Skip to content

लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते!

लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते!


सोनाली जे.


आठवते ती आपली संस्कृती..पूर्वी पाळण्यात लग्न व्हायची पण आयुष्यभर तोच पार्टनर असायचा..थोडी सुधारणा म्हणून की काय मग मोठ्यांच्या संमतीने , बघण्याच्या कार्यक्रमातून लग्न ठरू लागली होवू लागली..अगदी जोडीदाराने एकमेकांना बघितले नसेल तरी..आणि मुख्य ती लग्न टिकून राहण्याची काही खास कारणे होती.

१. एकत्र कुटुंब पद्धती . सर्वात वयस्क व्यक्ती घरचा कर्ता पुरुष..त्याचे अधिकार किंवा कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याचे प्रयत्न ..मग वेळ प्रसंगी कठोर शिक्षा..तर कधी समजून ..गोड बोलून सर्वांना एका लाकडाच्या मोळी मध्येबांधून कुटुंबाची प्रचंड  ताकद वाढविण्याची कला किंवा ताकद म्हणू.. त्यामुळे निर्णय घेतले जातील तशी जबाबदारी ही पेलत असतं..आर्थिक असेल,मानसिक किंवा आरोग्य किंवा इतर कोणतीही ..
त्यामुळे कुटुंब बांधून ठेवली जात…त्यात एकाने असे वागळे तसे वागले हे कधी होत नसे.

२. वंश परंपरागत व्यवसाय ..त्यामुळे कुटुंबाला व्यवसाय कोणता करावा ..आर्थिक भार कसा पेलावा हे प्रश्न पडत नसत…एक तर एकत्र कुटुंबातले जेवढे होतकरू पुरुष ते व्यवसायात मदत करत..

३. संस्कार आणि समाज यांच्या मर्यादा…उच्च नीच , जातपात भेदभाव हा एवढ्याच करिता होता कारण प्रत्येकाचे संस्कार, विचार , आचार भिन्न, राहणीमान वेगळे..बोली भाषा फरक , खान पान वेगळे , कोणी शुद्ध शाकाहारी तर कोणी पूर्ण मांसाहारी…तर वंश परंपरागत व्यवसाय ही भिन्न, याच फरकामुळे शक्यतो त्या त्या जाती मधील मुलामुलींची लग्न त्या त्या जाती मध्ये होत असतं..

४. विभक्त कुटुंब पद्धती…थोडी सुधारणा पुढे होत गेली शिक्षण , नोकरी या निमित्ताने मुले बाहेर पडू लागली ..मग लग्नानंतर बायको ही सोबत…थोडी मोकळीक मिळू लागली..बाहेर फिरणे..खाणे ..कधी सिनेमा या गोष्टी ..किंवा प्रवास या गोष्टी वाढू लागल्या ..थोडक्यात freedom वाढले..

या सगळ्यामध्ये कायम आठवते ती चिमणराव गुंड्या भावू आणि कावेरी वहिनी.. कावू यांची गोष्ट…लग्नानंतर गुपचूप गजरा घेवून येणे, नाटकाची तिकिटे , गुपचूप मित्र मैत्रिणींना भेटायला जातो असे सांगून बाहेर भेटणे…घरी परत येताना ही वेगवेगळे येणे हे बायको असून मोकळेपणाने नवरा बायको करत नसत…

आता हे झाले खूप पूर्वीचे…नंतर थोड्या सुधारणा होत गेली..पाश्चात्य संस्कृती चा प्रभाव म्हणा, किंवा आपल्या देशातली सुधारणा म्हणा स्त्रिया ही उच्च शिक्षण घेवू लागल्या अगदी परदेशी जावू लागल्या…मग एवढ्या शिक्षणानंतर नोकरी ..स्वातंत्र्य वाढू लागले…विचारसरणी मध्ये फरक पडत गेले…स्वतः ची ठाम मते तयार होत गेली ..आणि मग मुलांना ही सगळ्या गोष्टींचे freedom मिळत गेले..नव्या युगातल्या नव्या शैक्षणिक पद्धती…को.एड.शाळा जसे मुले मुली एकत्र ..त्यातून मैत्री मधील लिंग भेद मागे पडत गेले…आधुनिक तंत्रज्ञानामुळे  विकास होत गेला…खूप अंतर असणारे ही जवळ येत गेले…शिक्षण असेल काम असेल किंवा इतर गोष्टींमुळे त्यांच्यात प्रेम .शारीरिक आकर्षण .लग्न या गोष्टी घडत गेल्या..

पण काही वेळेस असेही जाणवू लागले की लग्नापूर्वी चे दिवस आणि आता त्याच व्यक्ती बरोबर लग्नानंतरचे दिवस यात खूप फरक आहे…छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टीत मतभेद वाढत गेले..जसे की एकमेकांना वेळ च देत नाहीत..मिळत नाही…दोघांचे थोडा वेळ एकत्र असणे आणि कायम एकत्र असताना स्वभाव ..सवयी जुळणे किंवा समजणे त्यात फरक असेल तर चिडचिड , वाद, होवू लागले…दोघेही नोकरी करणारे असतील तर घरचे कोण करणार यातून ही वादावादी ..अर्थात समजून घेवून करणारे ही आहेत …पण बरेचदा सगळ्या गोष्टी बॅलन्स करणे ज्यांना अवघड जाते त्यापैकी वरील काही…तसेच अपेक्षा…मग दमून भागून आल्यावर एक कप गरम चहा असेल किंवा अगदी शारीरिक संबंध ही ..जर वेळच देवू शकत नसतील तर त्यातून घटस्फोटाच प्रमाण वाढू लागले…

यापेक्षा पुढे जावून मुला मुलींना असे वाटू लागले की आपण थोडा वेळ जास्त एकमेकांच्या सहवासात राहून मग आयुष्याचे निर्णय घेतले पाहिजेत …यातून लिव्ह इन रिलेशनशिप ची कॉन्सेप्ट आली…सुरुवातीला च  यात स्पष्ट की पटले तर राहू नाही तर सोडू ..दुसरे बघू…यात त्यांना गैर असे काहीच वाटत नाही…कारण एकमेकांविषयी माहिती होणे..एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणे, एकमेकांची वैचारिक पातळी समजून घेणे, एकमेक आनंदी राहू शकतात का ? का वाद होतात ? किंवा अगदी पुढे जावून एकमेक शारीरिक सुख ..मानसिक सुख देवू शकतात का?? समाधान , शांतता मिळते का ?

शिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक भार कितीपत घेवू शकतात या सगळ्याची ही परीक्षाच म्हणा ना …ती या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये घेतली जाते…उत्तीर्ण झाले तर पुढे जावून लग्नात ही रूपांतर होते ..किंवा लग्नाच्या बंधनात अडकत घर मुले ही जबाबदारी ही स्वीकारायची नसते…दोघांचे mutually decision झाले असतात…त्याप्रमाणे ते एकमेकांना स्पेस देवून एकत्र राहतात..त्यात यांना आनंद ही मिळतो आणि कोणी कोणावर जबरदस्ती नाते नाही लादत…किंवा possessiveness नाही वाढत…माझा अधिकार ..ती माझीच ..तो माझाच हे अहंकार ही जोपासले जात नाहीत…

आता थोडे वेगळे विचार करू जर लिव्ह इन िलेशनशिपमध्ये एकमेकांचे नाहीच जुळले, पटले तर दोघेही नवीन जोडीदार शोधायला मोकळे…कोणी आयुष्यभर मन मारून , adjustment करून एकाच जोडीदारासोबत इच्छेविरुद्ध राहण्याची गरज नाही…
तसेच घरच्यांची बंधने..जसे सून..जावई म्हणून मर्यादा असेच आदर्श वागल पाहिजे तसेच वागल पाहिजे…ऑफिस मध्ये उशीर का  झाला? मित्र मैत्रिणी ना का भेटतात? किंवा इतर अनेक गोष्टी जाब विचारणे जसे आताच्या या फास्ट लाईफ मध्ये बरेचवेळा कामानिमित्त बाहेर राहावे लागते…मित्र मैत्रिणी…ऑफिस मधले सहचारी यांच्या सोबत काम करावे लागते..बाहेर जावे लागते…त्यातून पूर्वीच्या लोकांची विचारसरणी जर मर्यादित असेल तर घरच्यांचे त्रासच होत ..

या गोष्टी आणि स्वतः चे आनंद ..स्पेस ..freedom.. आपल्या शिक्षणाचा योग्य वापर ..नोकरी यात वेळ घालवीत असता केवळ आपल्या जोडीदाराला ही वेळ , आवडी निवडी जपता येत असतील , शारीरिक मानसिक गरजा ही परिपूर्ण होत असतील , एकमेकांना आनंदी आयुष्य देता येत असेल तर लग्नाचे बंधन नको असेच वाटते …त्यात मूल होणे न होणे हे निर्णय ही दोघे एकत्र घेतात…झाले तर ती जबाबदारी…

थोडक्यात आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे जास्त बेस्ट वाटते कारण जबाबदाऱ्या, आनंद ,आपल्या क्षमता , कुवत, आर्थिक असेल शरिरक असेल किंवा शारीरिक सबंध ही असतील, आवडी निवडी , एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी च असते ही आणि त्यात ही नाही जमले तर जोर जबरदस्ती नाही एकत्र राहण्याा ची …स्वतंत्र अस्तित्व आहे…दुसरा पार्टनर शोधू शकता…किंवा आवडला तर तोच हे स्वातंत्र्य..

आता अजून थोडा वेगळा विचार आजकाल समलिंगी व्यक्ती च्या मध्ये आकर्षण वाढत आहे…तसे असेल तर ते समाज ही accept करू लागला आहे… किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकमेकांच्या स्वभावाचे सर्व बाजूने पैलू विचारात घेतले जातात…मग वेळ प्रसंगी थोडी adjustment ही…

आयुष्यात मारून मुटकून जगण्यापेक्षा मुक्तपणे ,, आनंदाने जगण्याची आवड या पिढीला आहे … कारणे ही अशीच काही आहेत की IT sarkhe field खूखूप मानसिक ताण देणारे ही आहे…किंवा जॉब ची insecurity, आयुष्याची insecurity , वाढती महागाई यात पूर्वी एकट्याची जबाबदारी असे की काही झाले तरी पुरुषांनीच सगळे बघितले पाहिजे मग कितीही ताण पडो त्यांचं त्यांनी बघायचे…या उलट दोघेही कमावते असतील थोडा भार स्त्री उचलू शकते ते mutually ठरवू शकतात ..

किंवा काहीना पूर्ण जबाबदारी झेपत नाही…अगदी मुलींना स्वैपाक ..घरचे..नोकरी करणे नाही जमत सगळे..काही शारीरिक दृष्ट्या मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत असमर्थ ही असू शकतील पण हे एकमेकांपासून लपवून ठेवत नाहीत ..त्यामुळे पुढच्या समस्या वाचतात.त्याचमुळे लिव्ह इन रिलेशनशिप असे पर्याय जास्त भावतात…पसंती तिकडे असते.

लग्न करून ज्या गोष्टी मिळवितात त्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त आणि आनंद, सुख ,वैचारिक  स्वातंत्र्य ,वागण्यातला स्वातंत्र्य ,  योग्य जोडीदार, समजूतदारपणा असे परिपूर्ण जगणे या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मिळते तर मग लग्नपेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप च बेस्ट वाटते.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “लग्नापेक्षा आम्हांला तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ बेस्ट वाटते!”

  1. आपली ही पोस्ट वाचून खूप वाईट वाटले
    समाज चुकत असेल तर तुम्ही या गोष्टी चुकीच्या आहेत हे संगीतल्या पाहिजे आजकालची पिढी (व्यभिचारी) बनत आहे आणि तुम्ही या गोष्टीला खतपाणी घालून याचा प्रसार करताय! आपण या गोष्टीला विरोध केला पाहिजे हे सोडुन आपण लाग्नापेक्षा “लिव्ह इन रिलेशनशिप”
    बेस्ट वाटतो अशे लेख लिहिला…!
    👎👎👎👎👎👎👎👎👎

  2. NUTAN BHIKAJI MAHADIK

    तुमचे आजकालचे लेख वाचून मनात खूप नकारात्मक भावना तयार होतात. मला वाटते लेखकाने त्याचे विचार बदलावे. हा प्लॅटफॉर्म लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी आहे ना की लोकांचे आयुष्य बरबाद करण्यासाठी आहे. तुमच्या मनाला स्वैर वाटणारे विचार तुम्ही लोकांना सांगता असा होत आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!