Skip to content

प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !!

प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !!


सौ. मिनल वरपे


प्रेम तर सगळेच करतात.. विश्वास ठेवतात.. काळजी घेतात..पण जेव्हा याच प्रेमात फसवणूक होते तेव्हा होणारा त्रास हा ना कोणाला सांगता येत ना कोणी समजू शकत..

दिवस हा महिण्यासारखा वाटतो तर येणारा प्रत्येक क्षण इतका जड वाटतो की अजून वेळ पुढे जात कसा नाही याचा राग येतो.. मनात सतत विचारांचा गोंधळ.. दोघांच्या जुन्या आठवणी जेव्हा आठवतात तेव्हा ओठांवर नकळत हसू येत पण त्याच्याच पुढच्या सेकंदाला आठवण होते ती वास्तवाची..

अस वाटायला लागते नको हे जगणं.. हे दिवस का आले माझ्या आयुष्यात.. हे जर वास्तव असेल तर मला गेलेल्या दिवसात पुन्हा जगायचं आहे.. पण नंतर केलेल्या फसवणुकीची जाणीव होते तेव्हा मनात तेवढाच स्वतःबद्दल आणि ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याचा तिरस्कार निर्माण होतो.

स्वतःचा तिरस्कार प्रचंड होतो. कारण मला कळलं कस नाही मला कोणी फसवतेय , इतकं मी का गुरफटून गेलो की मला कसलं भानच उरलं नाही..मला माझ्या वागण्याचा आज खूप पश्चाताप झालाय आणि त्याहून जास्त स्वतःचाच राग आलाय.. मला माझी फसवणूक होतेय हे आधीच जाणवलं असतं जर मी वास्तवात जगण्याचा प्रयत्न केला असता .पण त्या प्रेमाच्या मोहजाळात मी इतक अडकवल की मला स्वप्नात जगायची सवय झालेली….

पण आज रुपालीने सत्याचा स्वीकार केला खूप त्रास झाला तिला या वादळातून बाहेर पडताना.. पण आज ती त्या धक्क्यातून सावरली.. त्यानंतर तिने मात्र ठरवलं की यापुढे कोणाशी बोलायचं सुद्धा नाही.. प्रेम वैगेरे सगळं खोटं आहे.. वास्तवात मात्र जो तो त्याचा फायदा घेत जगत असतो.

नंतर ती अगदी नॉर्मल वागू लागली.. वास्तवात जगू लागली.. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात जे अपेक्षित सुद्धा नव्हत ते घडलं.. रुपालीने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.. तिथे सगळे नविन होते तिच्यासाठी.. अभ्यासासाठी, आणि जसे प्रोजेक्ट्स मिळत गेले त्या निमित्त तिला तिथे टीम सोबत काम करायला लागलं.. आणि टीम सोबत छान मैत्री झाली.

अनिकेत हा त्याच टीम मधला मुलगा .. जो खूप हुशार, लाघवी आणि सर्वांना मदत करणारा.. त्याच आणि रुपलीच खूप छान जमायला लागलं.. त्यांच्यात खूपच छान मैत्री झाली.. पण आधीच्या अनुभवातून पुढे आलेली रुपाली स्वतःला सांभाळत सावरत सगळ्यांसोबत राहत होती.

काही वेळानंतर अनिकेतने रुपलीला त्याच तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले.. रुपाली साठी हे नविन जरी असल तरी अगदीच धक्कादायक नव्हत कारण त्यांच्यातील मैत्री तसेच अनिकेतच्या बोलण्यातून कित्येकदा तिला आणि इतरांना हे नेहमीच जाणवायचं.

पण रुपाली ला मात्र काहीच सुचेनास झालं.. नाही म्हटलं तर अनिकेत आणि माझी मैत्री पूर्वीसारखी राहणार नाही.. तो तिच्यापासून दूर जाईल.. आणि हो म्हटल तर पुन्हा माझी फसवणूक तर नाहीना होणार..

खर तर जे प्रेम तिला कायम अपेक्षित होत तेच अनिकेतच्या नजरेत तिला दिसत होत.. जी काळजी प्रत्येक मुलीला अपेक्षित असते तीच तिची काळजी अनिकेत करायचा..

प्रेमात काय अपेक्षित असते वो.. खरी साथ, मनापासून काळजी आणि विश्वास.. आणि हे सगळं अनिकेत मधे आहे याची रुपालीला खात्री होती.

अनिकेत आणि रुपाली मधे इतकी चांगली मैत्री होती त्यामुळे तिचा भूतकाळ त्याला माहित होता.. पण तरीसुद्धा त्याचा तिच्यावर असलेला विश्वास तिला होकार देण्यास भाग पाडत होता …

नंतर तिने त्याला होकार दिला.. आणि तिच्या आयुष्यात, तिच्या हृदयात अनिकेतच्या खर प्रेमाने कायमस्वरूपी जागा निर्माण केली..

रुपाली सारख्या अनेक मुली आहेत ज्यांना असे अनुभव आलेत आणि त्यातून स्वतःला सावरून त्यांनी आयुष्य जगायचं ठरवलं.. पण पुन्हा एकदा नव्याने कोणावर प्रेम करणं म्हणजे गुन्हा तर नाहीना.. भावना प्रत्येकाला असतात.. प्रेम करण्यासाठी कोणती अट नसते आणि कोणती वेळ सुद्धा नसते.. ते तर होऊन जाते..

आधी फसवल म्हणून जर कोणी रडत बसेल तर नक्कीच त्याचा त्रास त्या व्यक्तीसोबत इतरांना सुद्धा होतोच. घरातले, मित्र मैत्रिणी.. या सर्वांना त्यांची अवस्था पाहवत नसते.. पण तेच जर सगळ विसरून पुन्हा नव्याने प्रेम केलं तर मात्र त्याला/ तिला चुकीचं ठरवलं जाते.. चुकीचं आचरण म्हणून घोषित केलं जाते . यापेक्षा ज्याचं त्याच आयुष्य.. जर ते खरचं प्रेम करत असतील तर त्यांना दोष देणारे आपण कोण.. ज्याने आधी दिवस वाईट काढले कारण त्याने विश्वास ठेवण्याची चूक केली पण त्याचा त्रास सुद्धा स्वतःच सहन केला त्याने नव्याने प्रेम केलं, आनंदात राहायचा प्रयत्न केला तर त्याला नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाहीना..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रेमात फसवणूक झाली, म्हणून पुन्हा कधी प्रेम न करणं चुकीचंच !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!