Skip to content

चला तर आज आनंदी आयुष्य जगण्याचं Planning करूयात..

चला तर आज आनंदी आयुष्य जगण्याचं Planning करूयात..


सौ. मिनल वरपे


तुम्ही कधीतरी स्वतःसाठी वेळापत्रक बनवलं असेलच ना.. इतरवेळेस माहीत नाही कारण एकदा का आपलं शिक्षण पूर्ण झालं की आपलं सुद्धा एक वेळापत्रक असावं याला आपण अजिबात महत्त्व नाही देत.. पण शिक्षण घेताना तर कधी ना कधी नक्कीच बनवलं असेलच ना…

वेळापत्रक कशासाठी असते तर आपल्याला मिळालेल्या वेळेचं इतकं चांगल नियोजन करावं ज्यामुळे आपली प्रगती तर होतेच पण आपल्याला पद्धतशीर राहण्याची सवय लागते.. आपला वेळ कुठे वाया जाणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतो…

अगदी तसच जर आपण आपल्या आयुष्याचं वेळापत्रक बनवलं तर… गंमत आहे की नाय.. आपण वेळापत्रक मधे काय ठरवतो तर कधी उठायचं, उठल्यावर फ्रेश व्हायला किती वेळ द्यायचा, व्यायाम,नंतर नाश्ता, शाळा असेल तर मधला शाळेचा वेळ, त्यानंतर घरी आल्यावर किती वेळ खेळायला द्यायचा.. नंतर पुन्हा अभ्यास त्यामधे सुद्धा कोणत्या विषयाला किती वेळ, कोणत्या वारी कोणता विषय, नंतर जेवण आणि आपली झोप..

आणि या वेळापत्रकामुळे होते काय तर आपल्याला त्या त्या गोष्टी अगदी वेळेत पूर्ण करण्याची सवय लागते आणि परीक्षा आल्यावर कोणतीच भिती न वाटता आपण नेहमीच तयार असतो.. आपल्याला कायमच वेळेचं महत्व कळते आणि त्यानुसार आपण कशाला किती महत्व द्यायचं हे सुद्धा कळते..

आपल्या आयुष्याच्या वेळापत्रकामधे सुद्धा आपल्याला हेच तर करायचं आहे.. आपला वेळ manage करायचा आहे.. आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं आहे.. आपला वेळ वाया कुठे जातोय ते शोधून त्या वेळेचं सुद्धा योग्य ते नियोजन करायचं आहे.. आणि मग बघा आपल्याला प्रत्येक क्षण उत्साही वाटेल…

सकाळी किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायच हे जरी ठरलेलं नसल तरी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर कोणते विचार आपल्या मनात आले पाहिजेत हे आपलं आपणच ठरवल पाहिजे..जर सकाळी उठल्यावर आपले विचार उत्साही असतील तर दिवसभर आपण कितीही अडथळे आले तरी माघार न घेता पुढे जाणार…

आपल्या आजूबाजूला असे व्यक्ती नक्कीच भेटतील ज्यांना तुमची प्रगती बघवणार नाही.. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतील.. तुम्हाला त्रास सुद्धा देतील पण जस आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक आल्यावर जर उद्या मराठीचा पेपर असेल तर अभ्यास सुद्धा मराठीचाच करायचा असतो, त्यावेळी आपण दुसरा कोणता विषय हातात घेत नाही .पहिलं महत्त्व ज्या विषयाचा पेपर त्यालाच देणार.. अगदी तसच कोणी कितीही त्रास दिला तरी मला माझं लक्ष कुठे केंद्रित करायचं आहे हे आपल्याला कळायला हवं.. कारण आपण आपल
ध्येय सोडून भलतीकडे लक्ष दिलं तर आपण भरकटणार..

आपण करतो काय तर आपला अर्धा वेळ नको असलेल्या गोष्टींचा विचार करण्यातच घालवतो.. लोक काय म्हणतील, मला हे जमेल का, आजपर्यंत मला आलेलं अपयश, आपली दुःख, आपल्या अडचणी यांचा विचार आपण इतका करतो की आज आपण काय करू शकतो याकडे आपण दुर्लक्ष करतो कारण आपल्याला नकोत्या गोष्टींचा विचार केल्यामुळे आपल्यातील नकारात्मकता वाढते आणि आपण चुकीच्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवतो..

पण तेच विचार करण्यापेक्षा आज,आता मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित केलं तर मला जास्तीत जास्त मार्ग सापडतील आणि माझा स्वतःवरचा विश्वास वाढत जाईल.. अति विचार करायचं सोडायच आता आणि फक्त प्रयत्न कधीच थांबवायचे नाही..

आपला आनंद, आपलं सुख, आपलं समाधान हे कशात आहे हे आपल्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नसणार म्हणून कोणी मला आनंद देईल, सुख समाधान देईल अशी इतरांकडून अपेक्षा करून दुःखी होण सोडून द्यायचं.. आता मला माझं सुख मिळवायचं आहे हा विचार करून सतत सकारात्मक राहून ज्यामधे मला आनंद सुख समाधान मिळेल ते करायचं आहे.

आपला वेळ कुठे द्यायचा हे आपल्याला कळायला हवं.. निरर्थक अपेक्षा, चिंता, कोणाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलून वेळ वाया घालवणे, कृती करायची सोडून विचार करत बसणे या सगळ्यात मी माझ्या आयुष्याचा किती वेळ वाया घालवला असेल आणि आजही तेच करत आहे तर मला यापुढे अस न वागता प्रत्येक क्षण जास्तीत जास्त सार्थकी लावायचा आहे..हे आपण ठरवलं पाहिजे.

खर तर आयुष्य म्हणजे काय असते वो.. आयुष्य कोणाचं किती असेल हे कोणाला माहिती सुद्धा नाही पण आता माझ्यासमोर असलेला प्रत्येक क्षण माझं आयुष्य आहे.. आणि मग मला या प्रत्येक क्षणात जगायचं आहे.. मिळालेला क्षण उगाच वाया न घालवता त्याचा आनंद लुटायचा आहे.. प्रत्येक क्षणात समाधान शोधायचं आहे.. अहो दुःखी कोण नाही या जगात, पण मला मात्र माझ्या प्रत्येक क्षणात सुखी रहायचं आहे कारण मी माझ्या प्रत्येक क्षणाच अस नियोजन करणार ज्यामधे तो क्षण न रागवता हसत हसत माझ्या आयुष्यातून निघून जाईल ..

माझ्या प्रत्येक क्षणात मला कशाला महत्त्व द्यायचं आहे.. किती महत्त्व द्यायचं आहे.. हे ठरवून मी माझं आयुष्य जास्तीत जास्त सुंदर बनवणार.. उद्याच माहीत नाही पण मी माझं आजच, आताच आयुष्य उत्साहाने जगू शकेल.

हे जर आपण केलं तर नक्कीच आयुष्याचं खूप परफेक्ट नियोजन होणार..

आपण करतो काय तर यश अपयश याला घाबरतो.. पण जर योग्य नियोजन असेल तर मनाची तयारी असते.. कारण जरी मला अपयश आलं तरी ते कशामुळे आलं हे मी शोधणार आणि यापुढे ती गोष्ट न करता अजून जास्त वेळ माझ्या प्रयत्नांना देईल..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!