Skip to content

घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा..

घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा..


लालचंद कुंवर,

उरुळी कांचन, पुणे.


या लेखाद्वारे अशा विषयाचा ऊहापोह अणि चिकित्सा करणार अहोत, त्याची व्याप्ती खुप गहण आहे. म्हणूनच कदाचित हा
लेख म्हणजे त्यावर प्रकाश टाकणारा एक तुटपुंजा प्रयत्न असेल

घरात देखणी बायको असूनही ‘ तो ‘ तसले व्हिडिओ पाहून लैं_गिक सुख घेत होता. कधीतरी घडणारी घटना, आता नित्यनेमाने घडू लागली , कालांतराने त्याचं सवयीत रूपांतर झालं. ते अ_श्लील व्हिडिओ पाहताना हस्त_मैथुन करण्याचीही सवय जडली…………….. ! याचा परिणाम कळत-नकळतपणे त्याच्या वैवाहिक जीवनावर दिसू लागला.

अस्थिर मन , चिडचिड , नैराश्य , एकलकोंडा होत जाणारा स्वभाव आणि नवरा-बायकोमधील नेहमीच होणारे खटके या अशा गोष्टी आता त्याच्या आयुष्यात वारंवार घडायला लागल्यात ……… ! हे असं का घडतंय, यापासून मात्र ‘तो’ पूर्णपणे अनभिज्ञ …… !

सुरुवातीला नेमकी समस्या काय आहे हे न कळल्यामुळे, ‘ आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी अवस्था झाली. का ? ‘तो ‘ पद्धतशीरपणे पॉ_र्न नावाच्या मोहजालाच्या सापळ्यात अडकत गेला ! Who is the responsible for this situation ?

या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही पार्श्वभूमी आधी आपल्याला समजून घ्यावी लागेल. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात , खूप नवनवीन संशोधन झालीत. त्यामुळे सहाजिकच अनेक नाविन्यपूर्ण आणि मानवी जीवन सुखकारक बनवणाऱ्या वैज्ञानिक अविष्कारांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञाना यश आलं.

याच काळात, नवनवीन अविष्काराच्या पोतडीतून टीव्ही जन्माला आला. आणि त्यानंतर हळूहळू पॉ_र्न व्हिडिओ नावाचं नवं रोपटं जोमदारपणे भारतात फोफावायला सुरुवात झाली. आता तर गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये, न भूतो न भविष्यती अशी मोहजालाची कृपादृष्टी आम्हा भारतीयांवर मेहेरबान झाली ,

ते म्हणजे इंटरनेट सुविधा अणि स्मार्ट फोन , घराघरात प्रत्येक मेंबर्सच्या हातात जाऊन पोहचलेत.

सध्या तर , माणूस एक वेळ अन्न, वस्त्र , निवारा या मूलभूत गरजांशिवाय काही दिवस जगू शकेल पण नेट पॅक शिवाय राहूच शकत नाही ! हे समाजाचं वास्तव चित्रण.

सध्या तर ” रिचार्ज करा आणि नेट बॅलन्स खैरात मध्ये घ्या “, अशी नेटवर्क कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे म्हणून आता शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत अगदी वाड्या वस्त्यांमध्ये इंटरनेट सुविधा पोहचली आहे.

इंटरनेटमुळे लोक एकमेकांना जोडली गेलीत. ऑनलाईन मुळे जीवन सुसह्य अणि सुलभ झाले, हे एक मानवाला मिळालेलं वरदानच ! अणि हे जरी खरं असलं तरी इंटरनेटचा मोठ्याप्रमाणात दुरुपयोगही होऊ लागला आहे ,आणि तो समाजासाठी लागलेला शापचं !

व्यक्ती , कामानिमित्त किवा टाईमपास म्हणून म्हणा, सतत इंटरनेट वर काहीतरी सर्चिंग करत असतोच. त्यामुळे सहजपणे पॉ_र्नोग्राफीच्या साइट्स मिळतात. त्यात काही पॉ_र्न साईट फ्री असल्यामुळे सर्रास त्या सर्फ केल्या जातात

खरं तर ,पॉ_र्न म्हणजे नेमकं काय , हो ? तर, स्त्रीपुरुष यांचे शारीरिक संबंधांचं घाणेरड विकृतीकरण. भाव-भावना विरहित सर्वसाधारण माणसाला किळस येईल, असं यांत्रिकपणे केलं जाणार लैं_गिक वर्तन.

अमेरिकासारखे पाश्चिमात्य देशांना, पो_र्नोग्राफीने त्यांचं family’ life अक्षरशः आतून वाळवी लागल्याप्रमाणे पोखरुन काढले आहे. अणि आज तेच संकट भरताभोवती घोंघावत आहे. आज कोट्यावधी लोकं या व्यसनाला बळी पडता आहेत.

सुरुवातीला कधीतरी अ_श्लील व्हिडिओ हे एक कुतूहल म्हणूनच पाहिले जातात. नंतर नंतर जर मुद्दामहून वेळ काढून अणि एकांत बघून दररोज जर पो_र्न पाहण्याची इच्छा होत असेल…! तर ती एक सवय अणि व्यसन लागण्यापुर्वीची धोक्याची घंटाच समजायची.

तेंव्हा हा red signal लक्षात घेऊन, ” मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक “. म्हणून मनावर पुर्ण नियंत्रण ठेवून या सवयीतून बाहेर पडता आल पाहिजे.
हा मरीआईचा फेरा जर वेळीच लक्षात नाही आला तर …………… !

‘ तो ‘ च्या व्यक्तीगत आयुष्यात काय काय घडू शकतं ?

सारखं सारखं अ_श्लील चित्रफित पाहत असल्यामुळे, शरीरात डोपामाइन नावाचा हार्मोन रिलीज होतो आणि हा डोपामाईन स्रवू लागल्याने सुखसंवेदना वाहू लागतात., हळूहळू त्याची तीव्रता इतकी वाढत जाते की मग मेंदूच त्या व्यक्तीला पॉ_र्न व्हिडिओ पाहण्याकडे खेचून नेत असतो अणि रोजच हे असच सुरू राहिल्यामळे त्या व्यक्तीला आता माणसं न दिसता केवळ त्याचे लैं_गिक अवयवच दिसत असतात.

आता हे डोपामाइन म्हणजे नेमकी काय भानगड आहे ?

तर डोपामाइन नावाचा हर्मोन आपल्या शरीरात असतो . त्याची शरीरात योग्य पातळी असायला हवी , तरच माणसाला व्यवस्थित व समतोल जीवन जगता येत. डोपामाइनमुळे माणसाची दृष्टी सकारात्मक होते, वर्तन चांगलं होतं, चांगल काम करण्याची प्रेरणा मिळते. पण हे ही लक्षात घेतलं पाहिजे की त्याच डोपामाइनच्या असंतुलनामुळे मानसिक समस्या निर्माण होतात.

अ_श्लील व्हिडिओ पाहण्याची लागलेली सवय त्यामुळे डोपामाइनच असंतुलन , यांच co-relation , आपण लक्षातच घेत नाही! मग पुढे स्वतः च लैं_गिक अवयव हाताळणे आणि हस्त_मैथुन करुन लैं_गिक सुख अर्थात organism घेण्याची जणूकाही सवयच जडते. कालांतराने ह्या सवयीच व्यसनात रूपांतर होत जातं.

इतर दारू, सिगारेट, गांजा इ. या व्यसनापेक्षाही माणूस भायावह स्थितीला जाऊन पोहोचतो. अगदी इंटरनेट पॉ_र्नोग्राफी पाहण्यात आठ-आठ,दहा-दहा तास लोकं वेळ खर्च करतात.

आता इथून पुढे गंभीर परिणाम, वैवाहिक जीवनावरही व्हायला सुरुवात होते.

‘तो’ जर पॉ_र्नव्यसनी झाला असेल, तर तो बायकोलाही पॉ_र्न फिल्ममध्ये पाहिलेले लैंगिक चाळे करण्यास भाग पाडतो , की जे भारतीय स्रीला कदापि शक्य होणार नाही. कारण खऱ्या आयुष्यातील से_क्स आणि पॉ_र्नग्राफीमधील से_क्स , यांच्यात जमीन अस्मान येवढ अंतर असतं. खऱ्या आयुष्यातील से_क्स मध्ये मनातील feelings खुप महत्त्वाची भूमिका बजावतात, तर पॉ_र्न मधील से_क्स हा एक भावनाविरहित आणि केवळ व्यवसाय म्हणून पैसे कमवण्याचा स्रोत असतो.

पुढे पुढे आणखी भयवाह आणि भीषण परिणामांना सामोरं जावं लागतं. पॉ_र्न पाहतांना सततच्या हस्त_मैथुनामुळे लिं_गात जास्त वेळ ताठरता न राहणं, शीघ्र पतन होण , परिणामतः लैं_गिक संबंधाच्या वेळी गिल्टी फील होण, अशा इ. समस्या उद्भवतात .

आणि ज्यावेळी ‘ तो ‘च्या हे सर्व लक्षात यायला लागतं की आपण P_orn Addiction ‘ ची शिकार झालो आहोत , त्यावेळेस बरेच पाणी पुलाखालून वाहून गेलेल असतं. कारण त्याला आता गरज होती, पो_र्नमुळे अतिउत्तेजित होण्याची सवय लागलेल्या मेंदूला विश्रांती देण्याची….. !

आता खरी कसोटी लागणार होती , सेरीब्रल कॉर्टेक्सची अर्थात मनाची control capacity वाढवण्याची… ! खरं आव्हान असणारं होत ,
मेंदूमध्ये अधिकाधिक रिसेप्टर्स तयार करण्याचं आणि नवीन आयुष्याची आनंदमय वाटचाल करण्याची की जेथे त्याला भेटणार होते नवनवीन छंद, मित्रमैत्रिणी, वाचन, व्यायाम, योग आणि ध्यान असे बरेचं काही…… !

शेवटी हिम्मत करून P_orn Addiction पासून सुटका करणाऱ्या Psychologist ला फोन केला………… !

सर, …………… मी बोलतोय.
मला appointment हवी होती.
या ……………… समस्येने मी ग्रस्त आहे, असं वाटतं.
हो सर,…..
उद्या येताना मी माझ्या पत्नीलाही सोबत घेऊन येणार आहे.

Thank you very much , Doctor.

समाप्त.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “घरात देखणी बायको असूनही तो तसले व्हिडिओ पाहून सुख घ्यायचा..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!