Skip to content

बुटं हरवली म्हणून कचराकुंडीतून टाकलेली बुटं घालून २ सुवर्ण पदकं मिळविणारा अवलिया !

– मुसाफीर
फोटोतील व्यक्ती जिम थोर्प आहे. फोटो थोडा काळजीपूर्वक पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याने वेगवेगळे बूट आणि सॉक्स घातले आहेत.
ही काही फॅशन नाही…1912 सालच्या ऑलिम्पिक मध्ये ओक्लाहोमाच्या भारतीय अमेरिकन जिमने ट्रॅक व फील्ड म्हणजेच धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. दुर्दैवाने शर्यतीच्या सकाळी त्याचे बूट चोरीला गेले आणि नशिबाने त्याला कचऱ्याच्या पेटीत दोन बूट सापडले तेच बूट त्याने घातलेले फोटो मध्ये दिसतात, 
त्यातील एका पायातील बूट मोठा होता म्हणून त्याला एक जादा सॉक्स घालावा लागला. ते बूट घालून जिमने त्या दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकले. तुम्हाला आलेल्या अडचणीचे कारण न सांगता उत्कृष्ट प्रदर्शन करणे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मग तुमच्या आयुष्यातही काही अडचणी आल्या तर? त्या अडचणीबद्दल तुम्ही आज काय करणार आहात? तुम्ही ज्या काही अडचणीसोबत सकाळी उठाल; चोरीला गेलेले बूट, खराब तब्येत, तुटलेले नाते, अयशस्वी व्यवसाय… 
या सर्व अडचणींमुळे तुम्ही स्वतःला शर्यतीत धावण्यापासून रोखू देऊ नका. तुम्ही आयुष्यात खूप चांगले अनुभव घेऊ शकता जर तुम्ही अडचणींवर मात करून जगायला शिकलात तर. तुमच्याकडे एक तर कारण असू शकेल किंवा यश….पण तुमच्याकडे दोन्ही एकत्रित असू शकत नाही
***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!