तो फक्त रात्रीच मला भेटायला का यायचा ? हे मला गवसलं!!
सौ. शमिका विवेक पाटील
मला तुमच्या सोबत रात्र घालवायची आहे. मला माहित आहे तुम्ही इथे नवीन आलात, कोणाला ओळखत नाही पण मला १,२ तास नकोत तर पूर्ण रात्र हवीय तुमची. मी सांगेन त्या रात्री तुम्ही मला वेळ द्यायचा. तुम्ही सांगाल त्या रकमेच्या दुप्पट दाम तुम्हाला देईन, फक्त मला ‘ हो ‘ बोला. कामानिमित्त शहरात आलेली रुबिना आश्चर्यचकित होते, वेड बीड लागलंय का sir तुम्हाला, माझं काम खुप professional आहे, मी हे असले काही नाही करत.
मी छोट्या पडद्यावर सीरियल मध्ये रोल करणारी हिरोईन आहे. कधी कधी नाईट शूट पण असते. नको ते रोल मी करत नाही. माफ करा, तुम्ही मला चुकीचं समजताय, एक रात्र घालवून बघा, सगळी शंका दूर होईल. गैर काही करणार नाही ह्याची मी हमी देतो. ठीक आहे, माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, उद्या माझा पर्सनल असिस्टंट येईल सो तुम्ही त्याच्याकडे तारीख फिक्स करा. मग बघू नंतरचे. नाही रुबिनाजी, तुम्हाला समजत नाहीय, फक्त रात्रीचा सवाल आहे. खुप विनवण्या करून रूबिना तयार होते.
रात्रीचे १० वाजतात तशी दरवाज्याची बेल वाजते, रूबिना थोडं टेन्शन मध्येच येते, तिला काहीच कल्पना नसते की नक्की ह्याने रात्री साठी का मला तयार केले ? ह्याची मनस्थिती विकृत तर नसेल ना ? नको त्या प्रकारे माझा वापर तर नाही ना करणारं ? किंवा व्हिडिओ क्लिप सारखे प्रकार तर नसतील ना करायचे ह्याला ? ह्या विचारात ती दरवाजा उघडते, या ना, वेलकम mr. दिलीपजी. तो मिश्किल हसतो, काय मग सगळे आवरले ना ? रूबिना, फक्त hmm बोलते आणि बसायला सांगते.
तो राहुद्या म्हणतो आणि तुमची बेडरुम कुठे आहे ? आपण डायरेक्ट तिथेच जाऊ. त्याचे हे बोलणे ऐकून रुबिनाच्या काळजाचा ठोका चुकतो, ती थरथरत्या आवाजात या ना इथे आत मध्ये आहे असे बोलून त्याला बेडरूम मध्ये घेऊन जाते. सकाळी रुबिनाला जाग येते तेव्हा तिच्या उशाला नोटा ठेवलेल्या असतात. त्या नोटांना बघून तिला खूप नवल वाटतं. कमाल आहे बुआ ह्याची. असे बोलून ती दिवसाला सुरूवात करते.
दोन दिवस गेल्यानंतर दिलीप पुन्हा रूबिनाला फोन करून रात्रीची अपॉइंटमेंट फिक्स करतो. आदल्या रात्री घडलेल्या प्रकारावरून ती थोडी बावचळतच होकार देते. रात्री १० वाजता दिलीप तिच्याकडे जास्त काही न बोलता डायरेक्ट बेडरुम मध्ये जातो. रुबिना त्याच्या बरोबरच पाठी पाठी आत जाते आणि बेडरुमचे दार लावते. सकाळी जाग आल्यावर पुन्हा तेच बघते, उशीच्या बाजूला नोटा ठेवलेल्या असतात. तब्बल दोन वेळा हा प्रकार झाला म्हणून तिला आता अस्वस्थ वाटू लागते. पण, जाऊदेत पैसे मिळतात ना, आपल्याला, बाकी काय करायचं ? म्हणून ती दुर्लक्ष करते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिलीप फोन करून रात्रीची अपॉइंटमेंट घेतो. ह्या वेळेला ती निश्चिंत होऊन होकार कळवते. रात्र होताच दिलीपला घेऊन ती बेडरूमकडे वळते. सकाळी उशाशी नोटांच बंडल बघून ती अजून खुश होते व पुन्हा कधी दिलीपजी येथील ह्याची वाट पाहू लागते. कदाचित तिला त्याच्यासोबत जास्त कंफर्टेबल वाटतं असेल. पण ह्या वेळेला २ आठवडे झाले तरी त्याचा फोन येतं नाही, पर्यायी तिच फोन लावून विचारते, काय झालं दिलीपजी ? आलात नाही बरेच रात्री, कोणी दुसरी भेटली का ? की कंटाळा आला माझा ? छे हो, रूबिनाजी तुम्ही गैरसमज करून घेताय, मी out of station आहे, दोन दिवसांनी येईन परत तेव्हा भेटू रात्री.. ठीक आहे तर, मी परवाची अपॉइंटमेंट करते फिक्स.
दोन दिवसानंतर दिलीपजी येतात तेव्हा हातात बॅग असते, रूबिनाला वाटते की काहीतरी गिफ्ट आणले असणारं, पण त्यात फक्त काही कागद पत्र असतात. दुसऱ्या दिवशी सेम तोच प्रकार… तिला आता खात्री पटते की हा माणूस पुरता वेडा आहे, ह्याच्या नादी लागले तर मला पण वेडे करील त्यापेक्षा आजच काय ते सोक्ष मोक्ष लावते. जेव्हा दिलीप फोन करून रात्रीच्या अपॉइंटमेंट बद्दल विचारतो त्याच क्षणी रुबिना आवाज चढवून सर्व हकीकत विचारते. तुम्ही मला असे का वागवता ? मला आज सत्य समजेलच पाहिजे. ठीक आहे, बोलून रात्री भेटायचे ठरते.
दरवाज्याची बेल वाजताचं दबक्या पावलांनी रुबिना दार उघडते. घाम पुसत काही न बोलता दिलीप डायरेक्ट बेडरूम मध्ये जातो. ती काही बोलायच्या आत हा तिच्या हातात एक फोटो देतो. ती फोटो बघून अचंबित होते, आणि प्रश्नार्थक नजरेने त्या फोटो कडे एकटक बघत बसते. दिलीपजी ही तर मी आहे. पण मी कधी अशा रंगाची साडी घातली नव्हती. नक्की काय प्रकार आहे हा ? प्लीज मला सांगा. ती खुप घाई गडबडीत त्याला प्रश्न विचारु लागते. माझी बायको आहे ती. तुम्ही नाही रुबिनाजी, तुम्ही फक्त तिचा चेहरा घेतलायं… बायको, हे उत्तर ऐकून रूबिनाच्या हातातला फोटो खाली पडतो. फोटो उचलत दिलीप सारी हकीकत सांगायला सुरूवात करतो.
आमच्या लग्नाला ७ वर्ष झाली होती. मेघा आणि मी, मेघा म्हणजे माझी बायको, आम्ही दोघे एकमेकांवर खुप प्रेम करत होतो. तिला मूल होऊ शकत नाही हे सत्य मी तिच्याकडून लपवून ठेवलं होतं. तिला मी दुःखात कधीच बघू शकत नाही इतके प्रेम आहे माझं तिच्यावर. पण कदाचित काळाला ते प्रेम मंजूर नव्हते आणि म्हणून मेघाला माझ्यापासून दूर नेले.
६ महिन्यापूर्वी प्रवास करताना तिचा अपघात झाला आणि ती मला सोडून गेली. दूर अगदी खुप दूर. तिच्यावरचं प्रेम तीळ मात्र सुध्दा कमी नाही झालं. मी अजूनही खुप प्रेम करतो तिच्यावर, ज्या दिवशी तुम्हाला पाहिलं आणि मला माझ्यावरंच विश्वास बसेना.. इतके हुबेहूब साम्य कसे काय असू शकते ? जेव्हा समजलं तुम्ही काय काम करता तेव्हा मला माझा मार्ग मोकळा झाला. निदान माझ्या मेघाला मी तुमच्यात बघू शकतो. तिला अनुभवू शकतो.
लग्न झालं त्या दिवसापासून ते मेघा सोडून जाईपर्यंत मी रोज सकाळी उठायच्या आधी तिचा चेहरा बघायचो आणि नंतरच माझ्या दिवसाची सुरूवात करायचो. पूर्ण रात्र मी तिचं रूप न्याहाळत बसायचो. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती खूप तेजस्वी दिसायची. मेघाचे रूप मला तुमच्यात बघायचं होतं म्हणून फक्त रात्रीसाठी तुमची अपॉइंटमेंट घ्यायचो. तुम्हाला आज वर मी स्पर्श सुध्दा केला नाही कारण मी फक्त मेघाचा आहे.
मेघा सोडून गेल्यापासून एक रात्र सुध्दा झोपलो नाही, मला सकाळी उठल्यावर मेघा दिसणारं नाही ही भिती मनात असायची पण इथे तुम्हाला बघत झोप लागायची, पहाट होताच तुमचा चेहरा बघून मी जात असे. रोज रोज येणं योग्य नाही म्हणून कधीतरी निवांत झोपेसाठी मी तुमच्याकडे यायचो. कदाचित तुम्हाला मी वेडा वाटेन पण हे माझं प्रेम आहे. माफ करा जर तुम्हाला माझा कधी त्रास झाला असेल तर, तरीही तुमच्याकडे तुमची रात्र मागतो, माझ्या मेघासाठी…. द्याल ना उद्याची अपॉइंटमेट ?
पुरुषाचं मनं कोणालाच ओळखता येत नाही. त्याचा प्रेम करण्याचा अंदाजच वेगळा असतो. त्याला स्त्री मनापासून हवी असते. तिचं नुसतं शरीर नको.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
अतिशय सुरेख आणि निरागस खऱ्या प्रेमाची अशी कथा आहे ही, आज काल असे प्रेम करणारा जीवनसाथी मिळणे केवळ दुरापास्त च आहे, खुपच आवडली मला हा लेख👌🙏
खुप छान प्रेम कथा आहे
निरागस निरविकार लेखन,
प्रेम हे मुळःता भावनेला आधारून असतं ते कायम निर्मळ भावनेने जपले पाहिले.
खुप छान, सुंदर लेख आहे, शमिका मैडम. 9881376151