प्रेमाच्या गोड तक्रारी…
सौ. शमिका विवेक पाटील
Hello समीर, पुढल्या महिन्यात आपण pre wedding photoshoot करायचे की नाही हे फायनल सांग आधी. तसे मला शॉपिंग, लोकेशन, फोटोग्राफर आणि अजून बरंच काही ठरवायला. तू पटापट ‘ हो ‘ बोल म्हणजे तयारीला लागायला. अग पियू, माझं ऐकशील का ? मला ना यार त्या pre wedding photoshoot मध्ये इंटरेस्ट नाहीय ग. तू खूप छान दिसतेस, तुझे सगळे फोटो छान येतात पण माझा विचार कर ना, माझा एकतरी फोटो कधी नीट आलाय का ?
U know im photo कॉन्सिअस person. आणि किती तो खर्च करायचा ? So please मला फोर्स नको करुस. Im sorry baby. मला माहीतच होतं, तू हे असले काहीतरी बोलून mood off करणारं, तू ना एकदम टीपिकल आहेस. काय माहित मी तुझ्यात असं काय बघितलं ? एवढे बोलून फोन कट……
पियू म्हणजे प्रियांका नवीनच समीरच्या कॉलनी मध्ये रहायला आली होती. तिचे बाबा इन्कम टॅक्समध्ये मोठ्या पदावर होते. सतत बदल्या होतं असल्याने विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरावं लागायचं. त्यामुळे पियूचे कोणी खास मित्र मैत्रिणी बनत नसत. आणि तिलाही ह्याची सवय झाली होती, पैसा पाण्याची काहीच कमी नसल्याने अत्यंत लाडात वाढलेली एकुलती एक पियू जेव्हा समीरला पहिल्यांदा बघते तेव्हा बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडते. समीर एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉबला होता. जबरदस्त व्यक्तिमत्त्व, रोजच्या रोज मॉर्निंग वॉक आणि जिम न चुकता करणारा तितकाच संस्कारी सुध्दा होता.
रोजच्या त्या वाटेवर दोघांची नजरा नजर होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरच्यांना विश्वासात घेऊन आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतात. समीर आणि पियूचे कुटूंब सुशिक्षीत तसेच आजच्या पिढीला समजून घेणारे असतात. अगदी सहजरित्या सारे उपलब्ध होते. आता नातं मात्र ह्या दोघांना टिकवून ठेवायचं होतं.
१, २ वर्ष मजा मस्ती केल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करण्यात येते. पियू पैशांच्या बाबतीत फारच उधळी होती तर समीर एकदम व्यवहारी, एवढा पगार पाणी चांगले असून सुध्दा एक एक रुपयाचा हिशोब त्याच्याकडे असतो. मात्र पियुचे पूर्ण उलट, एक ड्रेस अजून वापरला सुध्दा नसताना ती लगेच दुसरा, तिसरा घेऊन मोकळी व्हायची. ह्यावरुन त्यांच्यात सतत वाद होत असे मात्र जीवापाड प्रेम असल्याने समीर नेहमी पियूची समजूत काढे. पियू दरवेळी स्वतःची मनमानी करत असे, पण तिचेही तेवढेच प्रेम होते समीरवर, त्याला उलट उत्तरं कधीच देत नसे. म्हणूनच दोघांमध्ये छान bondind होती. आणि अजून काय हवं ? एका सुखी संसारासाठी..
लग्नाची तारीख जशी समजली तशी पियूची शॉपिंग आणि प्लॅनिंग सुरु झाली. तिला सगळं hi fi हवं होतं. डेस्टिनेशन wedding करायची तिची इच्छा होती, वरतून मॅडमला हेलिकॉप्टर मधून एन्ट्री हवी होती. एवढा सगळा खर्च करायला समीरची बिलकुल तयारी नव्हती. त्याला अगदी साधेपणात लग्न करायचं होत. त्याचं रहाणीमान सुध्दा असंच होतं, simple living n high thinking…
पियुच्या डोक्यात pre wedding photoshoot चे भूत घुसले. सध्या सगळे तेचं करतात. आधीच्या काळी हळदीला एखादा फोटो काढला तर काढला नाहीतर काय ते लग्नातचं. पण आता जमाना बदलतोय नवीन गोष्टीचे आचरण करताना पैशांची उधळण होते हे बघत नाही. समीर ह्या फोटोशूटच्या अगदी विरोधात होता, त्याच्या मते ह्या सर्वाची काय गरज ? लग्नानंतर काढणारचं आहोत ना फोटो, आणि कशाला नको तो खर्च त्यापेक्षा तेच पैसे भविष्यात वापरू, ह्या विचारांचा होता तो.
त्या दिवशी फोटोशूटला समीरने नकार कळवल्यावर इथे पियूची चिडचीड सुरु होते. आत्ताच्या आत्ता मला भेट असे बोलून त्याला तातडीने एका हॉटेल मध्ये बोलवते. तो हातातली कामं टाकून तिला भेटायला जातो.. तसा त्यालाही राग आलेलाच असतो. कॉफीचा घोट घेत पियू विषयाला सुरुवात करते. हे बघ समीर, i know तू कंजूस आहेस पण ह्याचा अर्थ असा नाही ना की मी मन मारून जगावं.
एक मिनिट, तू मला कंजूस कशी काय बोलू शकतेस, मला फक्त हे असले फालतु खर्च करायला नाही आवडत that’s it. वा वा, म्हणजे मी जे खर्च करते ते फालतु आणि तू त्या दिवशी मॉल मधून बेल्ट घेतला, मी नको बोलत असताना सुध्दा आणि महिन्याभरात तुटला, तेव्हा नाही का फालतु खर्च झाला. पियू, ते old stock होता म्हणून झालं पण मी मुद्दाम थोडी केलं तसं. अच्छा ते जाऊदे, तू त्या दिवशी same brand ची same colour लिपस्टिक मागवली एक्सट्रा डिलिव्हरी चार्ज देऊन आणि नंतर use केल्यावर लक्षात आले की same to same आहे, ह्यावर काय बोलायचं आहे तुला ? ते सुध्दा चुकून झालं पण तुझ्याइतकी रडकी नाहीय मी.
आली मोठी लाडात, तू मला रडका कशी काय बोलू शकतेस ग, आहे मी थोडा इमोशनल. हो का ? म्हणजे मी रडते ते मगरीचे अश्रु, खोटे खोटे. तुला काय समजायचं ते समज, निदान माझा मित्र तुझ्या त्या मैत्रिणीसारखा तरी नाहीय. बघावं तेव्हा शेपटी सारखी पाठी पाठी असते, त्या दिवशी मूव्हीला जाताना तिला आणायची काय गरज होती ? आणि तिला पण अक्कल नको का ? कपल सोबत कशी काय येऊ शकते ?…
अच्छा, म्हणजे तुला आता माझी मैत्रीण खटकतेय ? आधी तिलाच सांगायचा ना सेटिंग करून द्यायला आपली. तुझ्या मित्रांचं तर राहुदेत, डिनरला पण सोबत येतात आणि कसलेपण पाणचट जोक मारत बसतात, वरतून काय तर ओरडून ओरडून सांगतात हा आमचा लंगोटीया यार आहे, लहानपणी आमच्याकडेच जेवायला यायचा.
बरं बरं, असुदे, आहेत माझे मित्र अवली पण स्वतःला बघ आधी, काहीही कॉम्बिनेशन करून कपडे घालते. आता आजचंच बघ ना, पायजम्यावर कोणी टीशर्ट घालते का ? Oye, गावठी, ह्याला फ्युजन म्हणतात. तुझ्यासारखं नाहीय माझं दोन शर्ट आठवडाभर. ऑफिसवाले तुला हसत असतील किती? मलाच काय ते बघावं लागणारं तुझं कपड्यांचं, लग्नानंतर हे असले सगळे कपडे मी रद्दीला देणारं.
Miss प्रियांका, आपल्यात पेपर रद्दिला देतात कपडे नाही. दोघांमध्ये सायलेंट, दोघेही टाळी मारतात हातावर आणि जोरजोरात हसतात. तू सांगशील तिथे photoshoot करू, काय आहे ना, माझं पहिलचं लग्न आहे म्हणून मला काही आयडिया नव्हती.I m sorry पियु, तुला उगीच नको ते बडबडलो. मी पण sorry समु, तुला खुप वाईट वाटेल असे बोलली. समजून घेशील ना मला असाच शेवटपर्यंत. Yes baby, always, फक्त तुझ्या त्या मैत्रिणीला हनिमूनला घेऊन येऊ नकोस….
प्रेमात अशा गोड तक्रारी पाहिजेत, त्यामुळे कुठल्याही नात्यात संवाद हलका फुलका राहतो. कितीही विरुद्ध स्वभावाचे असलो तरी पार्टनरला नक्की काय हवंय हे ओळखता आलं पाहिजे. इगो बाजूला ठेवून नातं जपता आलं पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
I agree with this but in reality it won’t happen