Skip to content

पती-पत्निमधील शारीरिक संबंध हे इमोशनल बॉण्डिगवर अवलंबून आहे.

पती-पत्निमधील शारीरिक संबंध हे इमोशनल बॉण्डिगवर अवलंबून आहे.


लालचंद कुंवर

उरुळी कांचन, पुणे.


तारे होंगे सारे बाराती, चांदणी होंगी रात
हांथो मे लेकर तेरा हाथ, हम फेरे लेंगे साथ.

या गीता प्रमाणे नवदांपत्य जेव्हा विवाह बंधनात अडकतात , अडकतात नव्हे … ? खरं तर पदार्पण करतात … ! तेव्हा त्या नात्याला कसल्याच बंधनाच लेबल नसाव . तो एक तनाने अणि मनाने अतुट विश्वासाचा अयुष्यभराचा निकोप आनंद सोहळा अणि अविरत प्रेमाने वाहणारा झरा असावा.

खरचं वैवाहिक जीवन जर स्वादिष्ट, चविष्ट आणि रंगतदार करायचं असेल तर त्यात मस्तपैकी नवरसाची फोडणी ..! थोडा शृंगार रसाचा तडका अधुन मधुन द्यावा लागेल….. ! तरच आयुष्य लज्जतदार … अणि लाजवाब ….! जगणं चमचमीत अणि मनाला घमघमीत वास येइल….. !

नाहीतर तेच तेच रोजचं routine life हे आपलं आयुष्य बेचव , जगणं नीरस अणि वागणं boaring केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगण्यात मनाप्रमाणे मस्तपैकी change असावाच.

कारण असेच नीरस अणि बेचव जगणं झालेले , कंटाळवाणे दिवस काढणारे….. आज असे कितीतरी अतृप्त आत्मे आजूबाजूला भटकताना दिसतात ! किंबहुना कालांतराने खुळ लागून शारीरिक व्याधी किंवा मानसिक विकृती च्या स्वरूपात त्यांना किंमत चुकवावीही लागते.
अशावेळी तुकोबारायांच्या अभंगातील एक ओळ चपखल बसते,

“तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी ! ”

सध्या तरी अशी एकही समस्या नवरा-बायकोच्या नात्यात अस्तित्वात नसते की त्यावर सोल्युशन नाही फक्त समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आणि त्यातून बाहेर पडण्याची मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते.

आज नवरा-बायकोच्या नात्याला आव्हान देणार … ! अणि त्यांच्या भावविश्वाला सुरुंग लावणारी गोष्ट म्हणजे एकमेकांशी असलेले शारीरिक संबंध.

ते कसे आहेत ? ते जर निकोप असतील तर हरियाली ही हरियाली नाहीतर उभ्या आयुष्याचा वणवाच …. !

कारण आज ही भारतात बहुतांशी ठिकाणी, नवरा बायकोंमध्ये शारीरिक संबंधाच्या नावाखाली राजरोसपणे समाजमान्य बलात्कार सुरू आहेत. ना कुठे तक्रार…. ना कुठे वाच्यता…. !

खरं तर पशु , पक्षी , प्राणी आणि मानव यांच्यातील क्रिया ह्या एक सहजपणे घडणाऱ्या नैसर्गिक क्रिया आहेत.

परंतु पशू, पक्षी अणि प्राणी यांच्यातील क्रिया या फक्त प्रजोत्पादनासाठी घडत असतात. पण मानवाच्या बाबतीत मात्र असं नसतं. त्यांच्यात प्रजोत्पादनाबरोबरच एक Emotional Bonding असतं. कारण शरीराचं सुध्दा आपल्या मनाशी एक bonding असतं, ते आयुष्यभर जपलं गेलं पाहिजे.

कारण व्यक्तींच्या बाबतीत bedroom मध्ये जोपर्यंत दोन मन एकरूप होत नाहीत ..! भावनिक अटॅचमेंट जुळून येत नाही … ! तोपर्यंत त्यांच्यात निकोप शारीरिक संबंध निर्माण होऊच शकत नाहीत, आणि हेच युनिव्हर्सल सत्य आहे.

हे सत्य जे नाकारतात , त्यांचं life हे फक्त अणि फक्त यांत्रिकपणे सुरु असतं केवळ process म्हणून अगदी पशु पक्षांप्रमाणे.

म्हणुन आज नवरा बायकोच्या नात्यात Emotional Bonding असणं हि आज काळाची गरज आहे. कारण ह्या शिवाय वैवाहिक जीवनाला बहर , पानं, फुल येऊच शकत नाहीत.

बरं, हे Bonding काय दिवसात निर्माण करता येत नाही ना !

त्यासाठी रोज प्रेमाचं विरजण घालावं लागतं. विश्वासाचं भावविश्व निर्माण करावं लागतं. Ego चा अडसर दुर करुन एकमेकांची मन जपावी लागतात. आणि शेवटी कितीही वादळ आलीत तरी , ‘ दो जिस्म एक जान ‘ या भावनेची मुळ जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. ‘एकमेकांना समजून घेणं’ हे आचार विचारातून जाणवून द्यावं लागतं.

तरच अणि तरच Emotional Bonding निर्माण होऊ शकतं.

अणि एकदा का दोन जीवांची भावनिक attachment घट्ट झाली तर ……… ? पतीपत्नीचा नात्यातील शारिरीक संबंध हे एकजीव अणि
एकमेकांना आत्मिक समाधान आणि संतुष्ट करणारेच ठरतील… !

आणि शेवटी “संतुष्ट अणि व्याधी विरहित शरीरातच
समाधानी अणि आनंदी मन वास्तव्य करत असतं ”

समाप्त



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!