Skip to content

एक आई म्हणून तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का….?

– डॉ. दिपलक्ष्मी धनंजय जाधव
 
संध्याकाळची वेळ -माझ्या छोट्या देवीशाला घास भरवताना नेहमी गोष्टी लागतात. म्हणून आज रामायणाची गोष्ट सांगते,  असे म्हणताच मोठी दूर्वा(चिनू) धावतच आली,  म्हणाली-” मी पण ऐकते, कारण तू नर्सरीत सांगायचीस, ते आता मी विसरून गेले आहे.” 
 

गोष्ट सुरू झाली– वनवासात गेले राम- सीता, सकाळच्या कोवळ्या उन्हात पर्णकुटीसमोर फुले वेचताना सीतेला दिसलेले सोन्याचे हरीण- हा प्रसंग सांगत होते.  सोन्याच्या हरणाचा हट्ट सीतेने धरताच राम धनुष्यबाण घेऊन धावत गेले. इथपर्यंत गोष्ट येताच चिनू मोठ्याने हसायला लागली? म्हणाली ,”बस हा!  काहीही सांगते ?नीट सांग ,मी काही लहान नाही, मला उल्लू बनवायला!  मला काही कळेना?? नीट म्हणजे?  

 
त्यावर ती म्हणाली ,”अगं सोन्याचे हरीण कुठे असते का?  आणि सीतेला  एवढं कळायला नको, लहान आहे का ती हरिण पाहिजे म्हणून हट्ट धरायला? आणि प्रभू राम देव होते ना ते? कशाला गेले धावत लगेच ? काहीही  फनी सांगते! त्यावर मी तिला ओरडले? प्रभुराम आपले देव आहेत .आणि या रुपका मागचा अर्थ खूप चांगला आहे .माणसाला मोह होतो वगैरे वगैरे…. यावर ती पुन्हा मोठ्याने हसायला ??लागली म्हणाली ,”राजवैभव सोडून आले होते ना ते दोघे मग हरणामागे कशाला लागले? मला काय उत्तर द्यावे कळेना??‍♀??‍♀ ही वाल्मीकीची रचना आहे हे तिला सांगितले. 
 
यावर ती म्हणाली,” वाल्मिकींनी गोष्ट नीट लिहायला हवी होती. सोन्याचे हरीण कशाला- सरळ राक्षस उभा केला असता, तरी राम त्याला मारण्यासाठी मागे गेले असते की!  आता नीट सांग रामायण- पुन्हा करेक्शन करून-?? यावर मी आ वासून बघतच राहिले. तिचे  गडगडाटी हास्य सुरू होते. शेवटी एक धपाटा?? घालून तिला आपल्या पौराणिक ग्रंथांचा अपमान न करण्याबद्दल सांगितले. आणि बाहेर पिटाळले. विचार करत राहिले ,बापरे! या पिढीला गोष्ट सांगायची म्हणजे महा कठीण काम आहे!!!
 
***
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!