Skip to content

दिवसाची सुरुवात ही कालच्या पच्छातापाने अजिबात करू नका.

दिवसाची सुरुवात ही कालच्या पच्छातापाने अजिबात करू नका.


सौ. मिनल वरपे


सचिन एक असा मुलगा जो कायम शाळेत असताना प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा.. घरचं वातावरण सुद्धा मोकळं.. रोज सकाळी लवकर उठायचं.. व्यायाम करायचा.. नाश्ता.. अभ्यास.. शाळा आल्यावर पुन्हा फ्रेश व्हायचं , थोडावेळ खेळायच, नंतर अभ्यास, जेवण आणि वेळेत झोपायच.हा त्याचा दिनक्रम.. शालेय शिक्षण पूर्ण झालं.. नंतर कॉलेज पण डीग्रीच्या शेवटच्या वर्षाला मात्र पूर्व परीक्षेत त्याला हवे तसे गुण मिळाले नाही.

त्याचा कुठेतरी अभ्यास कमी पडला असेल पण याचा त्याने स्वतःलाच खूप त्रास करून घेतला. रोज सकाळी उठल्यावर त्याला मिळालेलं अपयश त्याला आठवायच.. त्यामुळे अंथरुणातच तो पडून राहायचा.. त्याला काहीच सुचेनास व्हायचं.. त्याचा इतक्या वर्षांपासून असलेला दिनक्रम आता मात्र पूर्ण बिघडला… त्याला सगळं नकोस वाटायचं.. अभ्यास करायची इच्छा नसायची कारण त्यावेळी त्याला मिळालेले कमी गुण आठवायचे.. जेवायला बसताना सुद्धा त्याला रडू यायचं.. कारण मनात तेच विचार.. खेळायला बाहेर पडण्याची इच्छा नसायची त्याला.. आणि याचा सगळा परिणाम त्याच्या अभ्यासावर तसेच येणाऱ्या परीक्षेच्या गुणांवर झाला.. आणि त्यानंतर मात्र त्याला अजून कमी गुण मिळाले… आणि तो पूर्ण खचला.. अभ्यासाची त्याला भीती वाटायला लागली..

आणि त्याच्या या अपयशाचे कारण म्हणजे सर्वस्वी त्याचे विचार… कारण कमी जास्त गुण तर कोणालाही मिळतात त्यामधे आपल्याला अजून जास्त अभ्यास करून गुणांमध्ये बदल करता येतो. पण सचिन सकाळी उठताच जे नकारार्थी विचार करायचा.. आधीच घडलेलं आठवून पश्चाताप करत सकाळची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वापरायचा त्यामुळे त्याला दिवसभर तोच विचार डोक्यात राहून त्रास द्यायचा.

याऐवजी जर सचिन ने सकाळी उठताच झालेल्या गोष्टी विसरून ठरवलं असत की आजपासून मला जास्त चांगला अभ्यास करायचा आहे.. अधिक गुण मिळवून मला प्रगती करायची आहे आणि हे मी करणारच तर नक्कीच त्याच्या या विचारांनी केलेली दिवसाची सुरवात त्याला दिवसभर हेच प्रेरणा देणारे, हिम्मत वाढवणारे, अभ्यासात लक्ष लागेल असे सकाळी केलेले विचार आठवले असते आणि त्याला पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेच असते.

हा विषय फक्त सचिन चा नाही तर आपल्या सर्वांसाठीच आहे.. आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा इतका विचार करतो की सकाळी जाग येत नाही तर तेच विचार सुरू होतात. आणि खर तर आपले विचार आपला दिवस कसा असेल हे ठरवतात..

कधी आपल्याला नोकरी मिळत नाही.. तर कधी मिळालेल्या नोकरीत हवं तसं यश मिळत नाही.. कधी प्रेमात असताना कोणी विश्वासघात करत, प्रेमाचं अपयश आपण माथी मारून घेतो, तर कधी संसारात पडल्यावर होणारे वाद असतात.. कधी मुलांची चिंता तर कधी मुलांच्या संसाराची काळजी..

जेव्हा आपल्या बाबतीत काही चांगल घडलं तर आपण सकाळीच ते आठवून आनंदी होतो आणि आपला दिवस सुद्धा उत्साहात जातो पण तेच जर कालच्या घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप घेऊन आपण दिवसाची सुरवात करू तर त्यातून आपल्याला नकारार्थी विचारांनी मिळणारी नकारात्मक ऊर्जा दिवसभर काहीच वेगळं करण्याची प्रेरणा देणारं नाही.. दिवसभर आपण तोच पश्चाताप घेऊन विचार करणार आणि अजून जास्त कमजोर पडणार कारण काही करण्याची इच्छाच आपल्याला होणार नाही. आपल्यातील ऊर्जा सकाळीच हरवून जाईल जर आपण सकाळीच असे विचार केले तर..

म्हणून दिवसाची सुरूवात ही कालच्या पश्चातापाने न करता आजच्या नविन विचारांनी नविन आशेने करायची.. ज्यामुळे आपल्याला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि आपला दिवस उत्तमच असेल…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “दिवसाची सुरुवात ही कालच्या पच्छातापाने अजिबात करू नका.”

  1. अश्या विचाराने मन अगदी प्रसन्न होते

  2. शीर्षकात चूक झाली. तो शब्द पश्चाताप असा आहे.

  3. Geet Kiran Valvekar

    फारच छान प्रबोधन करणारे विचार….

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!