लग्न न होण्याची मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया..
सोनाली जे.
भारतीय संस्कृतीत लग्न हे एक सामाजिक बंधन आणि संस्कार मानला गेला आहे. पूर्वीच्या काळी तर अगदी पाळण्यात वगैरे लग्न होत…हळूहळू कायदा झाला आणि कायद्याने १८ आणि २१ वर्ष पूर्ण असतील तर तो विवाह कायदेशीर असतो..
आता पूर्वीसारखे बंधनकारक राहिले नाही की घरच्यांच्या पसंतीनेच मुलीचे लग्न होत असे..आता मुलीचे मत ही विचारात घेतले जाते..
आजकाल मुली मुलांच्या पेक्षा जास्त शिक्षित आणि अगदी सांगायचे तर नोकरी करणाऱ्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या तर आहेतच पण व्यवस्थित बँक बॅलन्स, घरे आहेत त्यांच्या नावावर.. आणि त्याही पुढे जावून स्वातंत्र्य आहे त्यांना ..नसेल तरी ही त्या आता कोणत्या गोष्टींचे विचार करत नाहीत ..त्या बऱ्याच बिनधास्त झाल्या आहेत. त्यांची adjust करून घेण्याची मानसिकता बदलत चालली आहे.
नोकरी करून घरचे स्वैपाक पाणी कोण सांभाळणार ?? घरच्या जबाबदाऱ्या कोण घेणार?? आई वडिलांकडे निदान ते समजून घेणारे तरी असतात..इथे दुसऱ्या घरी ते ही एकवेळ एकटा नवरा असेल तर कसे बसे चालेल पण सासू सासरे, दिर .. जावु ..नणंदा हे सगळे कसे असतील आणि त्यांचे सगळ्यांचे का करायचे ?? ही मनोवृत्ती वाढत चालली आहे…नवरा ही आपल्या पेक्षा जास्त कमावता पाहिजे…घर स्वतचं पाहिजे..घरात सगळ्या सुख सोयी पाहिजेतच शिवाय स्वातंत्र्य ही पाहिजे…
असे सगळेच जमणारे नसेल तर त्यांची लग्न करण्याची मानसिकताच तयार होत नाही..मुलांचे ही काही प्रमाणात असेच आहे…कमी शिकली असतील तर त्यांच्या पेक्षा जास्त शिक्षण असलेल्या मुली किंवा त्यांच्या पेक्षा मोठ्या हुद्द्यावर असलेल्या मुली शक्यतो नाकारतात कारण नाकापेक्षा मोती जड नको..आपण त्यांच्यापेक्षा कमी पडू कायमच नमते घ्यावे लागेल असे विचार येतात..आणि आजकाल कमी शिक्षण असलेल्या मुली नकोच असतात त्यांना कारण त्यांचे स्टेटस..त्यांच्या सारख्याच मॉडर्न असाव्यात ..बुरसटलेल्या किंवा अगदी मागास ही नकोत…
एक घडलेली घटनाच म्हणा ना…सध्या IT field एकदम टॉप ला आहे..भरभक्कम पगार..आठवड्यातून शनिवार रविवार हक्कचे असतातच सुट्टीचे पण इतर वेळेला ही प्रोजेक्ट नसेल..कॉल नसतील तर ही मंडळी hurreyo करून एन्जॉय करायला मोकळी…आता यांची enjoyment म्हणजे बरेचदा multiplex मध्ये बसून सिनेमे बघणे, mall मध्ये मस्त शॉपिंग, बाहेर हॉटेल मध्ये बसून खाणे आणि सोबत पिणे ही..का तर रिलॅक्स होते…अर्थात जसा पगार भरभक्कम तसे काम ही जबाबदारीचे आणि डोक्याचे ..त्यामुळे त्यांना त्यांच्या कामातून रिलॅक्स होणे गरजेचे असते..
थोडक्यात काय तर या सगळ्या वातावरणाला साजेशी बायकोचं त्यांना आवडणारी…पण तशी नाही मिळाली किंवा तशी सापडली नाही तर ते लग्न करायचा विचार करतच नाहीत…त्यापेक्षा त्यांच्याच सारख्या त्यांच्या कंपनी मधल्या किंवा इतर ओळखीतल्या मुलींच्या बरोबर वेळ घालविणे पसंत करतात…आणि त्यांच्या मध्ये जरी मैत्री पेक्षा पुढे जावून relations झाले तरी या लोकांना चुकीचे असे काही वाटत नाही…
त्यामुळे आज हिच्या बरोबर पटले, उद्या नाही पटले तर दुसरी…तसेच मुलींचे ही आहे हुं…त्यामुळे लग्न करून एकच व्यक्ती आयुष्यभर सोबत म्हणून असावी यापेक्षा काही तरी change असावा म्हणून लग्न करण्याची मानसिकता राहतच नाही..
आज काल एव्हढे स्वातंत्र्य ही आहे ..मुले काय मुली काय सर्वानाच.. आणि त्यात Co – education मुळे मुले आणि मुली एकत्रच शिक्षण घेत असतात..लहान वयात एकमेकांचे आकर्षण , मैत्री त्यातून काही गोष्टी पुढे जातात.काही त्या सगळ्यातून अलिप्त राहतात.. काहीचे प्रेम यशस्वी होते त्यांचे लग्नात रूपांतर होते ही ..पण काही जणांचे प्रेमभंग होतात ते त्यातून बाहेर पडू शकतं नाहीत आणि लग्न या संकल्पने पासून दूरच राहतात..प्रेम ..लग्न किंवा या गोष्टींविषयी कायमची negativity येते..
तर काही मुले मुली सौंदर्य दृष्ट्या विचार करत असतात…त्यांच्या मनात आपली बायको अशी असावी ..तशी असावी अशा संकल्पना असतात..
ही घडलेली घटना आहे…मी नावा निशी देते…आकाशवाणी सारख्या नामांकित सरकारी ऑफिस मध्ये कामाला असणाऱ्या रियाझ शेख यांना तेव्हा त्याकाळी पूनम धिल्लां आवडायची आणि अशीच बायको पाहिजे म्हणूनच हट्टाला पेटले होते…
त्यामुळे आपल्या मना सारखी , दिसायला जशी हवी तशी नाही मिळाली किंवा मिळाला नाही तरी पुढे लग्न करण्याची मानसिकता उरत नाही..
आता याविरुद्ध काही जण शिक्षण पूर्ण करतात…मग नोकरी त्यात ही अनेकवेळा बदल…पण त्यांचे ठरलेले टार्गेट त्यांना पूर्ण करायचे असते ..घर .गाडी …त्यांचे गोल पूर्ण करायचे असते ..सेटल व्हायचे असते आधी ..यात कधी लग्नाचे वय निघून जाते हेच समजत नाही.
त्यानंतर मग त्यांच्या बरोबरची किंवा थोडी मागे पुढची मुले मुली लग्नाकरिता मिळत नाहीत…बर सध्या जास्त वर्षाचे अंतर ही मुला मुलींना खपत नाही ..त्यामुळे जोडीदार मिळणे आणि शोधणे ही कठीण..मग काय ..इतकी वर्ष कुठे काय अडले नाही झाले लग्न तर राहू देत नको..अशी मानसिकता बनत जाते..
अशीच एक ओळखीतली मुलगी …चांगली शिकलेली…हुशार.. सर्वगणसंपन्न ..नाटक .अभिनय यात ही पुढे… चांगली नोकरी असलेली.. भटकंती ची आवड..देश परदेशी कधी एकटी तर कधी मैत्रीण ..मित्र ..नातेवाईक यांच्या सह भरपूर फिरणारी ..फोटो ग्राफीची आवड.तीच्याकरिता आई वडिलांनी शेकडो स्थळे बघितली तरी तिच्या सारखा मनमोकळा …तिच्या सारख्या आवडी निवडी असलेला…किंवा जपेल असे वाटणारा कोणी मिळाला नाही…सापडला नाही म्हणून तिने लग्न न करता एकटीच आयुष्य एन्जॉय करायचं असाच निर्णय घेतला…
कारण इतकी स्थळे बघून नकार देवून पुढे मनात आले तरी adjustment म्हणुन होकार देणे ही मनाला पटेना कारण प्रत्येकवेळी हाच विचार येत असे की अरे मग त्या स्थळाला नकार कशाला दिला?? या पेक्षा ते आधी आपण नकार दिलेले बरेच चांगले होते ..त्यामुळे चलबिचल मनस्थिती मध्ये मागचे विसरून आताचे स्वीकार करण्याची मानसिकता ही राहिली नाही..
एखादे खरेच कुरूप असतात दिसायला .किंवा काळे .. नकटे.. जाडजूड असे असतात त्यामुळे बरेचवेळा त्यांच्या या शारीरिक मर्यादा किंवा कमी पणामुळे नकार मिळतो आणि व्यक्ती म्हणून गुणी असूनही लग्नाच्या बाजारात नापास होतात त्यामुळे परत परत तीच गोष्ट घडत गेली की आपसूकच मन यातून निराश होते…आणि लग्नाची मानसिकता राहत नाही.
कारण आज एखाद्या वेळेस कोणी हो म्हणले पण उद्या परत कशावरून आपल्या रुपावर आले आणि ते लग्न टिकले नाही तर याही गोष्टींचे विचार करणारे आहेत ..किंवा याउलट अती सौंदर्याचा गर्व असणारे ही आहेत त्यामुळे ही ते कोणाला हो म्हणत नाहीत..
यापुढे जावून आज कालची सोशल मीडिया भोवती फिरणारी पिढी , you tube, तसेच इतर अनेक ॲप मधून अश्लीलता वाढविणारी …त्यातून मग रेप..जबरदस्ती अशा गोष्टी ही घडत असतात..मग कॉलेज ..ऑफिस मध्ये ही काही वेळेस आपली गरज भागविण्यासाठी कोणत्याही थराला जातात…
मुले काय मुली काय किंवा पुढची पिढी…अगदी वयस्क म्हणले तरी चालेल…त्यातून अत्याचार झालेली व्यक्ती लग्नाचा विचार करताना आपल्या आधीच्या या गोष्टी विषयी कोणाला काही समजेल या भीतीने ही लग्न करता नाहीत..
तर काही वेळेस ऑफिस मध्ये टिकून राहण्याकरिता ही आपले सर्वस्व द्यावे लागते..आणि काही वेळेला समोरची व्यक्ती कायम ब्लॅक मेल करत असते आणि वापरून घेत असते आणि ही गोष्ट घरच्या पासून लपवून ठेवली जाते तेव्हा लग्न न करण्याचा निर्णय बहुतांश घेतला जातो…
तसे आता बाहेर पडलो तर secure आहे पण आणि नाही पण त्यामुळे जेव्हा अशी काही अचानक घटना घडते की मुली असतील मुले त्याच्यावर शारीरिक अत्याचार झाले तर त्याचा परिणाम भावना ..मन यावर ही होतो..तो आघात आयुष्यभर राहतो त्यामुळे ही ते लग्न करण्याच्या मनस्थितीत राहत नाहीत..
काहींना भविष्यात आपण स्टेबल होवू की नाही याची चिंता ..भीती असते…आपलेच भागत नाही तर जोडीदाराला काय देणार आपण अस्थिर जीवना मुळे ही लग्न करण्याच्या मनस्थितीत ही पिढी नसते…
काही वेळेस घरी कोणीच नसते लग्नाची जबाबदारी घेणारे…जसे आई वडील नसतात त्यामुळे बघणारे..पुढाकार घेणारे कोणी नसतात आणि स्वतचं स्वतः चे घेतलेले निर्णय अचूक असतील का अशी शंका किंवा भीती मनात येत असल्याने ही लग्नापासून दूरच राहण्याच्या मानसिकतेत मुले ..मुली असतात..
तर काही पुरुष शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतात..जसे शीघ्रपतन ..किंवा काहीना इतर काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती च आहेत त्याची सवय जसे हस्तमैथुन..,किंवा पोर्न बागण्याची सवय त्यातून च समाधान मिळविण्याची सवय त्यामुळे लग्न झाले आणि आपल्या जोडीदाराला हे समजले तर ती भीती किंवा लग्नानंतर हे स्वातंत्र्य राहणार नाही म्हणून ही लग्न करण्याची मानसिकता होत नाही.
खूप नाजूक विषय आहे हा लग्न न होण्याची अशी अनेक छोटी मोठी मानसिक कारणे असतात.. पण या मानसिक कारणांपासून सुटका करून घ्यायची असेल तर योग्य वेळी तज्ञ किंवा निष्णात अशा कौन्सेलर कडे जावून अचूक सल्ला घेणे गरजेचे असते…मार्गदर्शन घेणे जरुरीचे असते ..
समस्या असतात तसे त्या सोडविण्यासाठी मार्ग ही आणि कौन्सेलर ही उपलब्ध असतात… निराश न होता ..negative गोष्टी न बघता positive गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

