चुक कोणाची ?
लालचंद कुंवर
पुणे.
जान्हवीला आज रविवारची सुट्टी. सुट्टी म्हणजे एक पर्वणीच असते ! मस्तपैकी निवांत उठायचं. ना कामाला जायची घाई ना कामं उरकण्याची गडबड. अगदी पुर्ण दिवस मनाप्रमाणे घालवायचा. पण जान्हवीच्या बाबतीत , नको मेला हा सुट्टीचा दिवस !
किमान कामावर असल तर … ! नको ते विचार मनात येऊन , छळत तरी नसतात ! जसजसा दिवस मावळतीला लागायचा, तस तसा तिचा जीव ही टांगणीला लागायचा !
रोजचीच कटकट , अक्षरशः कधी कधी जीव रडकुंडीला यायचा. ‘माझ्या नशिबातच हे होत, ‘ , नशीब बदलता येत नाही .’असं रडगाण गात, जान्हवी , वीस वर्षापासुन दारुड्या नवऱ्यबरोबर संसाराचा गाडा ओढत आहे.
पदरी एक मुलगा , निसर्गानं टाकलेला. सकाळी उठल्यावर , दोघांनी कामाला जायच. संध्याकाळी नवऱ्याने कामावरुन येतांना मात्र चांगलंच
टाईट होऊनच येयाच. असं आठवड्यात एखाद दिवसाचा अपवाद सोडला तर नेहमीचच झालेलं.
हा नवरोबा, नेहमीच मद्यधुंद अवस्थेत , त्यातच शरीराचा कुबट वास! ना बोलण्याच भान, ना वागण्याचं. नेहमीच संवादाच्या नावानेही शिमगाच!
सुरुवातच, ‘ ए रांड… ने सुरू व्हायची आणि खानदानीचा उध्दार करुन शेवट व्हायचा !
रात्री जनावरासारखा तुटून पडायच. एक दोन मिनिटात शरीर ओरबाडून झालं की लगेचच कुस बदलायची. कामावरुन आल्यावर , अपवादानेच कधीतरी प्रेमाने बोलणं व्हायचं. नाहीतर वीस वर्ष , ना प्रेमाने बोलणं , ना आपुलकीने जवळ घेणं.
हा शारीरिक आणि मानसिक समाजमान्य अत्याचार रोजचं सुरु असताना दुसरी कडून कायम आर्थिक विवंचना ताण.
या साऱ्यातून सुटका अणि मार्ग निघावा म्हणून जान्हवी दिवसभर कामाला जाऊन मन गुंतवू लागली. शिणलेल्या विचार चक्रातून सुटका अणि दोन पैसे पदरी मिळतील , हि अपेक्षा ! किमान फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी. पण हि विवंचना येथेच थांबत नाही तर…….
कामाच्या ठिकाणी , कोणीतरी विकृत सुटाबुटातला बाबू , अगदी टपून बसलेलाच असतो, ” मागणी तसा पुरवठा करण्यासाठी.” गरज भावनिक आधाराची असेल तर… .. ! गोड बोलून ….. मानसिक असेल तर …….! आधाराचा शब्द देऊन….. आर्थिक असेल तर……..! मी आहे ना……. या गरजेच्या आड लपून असाह्यतेच फायदा घेण्यासाठी.
मग जान्हवी सारख्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक गरज पुर्ण न झालेल्या अणि कायम नवराच्या प्रेमालाही उपेक्षित असलेल्या हरणी अलगद या श्र्वापदांच्या सापळ्यात अणि मोहात अडकल्या जातात.
मग पुढे घर, लेकरं बाळ , यांचाही विचार नाही. काय योग्य, काय अयोग्य याच्याही सीमारेषा धूसर व्हायला लागतात… !अशा बाबुंकडून जबाबदारी स्वीकारायची वेळ आलीच तर ?पद्धतशीरपणे हात वर , अणि तो मी नव्हेच…. हा आवं, आणला जातो.
आणि शेवटी जान्हवी ही याला अपवाद ठरली नाही……….. !आता प्रश्न असा आहे की, अशा जान्हवी गावोगावी आहेत. मग अशा या घडणाऱ्या घटनांना जबाबदार कोण ? नेमकी चुक कोणाची ?
वीस वर्षांपूर्वी , जान्हवी आई बापाची लाडाची लाडूबाई. अठरा एकोणीस वर्षांची असताना , कोणीतरी मध्यस्ती , एखादं स्थळ सुचवतो. पण योग्य चौकशी , खात्री अणि स्वतः पाहाणी न करता, मुलगी व्यसनाधीन व्यक्तीच्या दावणीला बांधली जाते ?
मग चुक कोणाची ? मध्यस्थीची की आई-बापांची ! नवरा म्हणून काही नवऱ्याची कर्तव्य असतात. काही जबाबदाऱ्या ही असतात. पण
त्याची ना जान ना भान ! असे कर्तव्यशुन्य नवरे. आणि बायको म्हणून नवऱ्याला वठणीवर आणू न शकणाऱ्या,
अन्याय, अत्याचार यांच्या श्रृंखला , बेड्या तोडू न शकणाऱ्या. आणि भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं, याची जाणीव विसरुन बाबूंच्या तावडीत फसणाऱ्या जान्हवी सारखा बायका !
मग नेमकी चुक कोणाची ? नवऱ्याची की बायकोची !
समाप्त.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

