पुढच्या महिन्यात तिची तारीख चुकली..तिला दिवस गेले.
सौ. शमिका विवेक पाटील
ते वयच तसं असतं, वाहत जाण्याचं…अशा वेळी सावरलं नाही तर आयुष्यभरासाठी एक आठवण म्हणून लक्षात राहते…ना विसरता येत ना त्यातून बाहेर येता येत…
रोहन आणि प्रिया ग्रॅज्युएशनच्या लास्ट year ला होते. दोघांच एकमेकांवर खुप प्रेम होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर जोपर्यंत चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आणि दोघेही well settled होत नाही तोपर्यंत घरी आपले प्रेम प्रकरण सांगायचे नाही असे ठरले होते. दोघांमध्ये कमालीची understanding होती… रोहन जास्त matured होता.. प्रिया अजूनही अल्लडच होती.
कॉलेज घरापासून लांब होत म्हणजे रेल्वे ने प्रवास करावा लागायचा…आधी रोहनचे स्टेशन यायचे आणि नंतर प्रियाचे ..पण रोहन नेहमी प्रिया बरोबर उतरून रिटर्न यायचा.. तेवढाच तिच्यासोबत त्याला वेळ घालवायला मिळतं असे… पावसाळ्याचे दिवस होते, extra लेक्चर असल्यामुळे उशीर होणारं हे दोघांनीही घरी सांगितले होते… अभ्यासात दोघेही हुशार…अगदी मन लावून शेवटच्या वर्षाची तयारी सुरू होती…नोट्स पूर्ण करे पर्यंत संध्याकाळ झाली… पावसाचा वेग वाढला आणि वादळ वारा सुरू झाला… घाईघाईने दोघे रेल्वस्थानकाजवळ आले आणि पाहिलं तर तिथे पूर्ण पाणी साचलेलं… ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या… प्रियाला भर पावसात रडू कोसळले.. रोहनने तिला आधार देत म्हटले माझी मावस बहिण इथे जवळच राहते, पाऊस ओसरेपर्यंत आपण तिच्याकडे थांबू… घाबरु नकोस ती खुप चांगली आहे… प्रियाने मान हलवली आणि घरी फोन करुन सर्व विश्वासाने सांगितले…
काही अंतरावर एका बिल्डिंग मध्ये रोहन प्रियाला घेऊन गेला… त्याने दरवाज्याची बेल वाजवली… पण कोणी दरवाजा उघडेना…. त्याने बहिणीला फोन केला… ताई कुठे आहेस ? मी आणि माझी मैत्रीण घरी आलोय दार उघड पटकन, त्याने सर्व हकीकत सांगितली… अरे, रोहन मी कालच आईकडे आलेय… रूमची एक्स्ट्रा चावी मी बाजूला जोशी काकांकडे ठेवते तु फोन दे त्यांना मी सांगते तुला चावी द्यायला… रीतसर चावी घेऊन रोहन आणि प्रिया घरात आले…
दोघेही पावसाने चिंब भिजलेले… प्रिया थोडी उदास दिसली… रोहनने प्रियाच्या डोक्यावर हलकेसा फटका मारुन अंग पुसायला सांगितले… मी पटकन चहा ठेवतो आपल्या दोघांना तो पर्यंत तु फ्रेश हो असे बोलून तो किचन मध्ये निघून गेला… प्रिया फ्रेश होऊन येई पर्यंत रोहन ने मस्त चहा आणि बिस्किटं पुढ्यात सरकवली… तिला थोडंसं हायस वाटलं… दोघांच्या गप्पा रंगल्या … प्रियाला मगाशी एकटेपणाचे जे टेन्शन आले होते ते रोहन ने गप्पांच्या ओघात दूर केले…
बाहेर जोराचा पाऊस, ढगांचा गडगडाट सुरु असताना अचानक लाईट गेली… प्रिया घाबरुन जोरात ओरडली आणि रोहनला जाऊन घट्ट मिठी मारली… अरे, ” वेडा बाई कशाला घाबरते मी आहे ना ” असे बोलून तिला धीर देत होता… अशा परिस्थितीत तारुण्याच्या वळणावर दोघांचा तोल जाणे स्वाभाविक होते…भविष्यात आपलं लग्न होणारं ह्या आशेवर प्रिया आपलं सर्व काही रोहनला देऊन बसली. आपल्यात जे काही झालं त्याची guilt न बाळगता दोघेही एकमेकांच्या अजून जवळ आले…
आणि पुढल्या महिन्यात प्रियाची तारीख चुकली… जे नव्हतं व्हायला पाहिजे ते होऊन बसलं.. प्रियाला दिवस गेले… रोहनला जेव्हा तीने ही बातमी सांगितली तेव्हा त्याला धक्का बसला आणि क्षणाचा विचार न करता गर्भपात करण्याचा निर्णय प्रियावर थोपवला… त्याने तीची नीट समजूत काढली. हे बघ प्रिया, आपल्याला अजून करिअर करायचं आहे.. ह्यात अडकून चालणारं नाही… मुलं, संसार हे सर्व करायचं आहेच नंतर पण आधी करिअर… तिला त्याचे बोलणे पटले आणि सर्वांच्या नकळत तीने गर्भपात केला… वय लहान असल्यामुळे खुप त्रास झाला, पण कोणाला सांगणार हे म्हणून सर्व गपगुमान सहन करावं लागलं…
एक दिवस अचानक रोहनचा फोन येतो. प्रिया मला अर्जंट भेट… माझ्या पप्पांची बदली दिल्लीला होतेय, आम्ही सगळे तिथे शिफ्ट होणारं नेक्स्ट वीक…परत आपलं भेटणं कधी होईल काय माहित ? पण, ur my best part of Life…I will miss u..n Love u forever… अरे, पण आपण तर लग्न करणारं होतो ना ? आता ते शक्य नाही… माझं शिक्षण पूर्ण झाले की बाबा मला बाहेरगावी पाठवणार आहेत पुढील शिक्षणासाठी… पुढे काय ते प्रिया समजून गेली .. आणि भरल्या डोळ्यांनी ती परत फिरली… एक कडू आठवण कायमची सोबत घेऊन…
ते वयच तसं असतं… सावरायचं असतं… कितीही मोहाचा क्षण असला तरी त्याला भुलायचं नसतं… आजची तरुण पिढी खूपच फॉरवर्ड आहे…प्रेम म्हणजे हा सगळा प्रकार आलाच पाहिजे असे त्याचे मत असते…पण प्रेम किती पवित्र असू शकते हे त्यांना नीट समजावून सांगायला हवे… नाहीतर प्रिया सारख्या कितीतरी मुली आज एकट्या पडलेल्या दिसतील…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!