Skip to content

‘संशय’….वैवाहिक आयुष्य उध्वस्त होण्यामागे एक प्रमुख कारण!!

‘संशय’….वैवाहिक आयुष्य उध्वस्त होण्यामागे एक प्रमुख कारण!!


टीम आपलं मानसशास्त्र


काव्या दिसायला खूप सुंदर.. उजळ रंगाची.. देखणी आणि उंची सुद्धा एकदम बरोबर ना कमी ना जास्त.. शिक्षण सुद्धा चांगलं घेतल तिने आणि त्यासोबतच घरातील काम सुद्धा अगदीच नेटाने सांभाळणारी अशी काव्या…

तीच एका मुलावर प्रेम होत .. तो सुद्धा तिला शोभेल असाच.. देखणा.. उंच बांध्याचा.. रंगाने सुद्धा उजळ.. आणि उच्च शिक्षित.. त्याच नाव सागर..

पण दोघांच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध तरी हट्ट करून सगळ्यांना मनवून काव्या ने सागर सोबत लग्न केलं.. घरच्यांचा सुद्धा नाईलाज कारण हल्ली मुलांना जास्त विरोध केला की आहेतच जीव द्यायला तयार..म्हणून तिच्या मनाप्रमाणे सगळं केलं..

सगळं मनासारखं घडलं.. घरात सासू सासरे सागर आणि काव्या हे छोटंसं कुटुंब सुरवातीचे दिवस खूपच छान गेले. नंतर ती घरीच राहायची तो नोकरीवर जायचा. आणि हे असच कायम असायच त्याला सुट्टी मिळाली की दोघेही बाहेर फिरायला जायचे. सागर सुद्धा तिचे सगळे हट्ट पुरवायचा.. तिला जपायचा तिची काळजी घ्यायचा.

पण एकदा सागरच्या शाळेतल्या मित्रांचं गेट टुगेदर ठरलं.. आजकाल हे तर चालूच आहे. त्यासाठी तो दोन दिवस बाहेर गेला तिथे सर्व वर्ग मित्र मैत्रिणी यांच्यासोबत त्याने मज्जा केली.. आणि त्या आठवणी आपल्या स्टेटस ला ठेवल्या..म्हणजेच फोटो अपडेट केले.

त्याच्या मैत्रिणींसोबत असलेले फोटो पाहून काव्याच्या मनात मात्र विचारांचं चक्र सुरू झालं. सागर परत कधी येतोय यासाठी मनाची फक्त एक हुरहूरी सुरू झाली. काव्या ला त्याचे फोटो अजिबात आवडले नाही.. तिला त्याने त्याच्या मैत्रिणींसोबत काढलेले फोटो, घालवलेला वेळ अजिबात सहन झाला नाही.आणि हीच सुरवात होती तिच्या बिघडलेल्या मनःस्थितीची .

सागर दोन दिवसांनी घरी आल्यावर त्याला काव्याच वागणं खूप बदललेल जाणवलं. आल्यावर तो त्याच्या गमतीजमती सांगत होता पण काव्या मात्र तोंड पाडून बसलेली. नंतर मात्र तिने त्याच्याशी मनातलं सगळं सरळ संवाद साधून न सांगता भांडणाच्या सुरात बडबड केली. नंतर पुढे तू कधी जायच नाही हा एकप्रकारे तिनं त्याला आदेशच दिला.!

त्यानंतर मात्र सागरचा राग अनावर झाला पण तरीसुद्धा वाद वाढायला नको.. नात महत्वाच समजत त्याने काव्याला जवळ घेऊन नीट समजावलं..की अग शाळेतले मित्र आम्ही.. रोज थोडिना भेटणार.. आणि आम्ही बिनधास्त वागतो कारण कोणाच्याच मनात पाप नाही. जुन्या आठवणी उजळण्याचा प्रयत्न करतो. हे आताच नाही कायम आम्ही सगळे कधीतरी वेळ काढून भेटायचो आणि मन साफ, स्वभाव बिनधास्त त्यामुळे आमच्या या भेटीत कधीच कोणते अडथळे नाहीच आले.इतकं समजावून सांगितलं पण ती मात्र काही ऐकून घ्यायला तयार नाही.नंतर त्याने विषय सोडला शांत राहून दुर्लक्ष केलं.

पण काव्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती त्यामुळेच तिला आता सागरने कोणत्याही मुलीशी बोललं तरी सहन व्हायचं नाही. अगदी तिच्या नात्यातल्या बहिणींसोबत सुद्धा आणि यात आश्चर्य म्हणजे त्याने त्याच्या बहिणींसोबत बोललेल सुद्धा तिला आवडायचं नाही.

सागर मात्र तसा मुलगा नव्हताच. आपण आपल्या बायकोची काळजी घ्यावी, तिला कायम सुखात ठेवावं, तिला माझ्याकडून कधीच कोणताच त्रास होणार नाही या मताचा सागर.. मात्र तिच्या अशा वागण्याने तो पूर्ण वैतागून गेला होता. सतत तिचं भांडण, तेच वाद, रुसवे फुगवे, घरातलं बिघडलेले वातावरण याचा त्याला खूपच कंटाळा येऊ लागला.

काव्याच्या मनातील सतत निर्माण होणारा संशय वाढतच होता आणि तो दूर करण्याचा प्रयत्न अनेकदा करून सुद्धा काहीच उपयोग नव्हता.. त्यामुळे तो नंतर तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला.. तिच्या सततच्या तक्रारींचा विचार करण्यापेक्षा तो त्याच्या कामावर लक्ष देऊ लागला.

काव्याच्या अशा वागण्यामुळे सागरच्या मनातील तिच्याविषयी असलेला आदर कमी होत गेला.. त्याचबरोबर तिच्यावर असलेलं प्रेम त्याची जागा रागाला देऊलागला.. त्यांच्या नात्यातील प्रेम, काळजी, एकमेकांबद्दल असलेली ओढ आता कमी होऊ लागली… लग्न केलंय म्हणून एकत्र राहायचं इतकंच त्यांच्या सोबत राहण्याचे कारण झालं..

खरचं काव्याच्या या एका संशयामुळे नात्याचा अर्थ बदलला.. दोघांच्या भावना बदलल्या.. विचार बदलले..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!