एक सुंदर कथा..मैत्रीपलीकडचं नातं!!
सौ. शमिका विवेक पाटील
ऑफिस मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली, ह्या वेळेस पावसाळी पिकनिक कुठे काढायची… बऱ्याच मोठ्या चर्चे नंतर निष्कर्ष लागला की आपण सर्वांनी natural waterfall म्हणजेच धबधब्यावर जाऊन मज्जा करायची…आणि जवळपास एखाद्या ढाब्यावर दुपारचे जेवण करायचे. सर्वांची पसंती ऐकून तारीख फिक्स करण्यात आली… येत्या रविवारी ऑफिस स्टाफ तसेच सीनिअर कोणी असतील त्या सर्वांनी उपस्थिती लावावी अशी नोटीस, ऑफिसच्या ऑफिस बोर्डवर चिकटविण्यात आली.
नेहा मात्र ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होती… ती भली आणि आपलं काम भलं ह्या नितीने ती रोज ऑफिसला यायची… विवाहित असल्यामुळे ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होती… वरतून सासू सासरे, नणंद, नेहाचा मुलगा आणि नवरा अशी जॉइंट फॅमिली होती.. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीणच…
तिच्या अशा एकाकी स्वभावामुळे ऑफिसमध्ये जास्त कोणाशी बोलणे होत नसे, मात्र अजय हा नेहाचा बेस्ट फ्रेन्ड होता, सिंगल असल्यामुळे तो लाईफ मस्त एन्जॉय करायचा…नेहा सीनिअर होती आणि अजयला जॉब जॉईन करून १,२ वर्ष झाली असतील पण ह्याची नेहा सोबत अगदी जुनी ओळख असल्यासारखी मैत्री होती… दोघांचं सोबत एकत्र जेवायला काय बसणं, कधी कधी एकत्र ट्रॅव्हल काय करणं, बऱ्याचदा नेहासाठी अजयचे चॉकलेट काय आणणं… वरतून दोघांमध्ये ५ वर्षाचे अंतर तरिही एकमेकांशी इतके छान टूनिंग होते की बघणाऱ्याला वाटेल ह्यांच लफडच सुरु आहे… शेवटी जिथे मनं जुळतात तिथे वयासारखी बंधन नसतात…
त्या दिवशी, लंच टाईम मध्ये दोघे एकत्र टिफीन खायला बसले… सो, काय ठरले ? नेहा तुझे… येणारं ना पिकनिकला ? आपण अशी मस्त धमाल करू ना की बघ तू… नेहा, hmmm बघू बोलली आणि विषय बदलला… अजयला समजले ही काय येणारं नाही… त्यानें पुन्हा विचारले तरीही ही खाण्यात मग्न होती… रागात शेवटी तो बोलला.. हे बघ नेहा, तु आली नाहीस तर मी पण जाणार नाही….n that’s final..no more discussion… आणि रागा रागात निघून गेला… पिकनिकला कोण कोण जाणार ह्याची लिस्ट फायनल होते..त्यात नेहा, अजय आणि अजून दोघा तिघांचे नाव नसते…
पिकनिकच्या दुसऱ्या दिवशी सगळे कर्मचारी ऑफिसला येतात आणि आपण किती मज्जा केली ह्यावर नेहाकडे चर्चा करत बसतात.. तू यायला हवे होतेस ग… आम्ही सगळे किती भिजलो अगदी लहान मुलांसारखे मस्ती करत होतो… नेहा त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकण्यात मग्न होते, तिला पण जायची इच्छा होती पण घरचे पाठवणार नाहीत म्हणून मन मारून जगायची तिला सवयच झाली असावी… सगळ्यांना तिचा प्रसन्न चेहरा दिसत होता मात्र दूर उभा राहून अजय त्यामागचे दुःख बघत होता… ऑफीस सुटल्यावर अजयने नेहाला थांबायला सांगितले.. थोडं बोलायचं आहे असे म्हणून तो निघून गेला…
ऑफिसच्या गेट जवळ नेहा थांबली… अजय तिला चॉकलेट देऊन म्हणाला आत्ताच्या आत्ता खा… तिला काही समजेना तिने ते आवडीने खाल्ले… आणि तो शांतपणे बोलला, काय चाललंय नेहा तुझं ? मी कुठे काय केलं अजय ? काही नाही… मी तर नॉर्मल आहे… नेहाचे हे बोलणे ऐकून त्याचं अजून डोकं फिरले… किती दिवस तु अशी स्वतःला बंद करून घेणारं आहेस… तुझ्या बाकीच्या मैत्रिणी बघ किती एन्जॉय करतात आणि तु घर एके घर.. तुला ना रोज रोज मरुन जगायची सवय झालीय..तु माणूस नाही तर नुसते एक सजीव शरीर आहे..त्यात कसल्याच भावना नाहीत… तुझी काही स्वप्न नाहीत का ग ? तुला स्वतःसाठी जगावस नाही का वाटतं ? तुझा नवरा मित्रांबरोबर वेळ काढून कुठे कुठे जातो आणि तू बस् घरात नुसती झुरत… तुला कोणी असे वागण्याचा अवॉर्ड नाही देणारं….
नेहा, तु तुझे अश्रु जगापासून लपवू शकतेस पण माझ्यापासून नाही… ती पुढे काही बोलायच्या आत, मी परवा ट्रॅकिंग ग्रुप सोबत एक गड चढायला जाणार आहे… आणि तू माझ्यासोबत येणारं आहेस… that’s it .. मुली पण आहेत सोबत आपल्या.. त्यामुळे नुसते बॉईज आहेत ह्याचा विचार करू नकोस…. नेहा स्तब्ध उभी राहते… आणि तो bye बोलून निघून जातो…
घरी येऊन फ्रेश होत असताना अजय जे बोलला त्याचा विचार करून नेहा खुप रडते… खरंच, किती मन मारून जगतेय मी… स्वतःसाठी काय करतेय ? अजयचे बोलणे मनाला इतके का लागले ? अजय का माझा इतका विचार करतोय ? त्याला नक्की काय हवंय माझ्याकडून ? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या डोक्यात घर केलं… ट्रेकिंगला जाणारं त्याच्या आदल्या रात्री अजयचा मॅसेज येतो… आम्ही उद्या सकाळी ६ वाजता निघणार आहोत be ready… shoes घालून ये…good night बोलून झोपतो…
सकाळी त्याची कार नेहाच्या घराच्या थोड्या अंतरावर उभी असते…तो तिची वाट बघत असतो, आणि नेहा येताना पाहून त्याचा चेहरा इतका खुलतो तो धावत पुढे जाऊन तिच्या हातातली बॅग घेतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो… एका बाजूला बोलतो..i know, तु येणारं.. thank you so much… आणि तो त्याच्या मित्र, मैत्रिणींशी ओळख करून देतो आणि प्रवास सुरु होतो…
गडाच्या पायथ्याशी आल्यावर सर्व पाया पडून गड चढायला सुरुवात करतात.. त्या सर्वांमध्ये नेहा फार लवकर मिक्स होते… थोडा डोंगर चढल्यावर तिला दम लागयला सुरुवात होते… चढायची सवय नसल्यामुळे पटकन थकवा येऊ लागतो… अजयचे मित्र पुढे निघून जातात… अजय मात्र नेहा सोबत हळू हळू डोंगर चढत असतो…. डोंगर चढताना नेहा अजयला विचारते, तु का हे सर्व करतोय माझ्यासाठी ? आपल्यात काय नातं आहे ? तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी का इथवर आले ? तुला नक्की काय हवंय माझ्याकडून ?…
अजय हसतो आणि बोलतो एकदा का आपण डोंगर चढलो ना की तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो… आणि २ तास डोंगर चढल्यावर नेहा जे दृश्य बघते त्यात ती भान हरवून जाते… वरती निरभ्र आकाश, थंडगार वारा, चहुकडे हिरवळ, दूर वर नजर जाईल तिथे डोंगर रांगा…नेहा हातांना पंख बनवून दूरवर धाव घेते….अजय पुढे जातो आणि तिचा हात पकडतो… तो काही बोलायच्या आत नेहा त्याला थँक्यू बोलते… डोळ्यात पाणी आलेले बघून अजय चॉकलेट देतो आणि म्हणतो खा आत्ताच्या आत्ता.. तिच्या चेहऱ्यावर लगेच हसू येते…
नेहा, काही नात्यांना नाव न दिलेलं बरं असतं ग… तुझ्या माझ्यात काहीही नसले तरी लोकं त्यांच्या कुवतीप्रमाणे नावं ठेवणारं… तु मला समजून घेतेस, मला प्रेमाने समजावते, तुझ्या सोबत मला बोलायला आवडते म्हणजे मला काही हवेच आहे असे नसते ना… तू खुश रहा.. एवढेच हवे आहे… मी आहेच तुझ्यासोबत नेहमी…तुझी सोबत मला आतून खुप strong बनवते… ThanQ नेहा तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि इथवर आलीस… आपलं नातं असच पवित्र राहील…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!