Skip to content

शाळेतली स्कॉलर प्रिया, कॉलेजला न जाता त्याच्यासोबत हॉटेलला जायची…

वादळी झंझावाताचा काळ


प्रा. गीत वाळवेकर

(शिक्षिका, मानसशास्त्र)


प्रियाने नुकतच अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. तशी ती हुशार संगीत नृत्य यातही निपुण. सुरवातीला बावरणारी प्रिया हळूहळू महाविद्यालयीन वातावरणात रुळू लागली. कॉलेजच्या त्या चैतन्यमय वातावरणात फुल टू धमाल करण्याचे तिने ठरवले.त्यातच तिला अजय आवडू लागला. अजय उंच, स्मार्ट, अगदी जहिरतीतल्या पुरुषासारखा! तो जवळून गेला की त्याच्या सेंट च्या फवाऱ्याच्या सुगंधाने डोकं धुंध होऊन जाई. बोलण्यातही मिठास. त्याच्या त्या सिल्व्हर रंगाच्या बाईक वरून येताना तो आणखीनच रुबाबदार वाटे. त्याला पाहताच तिला वाटून गेले की अगदी ‘जनम जनम का प्यार हो गया है’.

त्यातच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठरला. विद्यार्थ्यांच्या मिटिंग घेणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे, कार्यक्रम बसविणे इ. गोष्टी सुरू असताना दोघे एकत्र आले. त्यादिवशी कार्यक्रम पार पडला, त्यानं बसवलेला दोघांचा डान्स फारच टाळ्या घेऊन गेला. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदी लहरी उमटल्या.

मुले पांगली, आता फक्त दोघेच उरली. ‘प्रिया’ त्याने मधाळ स्वरात हाक मारली. ‘चल कोफी घेऊ’ तिच्या छातीत धडधड होऊ लागले आणि तो म्हणाला, ‘आय लव्ह यु प्रिया’

आणि गुलाबी पर्व सुरू झाले. घरी कॉलेजला जाते असं सांगून ती बाहेर पडायची. डोके रुमालाने झाकून त्याच्या बाईकवर मागे बसायची आणि गाडी पन्हाळ्याकडे पळायची. उंची हॉटेलमध्ये नेऊन तो तिची चंगळ करायचा. महागड्या भेट वस्तू द्यायचा. कधी फ्रेंच परफ्युम तर कधी मिनावर्क केलेले कंगण. कधी पर्स तर नेकलेस. एका मोहमाया नगरीत ती संमोहित अवस्थेत धुंद होती.

प्रियाला शिकवणाऱ्या मॅडमने तिला तिच्या गैरहजेरीबद्दल विचारणा केली, पण तिने ‘आई आजारी असते मला घरी काम पडते’ असे सांगितले.

दिवस पळत होते आणि हळूहळू तिला त्याच्या वर्तनात बदल जाणवू लागला. त्याचा तो नकली चेहरा बाजूला झाला आणि त्याची खरी रूपे लक्षात येऊ लागली. त्याची ती चैनी, तो पैसा हे सारे वाममार्गाने मिळत होते. अगदी गुन्हेगारी कृत्यातही त्याचा हात होता. तिला ग सापळ्यातून बाहेर पडायचे होते. पण त्याने काढलेल्या व्हिडिओचे भांडवल करून तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिला मार्ग दिसत नव्हता. आणि आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोंगावत होते.

प्रिया सारखी परिस्थिती कितीतरी मुलींवर बेतत असते. साध्या, सरळ कुटुंबातील या मुलामुलींनी शिक्षण घेऊन चांगले आयुष्य उभे करण्याची क्षमता असतानाही ती अशा मार्गाकडे का वळतात? आई-वडील, शिक्षक यांचे संस्कार कमी पडतात की इंटरनेटचे मायाजाळ त्यांना वास्तवापासून दूर नेतात ?

मुळातच किशोरावस्था हा वादळी झंझावाताचा काळ असतो. शारीरिक बदल झपाट्याने होतात. शरीरात विविध स्रावांच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. त्याबद्दल प्रचंड कुतूहल, विरुद्ध आकर्षण निर्माण होते. पण या विषयावर घरात बोलणे म्हणजे ही अपराध ही भावना असते.

एखादी मुलगी याबद्दल काही विचारू लागली तर आई तिच्या अंगावर ओरडून म्हणते, ‘गप्प बस्स कार्टे, काहीतरी भलतं-सलतं बडबडू नकोस’ मग ती मुले-मुली चुकीच्या पद्धतीने हे कुतूहल पूर्ण करून घेऊ लागतात.

मित्रांच्या टोळक्यात चर्चा करणे, तसले व्हिडिओ पाहणे, इंटरनेटच्या साईट्सवर मॉडेल्सची कसलीही छायाचित्रे पाहणे इ. आणि मग काही वेळा चोरून तसे कृत्य वाईट पद्धतीने सुद्धा करू लागतात.

खरंतर आई ही मुलींची मैत्रीण असली पाहिजे. मुलीला विश्वासात घेऊन तिने या गोष्टींची माहिती तिला करून दिली पाहिजे. बरेच वेळा पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष घ्यायला वेळ नसतो. दोघेही दिवसभर बाहेर, मुलांना केक, मंच्युरियन, मोबाईल आणून दिला की झाले कर्तव्य असे वाटते.

किशोर वय हे तर स्वप्नरंजनाचे वय. अशा माध्यमांमुळे अवास्तव कल्पना तयार होऊ लागतात. पालकांनी मुलांसाठी वेळ देऊन संवाद साधला पाहीजे. आईकडून भावनिक उबदारपणा मिळाला पाहीजे. चुकून काही घडलेच तर आई-वडील आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा विश्वास मुलांना वाटला पाहिजे. म्हणजे योग्य वेळीच सावरले जाऊन आत्महत्येचे विचार डोकावणार नाहीत.

मुलामुलींच्यात होणारे बदल पालकांच्या लक्षात यायला पाहिजे. प्रियजवळ एवढ्या महागड्या वस्तू कोठून येत आहेत, हे प्रियाच्या आईच्या आधीच लक्षात आले असते तर पुढील अनर्थ टळला असता. प्रियची अनुपस्थिती तिच्या शिक्षिकेच्या लक्षात आली असताना त्यांच्या व तिच्या आईचा आधीच संवाद होणेही आवश्यक होते.

मोबाईलच्या अतिरेकी व्यसनांमुळे मुलींविरुद्ध, महिलांविरिद्ध घडणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहेत. फेसबुकवर सतत अपडेट करून, आपण कोठे आहोत, काय करतोय, कोणत्या हॉटेलात जेवतोय हे जाहीर करून आपलीच खाजगी माहिती आपण उघड करतोय.

कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जातेय. मग मुलींचा ऑनलाईन पाठलाग केला जातोय. नको ते मॅसेज पाठवले जात आहेत म्हणून मुलींनीही अशी माहिती उघड करू नये याची दक्षता घेतली पाहिजे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “शाळेतली स्कॉलर प्रिया, कॉलेजला न जाता त्याच्यासोबत हॉटेलला जायची…”

  1. आत्या फार सुंदर रीतीने मांडला आहेस हा प्रश्न अणि त्याच उत्तर!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!