परिणामकारकपणे आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या ६ सवयी !!
सौ. मिनल वरपे
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढाओढी आपल्याला गारद करतात. पुन्हा उभं राहण्याची संपूर्ण मानसिक ताकद उरत नाही. अशावेळी इतरांनी उभारी घेतलेल्या लोकांच्या समवेत राहिल्यास आपल्याला सुद्धा अंगात नवीन ऊर्जा संचारल्याचा अनुभव येतो. परंतु हि माणसं कशी काय स्वतःला मेंटेन ठेवतात ??
आज याच परिणामकारक माणसांबद्दल बोलूया…ज्यांची छाप ते सदैव कोणत्याही प्रसंगात पडून मोकळे होतात.
१) सक्रिय राहणे
अशी माणसं स्वतःला सतत सक्रिय ठेवतात. सतत कार्यरत राहील्यावर आपल्याला नवीन उत्साह मिळतो.पण तेच जर आपण काम थोड आणि आराम जास्त केला.. कामाचा कंटाळा केला..तर आपल्याला आळसाची सवय लागते. नविन काही सुचत नाही.म्हणून जास्तीत जास्त सक्रिय राहायचं त्यामुळे आपल्याला नवनविन कल्पना सुचतात… वेगळा उत्साह मिळतो. आणि आपल्या मार्गात येणाऱ्या प्रश्नांना आपण भीतीने नाही तर challange म्हणून स्विकारतो.
२) शेवट लक्षात घ्या
अशा माणसांना हाती घेतलेल्या कामाचा शेवट पटकन डोळ्यासमोर येतो. मग तो शेवट आणखीन कसा परिणामकारक करता येईल यासाठी ते इतरत्र धागेदोरे जोडण्याचा खुशालीने प्रयत्न करतात. आपण जे काही करत आहोत त्याचे चांगले वाईट परिणाम काय होणार हे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे. आपण जे नियोजन करू त्या नियोजनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही त्याचा शेवट लक्षात घेऊन केली ते आपल्याला आपल्या नियोजनात वेळेवर बदल करण्याची गरज पडत नाही. नवीन समस्या, अडचणी कितीही आल्या तरी आपण आपल्या कामाचा शेवट कसा करायचा आहे हे लक्षात ठेवून योग्यरीतीने योग्यदिशेने वाटचाल करत असतो.
३) प्राधान्य लक्षात ठेवायचं
आपण जे काही काम करत आहोत त्या कामाबद्दल आपण कशाला प्राधान्य दिले पाहिजे हे आपण आधी ठरवावे, एक उत्तम वेळापत्रक तयार करायचं, आणि आपण जे नियोजन केले आहे त्यानुसार त्या त्या गोष्टींना कामांना महत्त्व द्यायचं.
मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे.. तर त्यासाठी गरजेच्या गोष्टी कोणत्या.. ऑफिस , कर्मचारी, कामाचं व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, नफा तोटा याची खात्री करणे अशा अनेक गोष्टींचं नियोजन करावं लागते आणि यामधे कशाला प्राधान्य द्यावे हे आपण वेळेत ठरवलं तर आपल काम योग्य वेळेत आणि नियोजनानुसार होणार.
४) यश मिळणार हाच विचार करायचा
आपण जे काही करतो त्यामधे आपल्या मनात कोणतीच शंका ठेवायची नाही. मला जमेल का, माझ्याने होणार का, मला अपयश आले तर काय करायचं या नकारार्थी विचारांनी आपण अजून जास्त कमजोर पडणार. आपल्याला मार्ग दिसणार नाही. काहीही करायला घेतलं की त्यातून उत्तर मिळण्यापेक्षा आपल्याला अडचणीचं जास्त जाणवणार.
म्हणूनच आपण नेहमीच एवढं लक्षात ठेवायचं की यश हे मला मिळणारच. डोक्यात कायम याच विचारांना जागा द्यायची की मी जे काही करतोय त्यामधून मला फक्त यश मिळेल आणि याच विचारामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता वाढेल, एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळेल, आपले प्रयत्न कुठेच थांबणार नाहीत.. मनात कोणतीच शंका जागा घेणार नाही. आणि आपण यशस्वी होणार.
५) समजून घेणं
आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण आधी स्वतः समजून घ्यायचं. यामुळे आपल्याला नक्की काय करायचं आहे हे चांगल्या रीतीने लक्षात येते. कोणत्या पद्धतीने आपल्याला सगळं व्यवस्थापन करायचं आहे.. आपल्याला कोणते पर्याय आहेत हे आपण आधी समजून घ्यायचं आणि ते समजल्यानंतर आपण कृती करायची.
उदा. माझं काम हे सेलिंग मधे आहे तर मला आधी ग्राहकांशी कस बोलायचं, त्यांच्यासमोर कस मुद्द्यांना मांडायच हे आधी मी समजून घेतलं आणि समजलो तरच मला माझं काम योग्य रीतीने करता येईल.
6) समन्वय साधणे
मागच्या अनुभवापेक्षा आताचा अनुभव कसा आणखीन बेस्ट होईल यासाठी मागच्या आणि आत्ताच्या अनुभवांमध्ये समन्वय साधायला हवा. त्यातून उत्तम वाट मोकळी करून पुढे सरकता यायला हवं. तसेच आपले इतरांशी असणारे संबंध दृढ करण्यासाठी प्रयन्त करायला हवा. एखाद्याशी जरी आपले संबंध मोडलेले असेल तर त्याचा परिणाम आपल्याच मार्गावर होणार आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

