Skip to content

मीच का Sorry बोलायचं, मलाच गरज पडलीये का ??

मीच का Sorry बोलायचं, मलाच गरज पडलीये का ??


सौ. मिनल वरपे


Sorry किती सोपा शब्द आहे हा… एका सेकंदाच्या या शब्दाने कितीतरी दुखावलेल मन सुद्धा क्षणात शांत होते…पण हा या sorry शब्दात तेवढीच ताकद हवी नुसतं बोलायचं म्हणून वरवर बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि काही उपयोग सुद्धा नाही.कारण त्यामधे भावनाच नसतात असते ती फक्त formality.

मात्र मनापासून बोलल्या जाणारा सॉरी हा शब्द मनापर्यंत सहज पोहचतो…आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद हा कायम सकारात्मक असतो.

एक वाक्य आपण नेहमीच ऐकतो आणि वेळ आली की गमतीने बहुतेकदा बोलतो ते म्हणजे.. आधी लाथ मारायची आणि नंतर sorry बोलायचं यात काय अर्थ आहेका… हे सुद्धा तितकंच खरं आहे. काही लोकांना ही खूप सवय झालेली असते.. मुद्दाम एखाद्याला काहीपण बोलायचं.. दुखवायचं.. ज्यामुळे त्रास होईल अस वागायचं… आणि लक्षात एवढच ठेवायचं की त्यात काय जास्तीत जास्त sorry तर बोलावं लागेल.. पण हे साफ चुकीचं आहे.

एकतर कोणाला मुद्दाम दुखवायचं नाही आणि तस वागून sorry बोललं तरी त्यामुळे समोरच्याचा राग निवळत नसतोच. Sorry या शब्दाला तेव्हाच अर्थ येतो जेव्हा तो आपल्याकडून झालेकी चुक आपल्याला कळेल, समोरचा आपल्यामुळे दुखावला आहे याबद्दल आपल्याला पच्छाताप होतो…, आणि हे सगळं तेव्हाच घडेल जेव्हा आपल्याला आपल्या वागण्याची आपल्या चुकीची जाणीव होईल.

किती सहज मोठ्यात मोठे वाद सुद्धा शांत करतो हा शब्द.. पण तो शब्द तितकाच सहज नाही निघत त्यासाठी तसे विचार हवे असतात…तसा स्वभाव हवा असतो.. कारण सहजच कोणी नमत घेत नाही.. पण हे तेच बोलतात ज्यांना स्वतःच्या मीपणा पेक्षा.. स्वतःच्या स्वाभिमानापेक्षा नात्याची.. माणसांची… गरज असते.

मीच का sorry बोलायचं.. मलाच गरज पडलीये का.. मी अजिबात sorry बोलून नमत घेणार नाही तसही माझं काय अडल नाही कोणाशिवाय… मलापण स्वतःचा स्वाभिमान आहे.. समोरच्याला गरज असेल तर बोलेल माझ्याशी नाहीतर माझं काही बिघडत नाही…. असे जर विचार असतील तर नक्कीच नात जोडणं तर लांबच पण नात टिकन सुद्धा कठीण आहे कारण sorry न बोलता सुद्धा काही काळ गेल्यानंतर आपण एकेमकांशी बोलतोच पण त्या बोलण्यामध्ये एकमेकांविषयी असलेला आदर, प्रेम, जाणीवा कमी झालेल्या असतात.

पण तेच जर आपण असा विचार केला जाऊदेत माझा स्वाभिमान माझा मीपणा, माझं जरी काही अडल नसल तरी मला माणसांची गरज आहे.. माझ्या एका शब्दाने जर नात्यात पुन्हा तोच जिव्हाळा तेच प्रेम नव्याने निर्माण होणार असेल तर तो शब्द माझ्यासाठी जड नाही. माझ्या हट्टपेक्षा, माझ्या रागापेक्षा मला यावेळी आमच्यातील चांगले संबंध महत्वाचे आहेत हे जरी लक्षात आलं तर नक्कीच दोन्हीकडून चांगलीच प्रतिक्रिया मिळणार…

मित्रांमध्ये जर काही गोष्टींमुळे भांडण झालं तर त्यावेळी मैत्रीला महत्त्व दिलं , एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आठवल्या की नक्कीच एकमेकांना sorry बोलायला वेळ लागत नाही.

आई वडील जरी मुलांमुळे दुखावले गेले तरी मुलांना सहज माफ करतात.. स्वतःच आवाज देतात काळजी घेतात त्यापेक्षा आपली चूक मान्य करून आई वडिलांना sorry बोलायचं मीपणा बाजूला सारून कारण त्यांनी आपल्याला कष्ट घेऊन वाढवलं असते.

पती पत्नीच्या नात्यात मीपणा पेक्षा संसार महत्वाचा असतो. दोघांच्या वादाचा परिणाम मुलांवर , पूर्ण घरावर होत असतो म्हणून आपल्या राग रुसव्यापेक्षा आपल्यातील संवाद महत्वाचा आहे हे समजून sorry बोलून संवाद साधला की एकमेकांविषयी गैरसमज सुद्धा दूर होतात.

नात कोणतही असो त्या नात्यातील दुरावा कमी होण्यासाठी… नात्यातील गैरसमज दूर होण्यासाठी … नात टिकवण्यासाठी.. नात्यातील गोडवा, विश्वास टिकवण्यासाठी कायम गरजेचा असतो तो एक छोटासा आणि सहज बोलता येईल असा शब्द तो म्हणजे sorry…

आता या शब्दाचे इतके फायदे आहेत तर कशाला नमतेपणाची लाज, मीपणा यांना महत्त्व द्यायचं… आज आपण बोललो तर उद्या समोरचा बोलेल.. अस म्हणत sorry बोलून मोकळं व्हायचं…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!