Skip to content

काहीही झालं तरी पुढे चालत रहा, आयुष्य मार्गी लावणं खूप महत्वाचं आहे!!

आपलं आयुष्य मार्गी लावणं खूप महत्वाचं आहे !!!


कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे.


नातं जणू सुगरणीचा खोपा….
(खाचखळगे आले पण नंतर विणलं गेलं ते…)

एका अनाथाश्रामात एकदा एक तरुण मुलगा “गोंडस बाळ” दत्तक घेण्यासाठी जातो.तो तिथे ठरलेल्या वेळेत अगदी वेळेवर पोहोचतो.तेवढ्यात तिथे एक तरूणी सुद्धा एखादं मुल दत्तक घेण्यासाठी येते.तिथे असलेला एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनाही प्रचंड आवडतात.आणि ते दोघेही त्यांचा निर्णय तिथे असणाऱ्या प्रमुखांना कळवतात.ते दोघेही विवाहीत असतात पण घटस्फोटीत असतात.मुलांची दोघांनाही खूप आवड असते.

हे मात्र त्या दोघांनाही माहित नव्हतं कारण दोघेही एकमेकांसाठी अनोळखीच होते.आता एक पेच तयार झाला होता कारण ती आवडलेली दोन मुलं नक्की कोण दत्तक घेणार…? यावरून बराच वेळ वाद चालू होते.कारण त्या दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं.ती बिचारी मुलं मात्र आसुसलेल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहत होते.वाद चालू असतानाच मधेच तो दत्तक घेणारा मुलगा त्या तरूणीला म्हणाला, मी इथे आधी आलोय आणि ही दोन्ही मुलं मला हवी आहेत.मुळात मी एक विवाहित तरुण आहे परंतु माझा काही कारणांमुळे घटस्फोट झाला आहे.पण मला लहान मुलांची खूप आवड आहे.त्यांच्यात मन रमवल तर मनात, चेहऱ्यावर समाधान असतं.जगण्यातील दुःखं मी सहज विसरून जातो.आणि या मुलांनाही मी अगदी मनापासून सांभाळेल.please please मला ही दोन मुल घेऊद्यात please……

…….हे सगळं ऐकून क्षणभर ती तरुणी भांबावली.कारण तिची गोष्ट सुद्धा अगदी त्याच्यासारखीच होती.तिनेही तिचं मत सांगितलं.ते ऐकून तोही क्षणभर भांबावला होता. कारण सगळच मिळतं-जुळतं होतं.फक्त घटस्फोटाचं कारण एकमेकांनी सांगितलं नव्हतं.आयुष्यात पुन्हा कधीही लग्न करायच नाही अस ठरवलेल्या दोघांनीही आज एक वेगळाच निर्णय घेतला.त्यांच्या वादंगाचं सुंदर संवादात रुपांतर केव्हा झालं हे त्यांनाही कळालं नाही.आतून “connection ” होतं तसच त्यांचही झालं होतं.समंजसपणे दोघांनी मिळून त्या दोन गोंडस पिल्लांना एकत्रितपणे सांभाळण्याचा निर्णय घेतला.पण लग्न न करता…!! त्यांच्या या निर्णयाचं सगळ्यांनी आनंदाने स्वागत केलं.

या सगळ्या गडबडीत एकमेकांची नावं जाणून घ्यायचं ते विसरून गेले होते.मग अचानक दोघेही एकाचवेळी बोलतात की तुमच नाव काय…? ते दोघ नाव सांगणार तितक्यात ती दोन मुलं बोलतात,तुमच नाव तर पालक. हे ऐकून ती तरुणी हसायला लागते.काय पालक…??(मुलगी हसऱ्या-मोकळ्या स्वभावाची असते) ही हा हा….काहीही हं.. बर मग तुम्ही काय कांदे बटाटे का..? ती हसत हसत त्या दत्तक मुलांना बोलते.मुलं लहान होती पण त्यांना समज मात्र खूप छान होती.पालक… म्हणजे न….ते parents असं म्हणायच होतं आम्हाला.sholly..we are very sholly…

लहान मुलांचं हे बोलणं ऐकून त्या दोघांचेही डोळे पाण्याने डबडबले होते.त्या दोघांनाही पालकसारख्या एका शब्दाने क्षणात सुखद धक्का दिला होता.अनुराग आणि शुभ्रा ही आमच्या दोघांची नावं(चिमुरडे म्हणाले).खरं तर ही नावं ऐकून त्या तरुण-तरुणीला त्यांच्या भुतकाळाची आठवण झाली. पण मुल मात्र खूप खुश झाली होती.त्यांना छान वाटत होतं.पण त्या दोघांचे चेहरेमोहरे मात्र भुतकाळाच्या सावल्यात विसावताना दिसत होते.

दोघांनाही वाटत होतं की ही नावं change केली पाहिजे.उगाच भूतकाळाच्या सावलीमधे का रहायच…? (अनुराग आणि शुभ्रा.. खर तर हीच नावं या दोन तरुण-तरुणीचीही होती..) अनुराग हा वर्तमानात जगणारा तरुण (व्यक्ती) होता.त्यामुळे त्याला वाटत होत की गेला तो past होता.तो गेला त्याचा परिणाम न होऊ देता आपण आयुष्य सुंदर जगू शकतो अस त्याच प्रामाणिक मत होतं.तर,शुभ्रा ला past सांगून पुढे जाण्यात रस होता.तशी तीही present मधे जगणारीच एक मनमोकळी मुलगी होती.पण तरीही तिला तिच्या past विषयी त्याला सांगायच होतं.तिने त्याला स्पष्ट सांगितले. मला थोड बोलायच आहे Mr.अनुराग… बोलणा…(अनुराग म्हणाला.)

तुला माझा भूतकाळ माहीत नाही.माझ्या कुटुंबाबद्दल काही माहिती नाही.तर मी जे सांगते ते नीट ऐक.आणि नंतर ठरव तू तुझा निर्णय…(शुभ्रा म्हणाली) अग हो बोल तर तु आधी….आणि हेही ऐक अग मला भुतकाळात रहाण्यात काही रस नाही.म्हणजे रमायला आवडत त्यात पण रहायला आवडत नाही.मी present मध्ये जगणारा एक साधा तरुण. मी केलेल्या चुका मी सांगु शकतो.मान्य करु शकतो.पण उगाचच अस मी नाही एवढा भुतकाळात रहाणारा.त्यामुळे तु बिंधास्त बोल.अगदी मोकळेपणाने…!!(अनुराग म्हणाला)

(मनात तिला वाटत होत की हा आपलाच अनुराग तर नाही नं…?…) अरे..किती मोकळा आहेस तु….छान वाटल मनाला.आता मी निर्धास्तपणे बोलते.तर मी एकटी राहते.मी माझ्या कुटुंबासोबत राहत नाही.खर तर मला एक मुलगा आवडायचा.त्याच नावही अनुराग होत. त्यालाही मी आवडायचे.पण आम्ही कधी अस समोरासमोर आलोच नाही.बोलणं फक्त पत्र…call यातूनच व्हायचं.लेखक/कवी होता तो…एकदा कॉलेजमध्ये त्याने त्याची “शुभ्रा” नावाची कविता सादर केली होती.

त्या कवितेच्या आणि त्याच्या प्रेमात मी अक्षरशः वेडी झाले होते…भेटायच होतं एकदा पण शक्य झाल नाही.गर्दीत तर त्याचा चेहराही नीट दिसला नाही.पण कवितांनी,शब्दांनी त्याच्याशी अंतरात्म्यातून ओळख झाली होती…न भेटता कुणी कसा विश्वास ठेऊ शकत..?? असच सगळ्यांना वाटत होतं.पण तरीही लग्न करायचं ठरवलं होतं.त्यासाठी भेटणारच होतो.त्याच्या घरचे आणि माझ्या घरचेसुद्धा अगदी श्रीमंतीत लोळणारे होते.कसली कमी नव्हती.

या श्रीमंतीचा मात्र आम्हा दोघांनाही अजिबात गर्व नव्हता.पण घरच्यांना त्या श्रीमंतीचा खूपच माज होता..मनाची श्रीमंती मात्र शुन्य होती.प्रेमविवाहाला विरोध नव्हता पण ती (माजलेली)श्रीमंती या सगळ्याच्या आड आली.लग्नासाठी पूर्वभेट ठरली होती.तेही शानदार स्वतंत्र Hall मध्ये…मी खूप आनंदात होते त्या दिवशी कारण ज्याला भेटायची तीव्र इच्छा होती तो आज मला भेटणार होता..पण चित्र काही वेगळच होतं.घरचे म्हणाले आम्ही भेटून ठरवतो काय करायच ते…तु मोठ्यांमध्ये नाक खुपसू नकोस.माझं ऐकणारं अस कुणीच नव्हतं.मी गप्प बसले. ठरल्याप्रमाणे मुलाकडचे आणि माझ्या घरचे यांनी भेट घेतली.मला वाटलं मुलगा तरी आला असेल…at least त्याने आग्रह केला तर मला भेटता येईल त्याला..पण कसल काय….जे माझ्या घरी तेच त्याच्या घरी….!!

थोड्यावेळाने सगळे घरी आले..आणि म्हणाले चांगला आहे हो मुलगा.आपण उद्याच लग्न करतोय तुमच…छान मुहूर्त आहे दसऱ्याचा…!!(त्याच्या घरीही हेच सांगितल होत त्याला…) भेटलोच नाही म्हणून थोड वाईट वाटत होत.पण लग्न होतय याचा मात्र खूप आनंद झाला होता.कारण मी त्याला असही त्याच्या कवीमनातून ओळखल होतं.पण माहीत नाही यार नियतीच्या मनात नेमक काय होतं…? दुसऱ्या दिवशी लग्न…जास्तच घाईने चालल होत सगळं.

शेवटी लग्नाचा दिवस उजाडला…आता आज तरी मी खूपच म्हणजे खूपच खुश होते.कारण आज खरच भेट होणार होती आमची…… सुरुवात तर झाली होती सगळी.सनई चौघडे वाजत होते..धुमधडाक्यात चालू होत सारं काही..आंतरपाटामुळे एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते…एकमेकांच्या गळ्यात हार घालणार इतक्यात मानापानावरून दोन्ही कुटुंबात खटके उडू लागले.सगळ्यांसमोर उगाच नाचक्की झाली.पैसे,दागिने,हुंडा,मानपान वगैरे वगैरे…यावरून बरेच वादंग निर्माण झाले.(मनाची श्रीमंती लुटायची सोडून पैशाचीच(माजलेली) श्रीमंती त्यांनी लुटली होती.)विधीही नीट झाले नव्हते अन् लग्न मोडण्यापर्यंत विषय गेला.

मी तर मुलाला नीट बघितलही नव्हतं.आणि खरच शेवटी आमच लग्न मोडलच त्याच दिवशी…आम्ही दोघांनीही नायलाजाने devorce paper…वर सह्या केल्या .मात्र मला कळाल होतं की घरच्यांनी कुटुंब जोडल नाही तर एक प्रकारे करार केला होता…त्याच दिवशी मी माझं घर,शहर सोडून कायमची या शहरात आले.एकटी राहत होते.पण सुखात होते.त्या श्रीमंतीचा माज मला ऐकू येत नव्हता.

ते लग्न मात्र कायमच लक्षात राहील होत.त्याच दिवशी पुन्हा कधी लग्न करायच नाही हेही मनाशी पक्क केल होतं.प्रचंड त्रास झाला सगळ्या गोष्टींचा.त्याला तर….विसरु नाही शकले कधी….आणि पत्रही पाठवू नाही शकले…पत्र लिहून तशीच भिंतींवर छान फ्रेम करून लावली…कारण पत्रव्यवहाराचा पत्ता…email…. mobile number…सगळ क्षणात बदलल होतं….पण आजही सलतय मनाला काहीतरी….. की आपण काही करू शकलो नाही.पळून जाऊ शकत होतो.पण मला वाटल हे आपले संस्कार नाहीत….(गोड गैरसमज होता माझा..)….पण झाल ते झालं….accept करायला शिकलेय मी.त्याच्याकडूनच..आहे नाही तो…काही माहिती नाही…पण हे सगळ मला सांगण गरजेचं वाटलं म्हणून मी बोलले एवढं.आता तुझा निर्णय…जो काही असेल तो मला मान्य असेल……. अस बोलून ती थांबते…(शुभ्रा म्हणाली) (ती रडलीच होती जवळजवळ)

अनुराग : हे घे…पाणी…. पि…तुला बर वाटेल.. बस इथे.. शांत हो…(तो तिला थोडा वेळ देतो शांत व्हायला….)
शुभ्रा: अरे बोल तु ..am ok… अनुराग : (मनातून तर अनुरागही रडला होता..) (स्वतःला सावरत तो म्हणाला)ऐक…घट्ट डोळे मिट…दीर्घ श्वास घे….मी सांगेन तोपर्यंत डोळे मात्र उघडायचे नाही….कळालं…? आणि हो please हे ऐकावच लागेल…हव तर माझी विनंती समज…
शुभ्रा: अच्छा.ठीक आहे.no problem शुभ्रा हळूहळू घट्ट डोळे मिटते…श्वास घेते…
तेवढ्यात अनुराग बोलू लागतो….

लेखणी माझी सुगंधात तुझ्या रमणारी…
शब्द वेचिता बहरू कवितासी आणणारी…
अंधारातही नभी लुकलुकणारी शुभ्र चांदणी तु…
शुभ्रा..!!

(आणि तो थांबतो.) तिला तर खर डोळे उघडायची घाई झाली असते..पण त्याने सांगितलं म्हणून ती शांतपणे ऐकत होती..
अनुराग…: ऐक,तु डोळे उघडू शकतेस.माझ बोलून झालय…
(शुभ्रा डोळे उघडते..)
शुभ्रा : तु..अनुराग..! (तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी वाहत होत्या) (तिच्याकडे बोलायला शब्द होते पण ती बोलू शकत नव्हती.सुखद धक्का बसला होता तिला….)
अनुराग : हो मी तुझा न भेटलेला अनुराग.तु past सांगून माझीही story सांगितलीस.नाहीतर कदाचित आज आपण कोण काय कळाल नसतं..कदाचित…!! अग मीच खूप खुश आहे आत्ता.मला माझी न भेटलेली शुभ्रा भेटली आहे….तु जो विचार केला तोच मीही केला..मुलं दत्तक घेण्याच्या प्रवासापर्यंत तर आपली गोष्ट / आयुष्य अगदी same आहे……

बरं ऐक ना मी काय म्हणतो..आपण खूपच वेळ घेतला बोलायला…मुलं आणि त्या सर्वेसर्वा ही वाट बघत असतील..आधी आपण हे काम करूयात नंतर निवांत बोलूयात…चल लवकर. शुभ्रा: चल जाऊयात आत.

दोघेही आत जातात.मुलांची व्यवस्थित चौकशी करतात.मुलांनाही विचारतात,आमच्याकडे राहायला आवडेल ना वगैरे…. वगैरे…शेवटी कुणाचीही कसलीच हरकत नसते.मुलं आता त्यांच्याकडे जायला मोकळी होती.मुलांना घेऊन त्यांनी त्या आश्रमाचा निरोप घेतला…तेव्हा अर्धवट राहीलेल्या नात्याने आज पुन्हा एकदा या दोघांना ते नातं पूर्ण करण्याची नवी संधी दिली होती. तेही त्या गोंडस दत्तक घेतलेल्या मुलांमुळे..कायदेशीर नी धार्मिक विधी न करता यांच नातं प्रेमाने, माणुसकीने, मनामनाने पुन्हा बांधलं गेलं…कितीतरी अडथळे आले या दोघांमध्ये…पण आता ते नातं विणलं गेलय कायमच. अगदी सुगरणीच्या खोप्यासारखचं…!!

शेवटी इतकच सांगेन-कितीही काहीही झालं तरी पुढे चालत रहा…त्या दोघांसारखच. कारण आयुष्य मार्गी लावणं खूप महत्त्वाचं आहे..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!