंद तुम्हाला संजीवनी बुटी वाटतील आणि परत तुम्ही नवीन जोमाने ..जोशाने कामात रममाण व्हाल..
कर्तव्य ..काम कराच पण तुमच्या छंदाना गंज न चढविता त्याचा वापर करून स्वतःला कायम उत्साही , तत्पर ठेवून रोजचे दैनंदिन कामकाज अधिक उत्कृष्टरित्या पार पाडले जातील..आणि efficiency ही वाढेल…
हसत खेळत , आनंदात ..छंद जोपासत जीवन जगा बघा कायम सकारात्मक राहाल…चैतन्य राहील..उत्साही राहाल…कंटाळा उबग येणार नाही …लहान मुलासारखे च सतत काही नवीन. करण्याचा ध्यास लागेल..आयुष्य मुक्तपणे जगणं शिका…आयुष्य भरभरून जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

